मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, बीडच्या सीताफळाला GI मानांकन बीड जिल्ह्यातला किल्लेधारुर परिसर सीताफळाचं आगार म्हणून ओळखला जातो. इथल्या बालेघाटात उगवणारी सीताफळंही अतिशय गोड आणि मधूर. म्हणूनच इथल्या बालानगर जातीच्या सीताफळाला केंद्रातर्फे भौगोलिक निर्देशन म्हणजेच जीआय मानांकन मिळालं आहे. यामुळे या सीताफळांचं भविष्य आता बदलण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कमी पाण्यात, खडकाळ जमिनीत येणारं फळपीक..बालेघाटाच्या डोंगररांगा या […]
ऊस हे नगदी पीक आहे. ते पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. पश्चिम महाराष्ट्रात भरपूर ऊस होतो. तर मराठवाड्यात कमी पर्जन्यमान असल्याने येथील शेतकरी, शेतमजूर ऊसतोडीचा पर्याय निवडतो. दिवाळी – दसरा सणादरम्यान बहुतांश साखर कारखाने सुरू होतात. हंगाम सुरू होण्यासाठी बैलगाडी,ट्रॅक्टर, ट्रक यांचा वापर ऊस वाहतुक करण्यासाठी केला जातो. ऊसतोडीस मजूर लागतात. त्यांना उचल, आगावू रक्कम दिली जाते. […]
१५ नोव्हेंबर, २०१६. पुण्याहून सकाळी ६ वाजता निघून सातारा–कोरेगाव– खटाव–वडूज अशी मजल दरमजल करीत चार तासांच्या प्रवासानंतर ‘कलेढोण’ नावाच्या खटाव तालुक्यातील एका छोटयाशा गावात माझ्या ‘स्वयंसिध्द शेतकरी’ या कार्यशाळेसाठी दाखल झालो. प्रवासादरम्यान शेतकऱ्यांना भेटणे व त्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी त्यांच्याशी गप्पा मारणे या जुन्या सवयीमुळे सभोवतालच्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना शोधण्यासाठी माझी नजर भिरभिरू लागली आणि नेहमीपेक्षा आजचा […]
फळातील गराच्या रंगावरून प्रामुख्याने सफेद पेरू व गुलाबी पेरू अशा दोन जाती दिसून येतात. महाराष्ट्रात सरदार या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते. या जातीची फळे आकाराने मोठी व गोलसर असून बियांची संख्या कमी असते. फळातील गर चवीस गोड असून तो पांढऱ्या रंगाचा असतो. […]
महाराष्ट्रात पपईची लागवड प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. जास्तीत जास्त क्षेत्र तैवान, हवाई, वॉशिंग्टन, को- १ व को-७ या जातींच्या लागवडीखाली आहे. पिकलेल्या पपईच्या फळामध्ये ‘ अ’ जीवनसत्त्व असते. म्हणून त्याचा उपयोग डोळ्यांच्या विकारांमध्ये केला जातो. दंतरोग, अस्थिरोग व उच्च रक्तदाब इत्यादी रोगावरही ते गुणकारी आहे. […]
चिकूच्या झाडास वर्षभर फळे येतात. चिकूमध्ये पिष्टमय पदार्थाचे तसेच पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त असलेल्या तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असते. फळ झाडावरून काढल्यानंतर पिकत असल्याने त्यांच्यात जैवरासायनिक क्रिया अतिशय जलद घडून येतात व फळ लगेच पक्व होऊन अल्पायुषी बनते. चिकूच्या पिकलेल्या फळापासून उत्तम प्रकारची पेये व पदार्थ तयार करता येतात. […]
अमरावतीतील निमखेडच्या रौंदळे कुटुंबीयांनी शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने राबवत सामूहिक पद्धतीने शेती कशी करावी, याचा एक वस्तुपाठ इतरांसमोर ठेवला आहे. सुरुवातीला रौंदळे कटुंबियांकडे फक्त ३३ एकर शेती होती. शेतीत मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी टप्प्याटप्प्याने शेती जोडली. आता त्यांच्याकडे १३३ एकर शेती आहे. […]
सर्वसामान्य लोकांचे फळ मानले जाणाऱ्या बोर या फळाचे उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते. परंतु काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे या फळाचे फार मोठे नुकसान होते व शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. यासाठी त्यांना बोराचे विक्री व्यवस्थापन तसेच बोरापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान माहीत असायला हवे. […]