दिल्लीच्या सरहद्दीवर सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस वेगवेगळे वळण मिळत आहे. इतके दिवस शांततापूर्ण रीतीने सुरू असलेल्या या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसेचे गालबोट लागले. आता हे आंदोलन गुंडाळले जाणार! असे वाटत असतानाच शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी आंदोलनाला नवीन ऊर्जा मिळून दिली आणि आंदोलन पुन्हा जोमाने सुरू झाले. आता तर या आंदोलनाचे ट्विटरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. […]
आमच्या विहिरीत असलेलं नितळ पाणी पाहिलं आणि हातात घेतलं कि हीच आपली संपत्ती असं वाटतं. शेतावर असलेली झाडे पाने, शेतांचे बांध, खळा, भाजीचा मळा आणि शेतातली माती हे सगळं पाहिलं की हा सगळा आपला वारसा असल्याची भावना निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. […]
रंग बदलण्याची गोष्ट निघाली तर सरड्याचे नाव पहीले घेतले जाते मात्र नागपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या आभोरा जंगलातील खोलेश्वर(कोलेश्वर) पहाडावर एक असं झाड पाहावयास मिळतं की ते बदलत्या रूतूनुसार आपला रंग बदलतं. ह्या जादूई वृक्षास परीसरात करू चे झाड म्हणून ओळखल्या जाते. […]
शेतकरी केंद्रिबदू मानून बाजार समित्यांची रचना करण्यात आली. मात्र, ह्या समित्या आज राजकारणाचे अड्डे बनल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था निर्माण करणे जरुरीचे म्हणावे लागेल. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणलेली इ -नाम प्रणाली बाजारपेठ म्हणून शेतकऱ्यांसाठी पर्याय ठरु शकेल काय? हा एक चिंतनीय प्रश्न आहे. […]
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकर्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवले पाहिजे. […]
देशावर किंवा घाटावर जशा एकेक शेतकऱ्याच्या 20 एकर 50 एकर जमिनी असतात तशा आमच्या ठाणे जिल्ह्यात फारशा लोकांच्या नाहीत. आता कोणी राजकारणी लोकांनी घेतल्यात शेकडो एकर पण आम्हा सर्वसाधारण आगरी शेतकऱ्यांच्या जमिनी या जेमतेम चार एकर पासून जास्तीत जास्त आठ ते दहा एकर पर्यंतच. आता आमच्या पिढीच्या वाटणीला एखादा एकर आली तरी खूप जमीन आहे असे वाटावे. […]
‘दैव देतं अन कर्म नेतं’ ही म्हण शेतकऱ्यांच्या बाबतीती नेमकी उलटी लागू होते. काळ्या आईला घामाचा अभिषेक करून शेतकरी आपल्या ‘कर्मा’ने हिरवेगार रान फुलवतो. मात्र, त्याचं ‘दैव’ त्याला साथ देत नाही. कधी अवकाळी पाऊस, गारपीट कधी अवर्षण तर कधी रोगांचा प्रादुर्भाव एकपाठोपाठ एक संकटे त्याच्या मागे लागलेली असतात. […]
आमच्या ठाणे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात बळीप्रतिपदेला भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावातल्या चावडीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर पेटवण्यात येते. हा पेंडा पेटवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून व आगीच्या ज्वालांमधून गावात असणारी सगळी गुरे ढोरे एका बाजूकडून दुसरीकडे नेली जातात. पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेली ही प्रथा आजही गावोगावी त्याच उत्साहात सुरू आहे. […]
तारफुल म्हणजे नावावरून कोणाला वाटेल की कुठल्या तरी रानटी किंवा जंगली फुलांचा प्रकार आहे. पण तारफुल म्हणजे ताडाच्या झाडाला येणारे फळ आमच्या आगरी भाषेत ताडफळाला तारफुल बोलतात. उन्हाळ्यात थंडगार व गोड गोड ताडफळा साठी हल्ली खूप मागणी होत आहे. […]
केवळ भाताचे रोप असे आहे जे एका शेतातून काढून दुसऱ्या शेतात लावले की त्याला भरघोस पीक येतं. त्यामुळेच आपल्याकडे लग्न लावताना अक्षता म्हणून तांदळाचे दाणे डोक्यावर उडवले जातात. म्हणजे एका घरातील मुलगी दुसऱ्या घरात गेल्यानंतर ती ज्या घरात जाईल तिथे भरभराटी आणि समृद्धी येईल असे काहीसे शास्त्र आहे असे बोलले जाते. […]