नवीन लेखन...

श्रीपाद रेडीओचे मालक व रेडीओचे संग्राहक श्रीपाद कुलकर्णी

श्रीपाद कुलकर्णी १९७८ साला पासून रेडिओचे संग्रह करत आहेत. श्रीपाद कुलकर्णी यांनी १९७८ साली चिपळूण येथे नोकरीला असताना एका स्थानिक स्टोअरमधून विकत घेतलेला फिलिप्स रेडिओ सेट हा त्यांचा पहिला सेट. श्रीपाद कुलकर्णी यांच्या कडे ४० हून अधिक vintage रेडिओ सेट्स आहेत. […]

जर प्रत्येकानं असा छंद बाळगला तरी…..

जर प्रत्येकानं असा छंद बाळगला तरी हजारो कुटुंबांच्या भाकरीची सोय होईल … अकलूज गावचा एक माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो. हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात. अलीकडे […]

सईचा अनोखा चॉकलेट रॅपर चा संग्रह

खाऊन झाल्यावर कचरा म्हणून फेकून देण्यात येणारया देशी विदेशी  चॉकलेट रॅपरचा अनोखा संग्रह  तुमसर जि भंडारा येथील सई जगदीश फाले या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी केला असुन तिचा संग्रह बालपणाच्या आठवणी ताज्या करणारा ठरला आहे.  […]

छंद 

प्रसिद्ध लेखक व पु काळे त्यांच्या वपुर्झा या पुस्तकात असं म्हणतात कि, माणसाला काही ना काही छंद हवा. स्वप्नं हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे ‘हरवणं-सापडणं’ प्रत्येकाचं निराळं असतं. […]

संक्रांतीचा “संग्राह्य” तिळगुळ !

मकरसंक्रांतीला पूर्वी अनेकजण शुभेच्छा पत्रे पाठवीत असत.त्याला “भेटकार्ड” म्हटले जाई. वर एखादे फुलाचे चित्र, आत हलव्याचे ८ / १० दाणे असलेले कागदी पाकीट आणि ” तिळगुळ घ्या, गोड बोला. मकरसंक्रांतीचे अभिष्टचिंतन !” असा मोजकाच मजकूर असे. आता ते जवळपास बंदच झाले आहे. […]

स्वामी सावली दीप !

मनातील भक्ती , दिव्याचा मंगल प्रकाश आणि भिंतीवर प्रकटणारे स्वामी पाहताना … तूर्यावस्थेत जायला फार वेळ लागत नाही. […]

करंज्यांचा ” ब्युटिशियन ” !

माझ्या संग्रहातील विविध ” कातणी ” ! नवरात्र आणि दसऱ्याची धावपळ संपली की साहजिकच दिवाळीचे वेध लागतात. सगळ्या आघाड्यांवर जोरदार तयारी सुरु होते. दिवाळीचा सण साजरा करण्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे फराळ आणि मराठी फराळातील करंज्या हा अगदी महत्वाचा आणि शुभ पदार्थ आहे. फराळाचे पदार्थ बनवायला करंज्या बनवून शुभ मुहूर्त केला जातो. लग्न-मुंजीत केळवणांसाठी, मुंजीत भिक्षावळीसाठी, […]

मोतियाचे प्रकाशमान कंदील

श्रावण संपला की पाठोपाठ सणाचा मौसम सुरु होतो. गणपती, नवरात्री आणि मग सगळ्यांचा आवडता सण दिवाळी. दिवाळी म्हटली की त्याच्यासोबत दिवे, पणत्या, आकाशकंदील या सगळ्या वस्तू येतातच. थर्माकोल, कागद, प्लास्टिक या निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या आकाश कंदिलांपेक्षा वेगळ्या वस्तू वापरून त्याचे आकर्षक आकाश कंदील बनवण्याचा निर्णय घेतला विलेपार्ले येथील नंदिनी जोशी यांनी. २०१४ च्या डिसेंबरमध्ये एका ठिकाणी […]

दगडांच्या देश

हाराष्ट्र देशीचे हे राकट -कणखर दगड आतून अस्सल हिरे आहेत हे प्रत्यक्ष पाहायचे असेल तर नाशिक – शिर्डी मार्गावरील सिन्नर MIDC मधील, अशा अत्यंत बहुमोल किंबहुना ज्यांचे मोलच होऊ शकणार नाही अशा दगडांचे अप्रतिम “गारगोटी संग्रहालय ” पाहायला हवे. […]

एक “कृष्णचिन्ह ” !

हिंदूंच्या देववैविध्यात भगवान श्रीकृष्ण हा मोठा लोकप्रिय देव ! हिंदूंचा धर्मग्रंथच ज्याने निर्माण केला असा हा अद्वितीय तत्ववेत्ता ! अत्यंत सात्विकतेने वागतानाच वेळ पडल्यास ” नरो वा कुंजरो वा ” म्हणणारा, स्थानिकांना कमी पडते म्हणून दही-दूध-लोणी बाहेर नेण्यास प्रतिबंध करणारा, १६ सहस्र नाडयांवर ( नारींवर नव्हे) हुकूमत असलेला योगीराज, नृत्य,सूर आणि स्वरराज्य यावर ज्याचे अधिपत्य होते […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..