रक्तापलिकडची नाती…
आयुष्यातले खरे धडे शाळा कॉलेज च्या बाहेरंच मिळतात.. उघड्या डोक्याने ते समजून घेण्याची आपली तयारी हवी. […]
आयुष्यातले खरे धडे शाळा कॉलेज च्या बाहेरंच मिळतात.. उघड्या डोक्याने ते समजून घेण्याची आपली तयारी हवी. […]
माझ्या अभियांत्रिकी दिवसांमध्ये जग काहीच्या काही वेगळंच होतं. त्यातले काही ट्रेसेस सध्या आगंतुकपणे भेटताहेत- उदा. आर एस खुर्मी आणि बी एल थेराजा यांची पुस्तके (२० च्या वर आवृत्या) आजही विद्यार्थ्यांच्या टेबलवर ठाण मांडून आहेत. त्यांच्या मांडवाखालून किती अभियंत्यांच्या पिढ्या यशस्वीपणे गेल्या आहेत, याचा हिशेब ठेवणं आता चित्रगुप्तालाही अवघड झालं असेल. […]
परवा भुवनेश्वरला एका कंपनीत एक चित्तवेधक बोर्ड पाहिला – नैसर्गिक संसाधनांचा वापर करा, कारण ती मुबलक आणि बव्हंशी फुकट असतात. त्या बोर्डवर चित्र होते सूर्याचे आणि दोरीवर वाळत टाकलेल्या कपड्यांचे! मोठ्ठा संदेश. […]
खऱ्या जगात हे “ सर्वोत्कृष्ट मेंढरू “ फार पुढे प्रगती करू शकत नाही, हे दुर्दैवी सत्य आहे. दहावी-बारावीच्या मेरीट लिस्टमध्ये आलेल्यांच्या भावी यशाचा (?) आलेख हा संशोधनाचा विशेष झालेला आहे. […]
हे डोह साधारण पहाटे तीन ते पाच भेटायला येतात- खोलवर, घनगंभीर, दिवसभराचे सारं काही आत पचवलेले! समुद्र अथांग, नदी खळखळ वाहती तर डोह एकाजागी स्थिरावलेले आणि स्तब्ध ! […]
दोन तास दहा मिनिटे संगणकाच्या पडद्यापासून हलू न देणारा हा नितांतसुंदर चित्रपट बघून मी भारावलो. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी हा २००७ चा चित्रपट तू-नळीवर आला. ठळक कोडाचे अंश (डाग, पट्टे ) चेहेऱ्यावर बिनदिक्कत मिरवणारी आणि ते स्वीकारलेली डॉ देविका येते तिच्या रानडे नामक डॉ मित्राच्या घरी आणि तिला आपली “भावी” मानताना सगळ्यांची ओढाताण एवढा हा एक दिवसाचा चित्रपट (तरुण पिढी अपवाद, त्यांना तिच्या कोडासकट तिला स्वीकारायला काही अडचण नसते, आणि अर्थातच वृद्ध मंडळी, ज्यांच्या डोळ्यांमध्ये जगाचे असे अनेक अनुभव असतात)! […]
एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची बातमी दिसली आणि एक फोटोही. तसे हे महाविद्यालय जुने, अर्थात फार बिनीचेही नाही पण वाचनात मात्र आहे. वेगवेगळ्या स्वयंघोषित सर्वेक्षणांमध्ये (ज्याच्या कुबड्या उच्च शिक्षणक्षेत्रातील महाविद्यालयांना आजकाल अपरिहार्य झाल्या आहेत) ते अधून-मधून झळकत असते आणि त्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर अपूर्वाईने टाकल्या जातात. […]
मीरा अजूनही वेशीबाहेर उपेक्षित आहे- मग ते वसंत कानेटकरांचे “मीरा-मधुरा ” हे नाटक असो वा गुलजारचा “मीरा”असो. हायसे इतकेच वाटते की “मीरेवर ” या गोष्टींचा परिणाम होत नाही. ती विरक्तीच्या पल्याड गेली आहे आणि कृष्णात विरून गेली आहे. […]
” वीर-जारा ” मध्ये शाहरुख खान किरण खेरला म्हणतो- “माहित नाही, माझ्या आणि तुमच्या देशातील मुले सारखीच असतात का ते? पण एवढं मात्र खात्रीने सांगू शकतो – आई इथून-तिथून सारखीच असते.” […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions