आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत परकीय चलन मिळवून देणाऱ्या पिकामध्ये काजूचा तिसरा नंबर लागतो. या पिकामुळे परकीय चलन मिळवून आर्थिक परिस्थिती जर सुधारतेच पण त्याचबरोबर रोजगाराची संधीही उपलब्ध होते. हे पीक ४०० वर्षापासून पोर्तुगीजांनी भारतात आणले. याचा मुख्य हेतू जमिनीची सुधारणा करणे हा होता. जंगलामध्येही मिळू शकणारे पीक आहे.
हे जरी खरे असले तरी काजू हे पीक जगात सर्वत्र आढळते. याचे उत्पन्न विशेषतः ब्राझील, पोर्तुगीज वगैरे सर्वत्र मिळते. काजू हे फळ असल्यामुळे त्याचे दोन प्रकार असतात. ते म्हणजे काजूचे फळ व दुसरे म्हणजे काजूच्या बिया, काजूच्या फळाला बोंड असे म्हणतात. या फळापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. जसे फेणी (एक दारू) जॅम, जेली, विनेगर, लोणचे, सिरप, ज्यूस इत्यादी पदार्थ प्रचंड तयार करता येतात. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या पदार्थांना प्रचंड मागणी असते.
काजू हे नुसतेच फळ नाही तरी ते एक अत्यंत औषधी आहे. यात तंतू जीवनसत्त्वे तसेच खनिज द्रव्ये इत्यादी बरेच पदार्थ वापरता येतात. काजूमध्ये शक्ती प्रचंड असते.
त्याचप्रमाणे यात मँगनीज, पोटॅशियम, लोह, तांबे, मॅग्नेशियम, जस्त आणि सेलेनिथम सारखे खालील द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. काजूच्या बिया खाण्यात फारच गोड असतात. त्यात खारावलेले काजू हे पार्टी, समारंभ वगैरेसाठी सर्रास वापरतात. काजू निरनिराळ्या प्रकारचे असतात. यात काही फारच लहान, काही मोठे तर काही बरेच मोठे असतात. याची किंमत दर्जावरून ठरते. काजू तुटले तर अशा काजूची पाकिटेही बाजारात मिळतात. शेव, चिवडा तसेच मसाले भात, बिर्याणी व उपमा वगैरे काजूचा वापर करता येतो. यात लोकांना सर्वात मोठा फायदा म्हणजे काजू कोलेस्ट्रेरॉल शून्य असतात.
– मदन देशपांडे
Leave a Reply