काही माणसं उपजतच कलेचं लेणं घेऊन आलेली असतात. ती इतकी मोठी असतात पण तरीही प्रसिद्धिपराङमुख असतात. `राष्टपतीपदक’ विजेते.. चित्रकार प्राध्यापक गजानन शेपाळ हे अशांपैकीच एक. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र म्हणजे प्रा. शेपाळ यांचीच देणगी…. याच चित्रासाठी त्यांना राष्टपतीपदकाने गौरवण्यात आले. […]
श्रावण संपला की पाठोपाठ सणाचा मौसम सुरु होतो. गणपती, नवरात्री आणि मग सगळ्यांचा आवडता सण दिवाळी. दिवाळी म्हटली की त्याच्यासोबत दिवे, पणत्या, आकाशकंदील या सगळ्या वस्तू येतातच. थर्माकोल, कागद, प्लास्टिक या निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या आकाश कंदिलांपेक्षा वेगळ्या वस्तू वापरून त्याचे आकर्षक आकाश कंदील बनवण्याचा निर्णय घेतला विलेपार्ले येथील नंदिनी जोशी यांनी. २०१४ च्या डिसेंबरमध्ये एका ठिकाणी […]
दळणवळणाची अपुरी साधने आणि शेतीवर पोट असलेल्या या कलावंतांने अखेरपर्यंत कलेची कास सोडली नाही. काही वर्षांपूर्वीच पडद्याआड गेलेले बाबी नालंग आणि बाबी कलिंगण हे दोन दशावतारी कलेचे शिलेदार होते. “श्री. बाबी कलिंगण यांना राज्यस्तरीय लोककला पुरस्काराने गौरविण्यात आले होते “.सिंधुदूर्गात दशावतारी म्हणजे ” रात्री राजा आणि सकाळी कपाळावर बोजा ” अशी स्थिती एके काळी होती. त्या वेळपासून लोककलेची सेवा हाच परमधर्म असे समजून हा कलाकार राबला त्याची शासनाने दखल घेतली हे बरं झालं. […]
आमच्या दीड दिवसाच्या गणपतीसाठी पूर्वी मी खूप मोठी सजावट करीत असे. शेकडो मंडळी आवर्जून भेट देत असत. पण आता अशी सजावट वयोमानानुसार शक्य होत नाही. तरीही गणेशोत्सव आला की आतली उर्मी मला शांत बसूही देत नाही. मग थोडीशी सजावट करतोच ! […]
मुंबईत माटोळी पाहायला मिळणे हेच दुर्मिळ आहे. गोव्यामध्ये माटोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकेका माटोळीला ४०० किंवा त्याहूनही अधिक फळे- भाज्या बांधल्या जातात. […]
कोणतीही निर्मिती होताना प्रत्यक्ष त्याचं साक्षिदार असणं, हा विलक्षण आनंदाचा भाग असतो. निर्मिती, मग ती कोणतीही असो, ती देखणीच असते असं मला वाटतं. माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर एक सुतारकामाचा कारखाना होता. माझं लहानपण हे लहानपणी जसं असावं तसंच होतं, आतासारखं ते मोठ्यांसारखं झालेलं नव्हतं. अभ्यास, तोही चोख, शाळेच्याच वेळेत करायची पद्धत होती. तो एकदा केला, की मग पुढचे अनेक तास गंमतीचेच असतं. क्लास ह्या शब्दाचा जन्मही झाला नव्हता तेंव्हा. त्यामुळे अभ्यास हा शाळेतच करायचा असतो, असं तेंव्हा आम्हाला वाटे. शाळेचे दोन-पाच तास सोडले, तर रात्री झोपेपर्यंतचा वेळ हा मजेचाच होता. […]
सध्याच्या तांत्रिक युगात आपली कलात्मकता जोपासून त्यात करिअर करायचं असल्यास गरज असते ती तिव्र इच्छाशक्तीची. सातत्याने प्रयत्न, अॅकेडेमिक पातळीवर अभ्यास आणि रियाझ केला तर आपली कला किंवा आवड कायमस्वरुपी आपल्या आयुष्यात टिकवता येते. आत्मिक सुख देणारी भरतनाट्यम ही अशीच एक कला. यात भाव-रस-राग-ताल, कथानक किंवा एखादा वर्तमान मुद्दा सादर करण्यासाठी नाटकाचा समावेश केला जातो. कल्पकता आणि […]
कथक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी कथक एक आहे. कथक ही प्राचीन शैली मानली जाते कारण तिचा उल्लेख महाभारतातही केलेला आहे.हल्लीच्या काळात या नृत्यप्रकारामधून कृष्ण कथा सादर केल्या जातात.कथक ह्या शब्दाचा उगम ‘कथा कहे सो कथक’ असा सांगितला जाते. म्हणजेच हावभाव आणि हाताच्या व पायाच्या हालचाली वापरून कथा सांगणाऱ्या व्यक्तींपासून कथक […]
नृत्य हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. सालसा किंवा हिप-हॉप या नृत्यशैली मानवाच्या ज्ञात इतिहासात उदयाला आल्या. परंतु भारतीय शास्त्रीय नृत्यशैली मात्र त्याही आधीच्या आहेत. देवी- देवता या शास्त्रीय शैलींमध्ये नृत्य करतात, असं आपल्याकडे मानतात. शास्त्रीय या शब्दाचा अर्थ – शास्त्राला धरून किंवा शास्त्रावर आधारित असं नृत्य. शास्त्रीय नृत्याला चौकट असते, बंधन असतं, नियम असतात. […]