प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुधीर तेलंग हे वृत्तपत्र वाचकांमध्ये लोकप्रिय होते. सुधीर तेलंग यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून नेहमीच सामान्य माणसाच्या व्यथा मांडल्या.
सुधीर तेलंग यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९६० बिकानेर येथे झाला.
सुधीर तेलंग यांना लहानपणापासून व्यंगचित्रे काढण्याची आवड होती. सुधीर तेलंग लहानपणी तैलंगला टिनटिन फँटम आणि ब्लॉंडी यांसारखे कॉमिक्स पाहायचे. याची त्यांना भुरळ पडली होती. ज्याने त्याला व्यंगचित्रे काढण्यासाठी प्रोत्साहित केले होते. त्यांचे पहिले व्यंगचित्र १९७० मध्ये वयाच्या १० व्या वर्षी वर्तमानपत्रात प्रकाशित झाले होते.१९८२ मध्ये त्यांना मुंबईत इलस्ट्रेटेड विकलीत काम करण्याची संधी मिळाली. १९८३ मध्ये ते नवभारत टाइम्समध्ये दिल्लीत रूजू झाले व नंतर अनेक वर्षे हिंदुस्तान टाइम्समध्ये काम केले.
त्यांनी हिंदुस्तान टाइम्स, दी इंडियन एक्सप्रेस, दी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांत व्यंगचित्रकार म्हणून काम केले.तेलंग यांनी वृत्तपत्रांतील व्यंगचित्रांतून मुख्यतः राजकीय तसेच सामाजिक परिस्थितीवर वेळोवेळी बोलके भाष्य केले. रेषेवरील हुकूमत हे तेलंग यांच्या व्यंगचित्रांचे प्रमुख वैशिष्ट्ये. त्यांनी इंदिरा गांधी,राजीव गांधी,अटल बिहारी वाजपेयी, पी.व्ही. नरसिंहराव, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांना आपल्या कलेतून फटकारे दिले होते. २००९ मध्ये त्यांनी नो प्राइम मिनिस्टर नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले ज्यात मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील व्यंगचित्रे आणि चित्रे होती. कार्टूनिंग कलेतील योगदानाबद्दल सन २००४ मध्ये केंद्र सरकारने पद्मश्रीने त्यांचा सन्मान केला होता.
सुधीर तेलंग यांचे ६ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply