खाण्याचे सर्व पदार्थ अन्न, भाज्या,फळे इत्यादी आपल्याला जमिनीतून मिळते, हे जमिनीचे कर्ज आहे आणि आपल्याला हे कर्ज फेडणे गरजेचे आहे. असे नाही केले तर जमीन ही आपल्यला शाश्वत व निरंतर करण्यास असमर्थ ठरेल. दुसर्या शब्दात बँकेप्रमाणे तिचे ही दिवाळे निघेल. हे सोपं आणि सरळ गणित आहे. […]
रोज वाढणार्या लोकसंख्येचे प्रमाण आणि नैसर्गिक स्त्रोतांचे अल्प प्रमाण यापुढे मागणी-पुरवठ्याचे व्यस्त गणित भूक, कुपोषण आणि प्रदूषणावर मात करण्यास असमर्थ ठरणार आहेत. येणार्या काळात वाढत्या लोकसंख्येला आळा घातला नाही तर माणसाला जीवन जगण्यासाठी पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक स्त्रोत कमी पडतील. […]
उर्जेचा प्रश्न सोडविण्याच्या नादात स्थानिकांचे दैनंदिन जीवन भकास आणि उजाड होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. अणुऊर्जानिर्मिती प्रक्रियेत हवा, पाणी, आणि पर्यावरण प्रदूषणासकट काही वेळा वैचारिक प्रदूषण होऊन स्थानिकांस व पोटापाण्याच्या व्यवसायास बाधा पोहोचार नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. जपानसारखी परिस्थिती निमार्ण झाल्यास त्याला कसे तोंड देणार? ह्यासाठी प्रकल्पा नजीकच्या नागरिकांचे जीवन सुरक्षित असणे गरजेचे आहे. […]
पत्रात आपण आपले परखड आणि प्रांजळ विचार मांडून सरकारचे कुठे चुकते, कसा भ्रष्टाचार होतो, कसे चुकीचे निर्णय घेतले जातात, अणुउर्जेपेक्षा सौर उर्जा कशी स्वत आहे, सौर उर्जेचा वापर केल्याने वीज कशी स्वत मिळू शकते, निसर्गाचा पर्यायाने वातावरणातील तापमानाचा आणि पर्यावरणाचे रक्षण कसे चांगल्या रीतीने करता येते, विजेची बचत म्हणजेच वीज निर्मिती याचे विश्लेषण खुपच चांगल्या रीतीने केले आहे. […]
आपल्या प्रत्येकाला कधी जमिनीचे, राहायच्या जागेचे, किंवा गावाच्या शेती संबंधित व्यवहारासाठी गावाच्या तलाठ्याकडे तर कधी तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कचेरीत जाण्याची वेळ येते. अश्या कार्यालयीन कामकाजात बर्याच वेळा ७/१२ (सात बारा), गाव नमुना किंवा हक्काचे पत्रक किंवा गाव नमुना नंबर ६ (फेरफार) असे शब्द वारंवार कानावर पडतात पण त्याचा अर्थ लागत नाही. […]
मानवाने निसर्गावर सातत्याने केलेल्या कुरघोडीने ऋतुमानात बदल होत आहेत. कुठे जास्त पाऊस पडून ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते तर काही ठिकाणी पाऊस कमी पडून कोरडया दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना दाहीदिशा भटकंती करावी लागते. […]
विविध आजारांवर रामबाण औषध असलेले आळींबी (मशरूम) हे बुरशीजन्य पिक आहे. महाराष्ट्राच्या वैदर्भीय जंगलांमध्ये नैसर्गिकरीत्या उगवणारी आळींबी (मशरूम)अत्यंत चवदार असते. शेतातील टाकाऊ संसाधनांचा वापर करून निर्यातक्षम आळींबी (मशरूम)चे उत्पादन करणे शक्य आहे. […]
सर्वांनी मिळून २००६ मध्ये ‘श्री सत्यनारायण केळी प्रकल्प’ हाती घेतला. ५० एकर क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्याचा निश्चय करण्यात आला. त्यापैकी ३० एकर या शेतकऱ्यांच्या मालकिची तर २० एकर मुंबईला राहणाऱ्या नातेवाईकांकडून भाडेपट्टयावर घेतलेली होती. ही सर्व जमीन पडीक स्वरूपाची होती. प्रारंभी शेतीच्या यशाविषयी अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या. […]
नोकरीच्या मागे न लागता स्वमेहनतीने बेसखेडा जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या श्री रवी पाटील या होतकरु तरुणाने दुग्धव्यवसायात क्रांती घडविली आहे. पुणे येथील एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘चॅलेंज’ म्हणून त्याने दुग्धव्यवसाय स्विकारला आणि यशस्वीही करुन दाखविला. कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न बाळगता परिश्रमाने या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करुन जिल्ह्यातील युवकांसाठी तो आदर्श ठरला आहे. कुटूंबाने शेतकरी असलेल्या या युवकाने शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देऊन ही किमया साधली आहे. […]