एव्हरग्रीन गाणे – “जाने कहा गये वो दिन”
हे गाणे तुम्हाला तुमच्या त्या खास जुन्या दिवसात घेऊन जाते. तुमच्या आठवणी जाग्या करते. मनाच्या आतल्या संवेदना हलवून सोडते. जुने दिवस वाईट असले किंवा चांगले असले तरी “हरवलेले” असतात आणि जे हरवलेले असते त्याची चुटपुट आणि ओढ तितकीच तीव्र असते. त्या चुटपुटीची आणि तीव्रतेची जाणीव ह्या एव्हरग्रीन गाण्यात भरलेली आहे. […]