दिसें वांयां गेलों
सत्तरीच्या दशकात वयात आलेली तरुण मुलं आणि त्यांच्या जगण्याचं भान या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. मात्र ते सत्तरीच्या दशकापुरते मर्यादित नाही. चक्रधर, या कादंबरीचा नायक, अशा पिढीचा प्रतिनिधी आहे. तो समूहात असूनही एकाकी आहे. चक्रधरचा आणि त्याच्या पिढीचा हा प्रवास अरविंद रे यांनी मोठ्या ताकदीने चित्रित केला आहे. […]