नवीन लेखन...

कृषी, शेतीविषयक माहिती, घडामोडी यावरील लेखन

भुताचे झाड : सप्तपर्णी वृक्ष

सातवीण किंवा सप्तपर्णी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.सात पर्णदले म्हणजे सात संयुक्त पाने असलेला वृक्ष म्हणून या वृक्ष्याचे नाव सप्तपर्णी किंवा सातवीन. सरळ वाढणारे खोड, लवकर होणारी वाढ आणि फांद्यांची विशिष्ट ठेवण असलेले हे झाड सदाहरित म्हणजेच वर्षभर हिरवेगार राहणारे झाड म्हणून परिचित आहे. […]

सौंदर्य व लावण्य असलेला : ताम्हण वृक्ष

ताम्हण (किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae) हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. […]

औषधी बिब्बा वृक्ष

औषधी बिब्बा वृक्ष आपल्या मराठी एक म्हण आहे. कामात बिब्बा घालणे म्हणजे चांगल्या कामात अडथळा आणणे. कारण काटा टोचला किंवा पायाला कुरूप झाले तर त्यासाठी बिब्ब्याचे तेल वापरतात. त्यासाठी बिब्बा चमच्याच्या किंवा पळीच्या टोकावर टोचून मेणबत्तीवर धरल्यावर त्याच्या उष्णतेने जे तेल निघते ते गरम असतानाच त्याचा चटका कुरूप झालेल्या ठिकाणी किंवा काटा मोडलेल्या ठिकाणी देतात. हा […]

ऑर्किडचे रंगबिरंगी विश्व

सपुष्प वनस्पतींच्या मध्ये फुलांचे वेगवेगळे आकार, प्रकार, रंग, वास, अधिवास असतात. अगदी टाचणीच्या टोका पासून १-२ मीटर व्यास असणारी रेफ्लेशिया सारखी फुले बघायला मिळतात. त्यामध्ये ऑर्किडच्या फुलांची रंगविविधता, फुलांची आकर्षक रचना, मन मोहित करते. ऑर्किड फुलांची सौंदर्य, जटिलता आणि अविश्वसनीय विविधता वनस्पती जगात अतुलनीय आहे. या विदेशी सुंदरतेमध्ये पृथ्वीवरील फुलांच्या रोपांच्या सर्वात मोठ्या कुटूंबाचा समावेश आहे, […]

रूपगंध बकुळ वृक्ष

हे झाड उत्तम सावली व सुंगधी फुले यामुळे ते लोकप्रिय आहे. दरवळ म्हंटल की, फुलांचा असं एक समीकरण आहे. फुलांचे अनेकविध प्रकार आणि मनात भरून टाकणारे त्यांचे सुवास. प्रत्येक फुलाचा वास वेगळा आणि रुबाब त्याहून वेगळा. सुगंधाची उधळण करणारी अशी कित्येक फुलं आहेत परंतु मूकपणा जवळ बाळगणारी अशी ही बकुळच. […]

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ५ : शेवगा – एक सुपरफूड

आपला भारत देश फळं, भाज्या यांच्याबाबतीत खूप समृद्ध आहे. मांसाहाराच्या तुलनेत इथं शाकाहाराला अधिक प्राधान्य दिलं जातं. आयुर्वेदासारखी अनमोल देणगीही आपल्याला लाभली आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या अनेक भाज्यांचे औषधी गुणधर्म आता जगालाही पटले असून, जगभर त्याचा प्रसार होत आहे. अशीच एक भाजी आहे शेवग्याची शेंग. शेवगा हे फक्त झाड नाही तर ती निसर्गाने मानवाला दिलेली देणगी […]

निर्गुण्डी – एक चित्तवेधक महाऔषधी

निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्ये निरगुडीचा समावेश होतो […]

बहुपयोगी गुग्गूळ

गुग्गुळ ही भारतातील एक औषधी आहे. धार्मिक कार्यक्रमात हिचा उपयोग धुपावर टाकण्यासाठी करतात. ही जंतुघ्न आहे. गुग्गूळ हा बर्सेरेसी कुलातील मध्यम उंचीचा एक पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव कॉमिफोरा मुकुल आहे. शुष्क वातावरण आणि खडकाळ जमिनीवर हा वृक्ष वाढतो. भारतात मुख्यत्वे उत्तर भारतातील राज्यांमध्ये तो आढळतो. गुजरात आणि राजस्थानमध्ये बेसुमार तोडीमुळे तो दुर्मिळ झाला असल्याने या वृक्षाचा समावेश नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींच्या यादीत करण्यात आला आहे. […]

जेष्ठ नागरिकांचा साथी – जेष्ठमध

ज्येष्ठमध हे बहुगुणी औषध असून त्याचा वापर पित्तनाशक म्हणून देखील केला जातो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुद्धी देखील तेजस्वी बनते. ज्येष्ठमध वात आणि कफच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे. […]

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा – भाग २ – सुगंधित चंदनवृक्ष

सुगंधी तेलासाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. हा वृक्ष सँटॅलेसी कुलातील असून जगभर चंदनाच्या साधारणपणे २५ जाती आहेत. हा मूळचा भारतीय वृक्ष असून भारत, चीन, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटांमध्ये याची लागवड करण्यात आली आहे. कोरडया भागात समुद्रसपाटीपासून सु. १,२०० मी. उंचीपर्यंत चंदन मोठया प्रमाणात आढळतो. कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. कर्नाटक राज्यात म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी या वृक्षावर आधारित अनेक लघुउद्योगांचा विकास झालेला दिसून येतो. याच्या सुवासिक गुणधर्मामुळे अनेक शतकांपासून ह्याचा वापर, लागवड व व्यापार चालत आला आहे. परंतु याच कारणामुळे या वृक्षाचे वन्य (Wild) वाण सध्या नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या आकारमानाची लाकडे आता आढळत नसल्यामुळे फर्निचरांसाठीच्या लाकूडकामासाठी याचा वापर संपला असला, तरीही सुवासिक तैलार्कासाठी याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. […]

1 2 3 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..