नवीन लेखन...

न्यूट्रिशन आणि डायटेटिक्समध्ये नाविन्यपूर्ण करिअरच्या संधी….

दहावी आणि बारावी ही पुढील शिक्षणाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची शैक्षणिक वर्षे असतात. हा खरं तर करिअरचा मूळ पाया असतो. आज खरी गरज आहे योग्य करिअरच्या निवडीची. आवड आणि निवड यांचा करिअरच्या दृष्टीकोनातून खूपच जवळचा संबंध असतो. तरीही केवळ आवड आहे म्हणून करिअरची निवड करणं उपयोगी ठरतंच असे नाही. अनेकदा आवडते करिअर निवडलं तरीही केवळ ते आपल्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरतंय का? हेही बघणं जरुरीचं असतं. आपल्या क्षमता लक्षात घेऊन आपल्या आकांक्षांसाठी सर्वोत्तम करिअर निवडताना आपल्या सर्वांचाच कस लागत असतो. सद्य:स्थितीत सर्वच व्यवसायांतील स्पर्धा, स्पर्धेत मिळवावं लागणारं यश ह्यादृष्टीकोनातून चांगले करिअर म्हणजे न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स होय.  ·

न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स काळाची गरज

प्रत्येक कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असतो, तसा प्रत्येक कुटुंबात एक आहार तज्ञ नेमला जायला लागला आहे. ती काळाची गरज बनत चालली आहे. त्यादृष्टीकोनातून न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स मधील पदवीधरांना चांगली संधी निर्माण होत आहे. आहाराचा आणि विहाराचा थेट संबंध आपल्या शरीराशी आणि अंतर्मनाशी येत असल्याने अन्नाचे होणारे परिणामही अभ्यासले जाणे जरुरीचे असते. आहार, व्यायाम, झोप एवढेच नव्हे तर अनेक प्रकारचे मानसिक आणि शारीरिक तणाव ह्यावर मार्गदर्शन करणारे अनेक सल्लागार आहेत. अशा सल्लागारांबरोबर ह्या न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या पदवीधरांना आणि पदव्युत्तर पदव्या घेतलेल्या उच्च शिक्षित तरुणांना चांगली नोकरी मिळू शकते. आहार हा जीवनाचा आधार असतो परंतू किती, कधी आणि काय खावे ? ह्याचे ज्ञान प्रत्येकालाच असते असे नाही, काहीवेळा ज्ञान असले तरी भान रहात नाही. याबाबत सल्ला देणारे आहारतज्ञ उपलब्ध असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते. न्यूट्रिशनॅलिस्ट हा आता उत्तम व्यवसाय झाला आहे. आहार आणि विहार ह्याकडे लक्ष दिले जात नसेल तर त्याचा परिणाम मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर झाल्याशिवाय रहात नाही. एकूणच संपन्नता, बदलती जीवनशैली, आहाराकडे दुर्लक्ष आणि हातात पैसा ह्यामुळे मग वजन वाढण्याच्या आणि कालांतराने इतरही समस्या सुरु झाल्या की आहार तज्ञांचा सल्ला घ्यायला लागत आहे. ह्या सल्ल्यासाठी फीही भरपूर आकारली जाते. व्यावसायिकदृष्ट्या त्यामुळे न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स मधील करिअर पसंत करता येऊ शकते.

 

  • वैविध्यपूर्ण करिअरचे पर्याय

डाएटिशियन हा एक मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून काम करत असल्याने येणार्‍या प्रत्येकाच्या आरोग्याची जबाबदारी त्याच्यावर येत असते. डाएटिशियन हा लोकांच्या खाण्यापिण्या पासून तर वाईट सवयींवर देखील लक्ष ठेवतो आणि नियमित व्यायाम, प्राणायाम तसेच दररोजच्या आहाराचे प्रमाण ठरवून देत असतो. मोठमोठ्या दवाखान्यामध्येही रूग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एका डाएटिशियनची नेमणूक केलेली असते. खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्या देखील नवीन ब्रॅंड तयार करण्याआधी ज्येष्ठ डाएटिशियनचे मार्गदर्शन घेत असतात. ‘डाएटिक्स’ अर्थात आहार शास्त्रात खाण्या-पिण्या संबंधित माहिती देऊन आरोग्य कसे चांगले ठेवता येईल, याचा अभ्यासक्रम असतो. हल्ली डाएटविषयीची जागरूकता भयंकर वाढली आहे. एकप्रकारे जनसेवा म्हणून देखील  डाएटीशियन म्हणून करीयर करण्याची चांगली संधी युवापिढीसमोर आहे. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी डाएटिंगवर लोक हजारो रुपये खर्च करत आहेत. डाएटिशियन क्लबचे सदस्य होऊन सातत्याने सल्ला मार्गदर्शन घेणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.

सध्याच्या धकाधकीच्या काळात फिटनेसला खूप महत्त्व आलं आहे. आरोग्याबाबत लोक जागरूक, सजग होत आहेत. म्हणूनच फिटनेस ट्रेनरला खूपच वाव आहे. डाएट, न्यूट्रिशन, योगाचे अभ्यासक्रम पूर्ण करून फिटनेस ट्रेनर, न्यूट्रिशन एक्सपर्ट म्हणून काम करता येतं. कामाच्या अनियमित वेळांचा साहजिकच खाण्याच्या वेळांवरही अनावधानाने परिणाम होत असतो. त्यात सध्या जंक फूडचं महत्त्व लक्षात घेता, आहाराचं वेळापत्रक डळमळीत झालेलं आढळतं. अयोग्य आणि अनियमित वेळेला अन्नसेवन केल्यामुळे विविध आजार बळावतात. हे लक्षात आल्यामुळे आहाराविषयी लोकं जागरूक झाले आहेत. त्यातूनच आहारतज्ज्ञ किंवा डाएटिशिअनची गरज निर्माण होत चालली आहे. न्यूट्रिशन आणि डायटेटिक्सचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पुढीलप्रमाणे विध्यार्थ्यांना निरनिरळ्या ठिकाणी विविध प्रकारे काम करण्याची संधी मिळू शकते.

  • क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट : खाजगी हॉस्पिटल्स, ओपीडी आणि नर्सिंग होम्स मध्ये क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट काम करू शकतात. तेथील रुग्णांच्या आजारानुसार त्यांना आहाराचा तक्‍ता बनवून देणे किंवा तत्सम सूचना देणे असे काम करणे ह्यामध्ये अपेक्षित असते.
  • न्युट्रिशन अ‍ॅडव्हायझर : हे तज्ज्ञ कोणत्याही संस्थेशी निगडित न राहता देखील डॉक्टर असल्यास स्वतंत्र प्रॅक्टिस करू शकतात. लोकांना पोषणाशी निगडित सल्ला आणि मार्गदर्शन ते करू शकतात. स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करणेही शक्य होऊ शकते.
  • कम्युनिटी न्यूट्रिशनिस्ट : सरकारी आरोग्य संस्था, हेल्थ अँड फिटनेस क्लब आणि डे केअर सेंटर अशा ठिकाणी ह्या व्यक्‍ती काम करू शकतात. ह्या क्षेत्रात कोणत्याही एका व्यक्‍तीसाठी किंवा व्यक्‍तिगत पातळीवर काम न करता एखाद्या विशिष्ट समाजावर किंवा समुदायावर लक्ष केंद्रीत केले जात असते.
  • न्यूट्रिशनिस्ट : न्युट्रिशनिस्ट हे क्लिनिकल आणि आहारशास्त्र यांतील तज्ज्ञ असतात. मोठ्या संस्थांमध्ये काम करणारे तज्ज्ञांचे व्यवस्थापन करण्याचे काम ते करत असतात. त्याशिवाय यांना न्यूट्रिशनिस्ट किंवा आहारतज्ज्ञ म्हणून व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही सोपवली जाते. त्याशिवाय कोणत्याही संस्थेशी निगडित न राहता डॉक्टर सारखी स्वतंत्र प्रक्टिस करू शकतात. लोकांना आहार आणि पोषण यांच्याशी निगडित सल्ला व मार्गदर्शन देऊ शकतात. त्यामुळे स्वतंत्रपणे काम करण्याची संधी यात मिळू शकते.

 

  • न्यूट्रिशन आणि डायटेटिक्सच्या अभ्यासक्रमासाठी पर्याय

न्यूट्रिशन आणि डायटेटिक्समध्ये करिअर करण्यासाठी बारावी मध्ये भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेऊन शिकलेल्या विद्यार्थ्यांना होम सायन्स, फूड सायन्स आणि प्रोसेसिंग म्हणजे आहारशास्त्र आणि प्रक्रिया ह्या विषयांसह शास्त्र शाखेची पदवी मिळवता येते. फूड सायन्स अँड मायक्रोबायोलॉजी, न्युट्रीशन, न्यूट्रीशन अँड फूड सायन्स आणि न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स ह्यामध्ये बी एस सी ऑनर्स ही पदवी मिळवता येते. त्याशिवाय डायटेटिक्स अँड न्युट्रिशनमध्ये डिप्लोमा आणि फूड सायन्स अँड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये डिप्लोमा करता येऊ शकतो. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर याच विषयांमध्ये पदवुत्तर पदवी घेता येऊ शकते, एम एस सी करता येते. ह्या क्षेत्रात संशोधन करण्यास देखील वाव आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना ह्या क्षेत्रात खूप वाव मिळतो. आहार शास्त्राची पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांना एम.एस सी. ला एक्झरसाईज फिजिशियन आणि न्यूट्रिशन असे विषय स्पेशलायझेशनला असतात. एसएनडीटी विद्यापीठातही असा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. गुरू नानक विद्यापीठ, लुधियाना; इंदिरा गांधी शरीर शिक्षण विद्यापीठ, नवी दिल्ली; तसेच मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई; नागपूर युनिव्हर्सिटी, नागपूर; दिल्ली विद्यापीठ, दिल्ली; इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी, दिल्ली याही विद्यापीठात हे अभ्यासक्रम आहेत.

— विद्यावाचस्पती विद्यानंद
vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..