तेरे मेरे बीचमे कैसा हैं ये बंधन !
” एक दूजें के लिये ” ने १९८१ साली धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या प्रत्येक आघाडीवर ( अभिनय, गीत, संगीत, पार्श्वगायन, गोव्याची नयनरम्य पार्श्वभूमी ) हा चित्रपट देखणेबल होता. “बॉबी” नंतर ची ही तुफान गाजलेली प्रेमकथा (शेवट सुखांत नसला तरीही). कमल आणि रती ही नवोदित फ्रेश जोडी देणारा हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी मन तृप्त होत नाही. […]