नवीन लेखन...

कृषी, शेतीविषयक माहिती, घडामोडी यावरील लेखन

आमची माती आमचं शिक्षण

परिक्षा शुल्क भरायलाही पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडून गावाकडे परतणारी शेतकऱ्याची पोरं आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकरी महाविद्यालयांपुढे रांगा लावून उभे असलेले विद्यार्थी असे विरोधाभासी चित्र सध्या दिसत आहे. कधी काळी डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न पाहणारे डोळे मातीत राबवण्यासाठी कृषी अभ्यासक्रमाकडे कसे काय वळू लागले? प्रवेश फेरीसाठी ९४ टक्के गुणांचा कट ऑफ पर्यंत कशी पोहचली? आमची माती […]

हमीचा (अ) भाव

१.‘कापसाला सात हजार रुपये प्रती क्विंटल भाव देणार, उत्पादन खर्चावर आधारीत भाव शेतकऱ्याना मिळतील, अच्छे दिन येणार’- प्रतप्रधान नरेंद्र मोदी, सोलापूरची सभा. २.सत्ता द्या, शेतमालाला भाव देतो’- राज ठाकरे, ९ ऑक्टोबर २०१४. ३.शेतमालाला भाव नाही, अस्मानी संकटात मदत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय- सेनेचे ट्विट दि. २० एप्रिल २०१४ मागील वर्षी लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाची ही […]

शेतकऱ्यांचे सारेच शत्रू !

शेतकरी संघटित झाले, तर सरकारला त्यांच्या पायाशी लोळण घेणे भाग पडेल, परंतु तसे होऊ नये याची सरकार पुरेपूर काळजी घेत असते आणि म्हणूनच शेतकऱ्यांना विभाजित करून त्यांच्यातच संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. हे कमी की काय म्हणून खते, बियाणे वगैरेंचा पुरवठा करणारे व्यापारीही त्याला लुटण्यासाठी सज्ज असतात. त्यामुळे शेवटी प्रश्न उरतो तो शेतकऱ्यांच्या हिताची काळजी […]

हा जुगार तुम्ही खेळून बघा !

शेतकरी दरवर्षी जुगार खेळतात. हाती असेल नसेल तितके शेतीत गुंतवतात, पाऊस-पाणी चांगले झाले, पिकांना थोडा बरा भाव मिळाला, तर किमान गुंतविले तितके तरी वापस येण्याची आशा असते, नफा हा प्रकार तर त्यांच्यासाठी बादच आहे आणि निसर्गाने दगा दिला, तर होत्याचे नव्हते होऊन तो भिकेकंगाल होतो. परत पुढच्या वर्षी कर्ज काढून असाच जुगार खेळला जातो, एक दिवस […]

न्याय मिळेल का न्याय?

या देशाच्या संविधानाने सामान्य लोकांना न्याय देणारे अनेक कायदे, नियम तयार केले आहेत, त्यांचे प्रामाणिकपणे पालन झाले, तरी अनेक पीडितांना सहज न्याय मिळू शकेल; परंतु हे कायदे, नियम बासनात गुंडाळून नोकरशाही आपली समांतर न्यायव्यवस्था चालविते आणि त्यात लाच दिल्याखेरीज कोणतेही काम होत नाही. खरेतर ही अनागोंदी संपविण्याचे काम निस्वार्थी, नि:स्पृह आणि धाडसी राजकीय नेतृत्वच करू शकते. […]

बळीराजा की बळीचा बकरा?

भारतासारख्या “कृषीप्रधान म्हणवून घेतल्या जाणार्‍या” देशात आज शेतकर्‍यांची जी भयानक अवस्था “मायबाप सरकार” नावाच्या व्यवस्थेने करुन ठेवली आहे त्यामुळे त्याला थेट आत्महत्येचाच मार्ग अवलंबायला लागला आहे. भारत “कृषीप्रधान” वगैरे असता तर आज शेतकरी राजासारखा राहिला असता. मात्र या “कृषीप्रधान” देशाची अवस्था गेल्या काही वर्षात “दलालप्रधान” करुन ठेवण्यात आमच्या राज्यकर्त्यांचा मोलाचा हातभार आहे. […]

शेतकर्‍यांना ‘येलो जर्नालिझम’ची डागणी

सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर ‘येलो जर्नालिझम’च्या माध्यमातून डागण्या ठेवल्या जात आहेत, शेतीचा अभ्यास न करता काहीजण, वड्याचं तेल वांग्याला, वांग्याचं वड्याला लावून लिहितायत, शेतकरी आणि शेती पुढील हे नवं संकट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्या वृत्तपत्रांनी आणीबाणीच्या काळातही कुणासमोर झुकण्याची भूमिका घेतलेली नाही, अशा वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे लिहलं जातंय. हा हट्टहास का केला जात आहे? हा […]

डाळींबाची आकाशझेप

प्रतिकूल परिस्थितीतही माणूस बरंच काही शिकत असतो. बुलढाणा जिल्हातील ज्ञानेश्वर गायकवाड या एका यशस्वी शेतकऱ्याची ही कथा. […]

कर्ज धरतीचे – अन्न (आपले भोजन)

खाण्याचे सर्व पदार्थ अन्न, भाज्या,फळे इत्यादी आपल्याला जमिनीतून मिळते, हे जमिनीचे कर्ज आहे आणि आपल्याला हे कर्ज फेडणे गरजेचे आहे. असे नाही केले तर जमीन ही आपल्यला शाश्वत व निरंतर करण्यास असमर्थ ठरेल. दुसर्‍या शब्दात बँकेप्रमाणे तिचे ही दिवाळे निघेल. हे सोपं आणि सरळ गणित आहे.
[…]

1 12 13 14 15 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..