कागदा, कागदा बोल रे काहीतरी !
आपल्यातील सुंदर नात्याचा अस्त कधी,कसा आणि कां झाला, कळलेच नाही. एकेकाळी फार गळ्यात गळा नसले तरी गेलाबाजार आपल्यात बऱ्यापैकी संबंध होते. खूप काही सुचायचं, आत काहीतरी रटरटत असायचं. खूपदा सकाळी उठल्यावर मस्त लिखाण व्हायचं. त्याला कुठलाही फॉर्म वर्ज्य नव्हता. हातात हात धरून मस्त वाटचाल सुरु होती. लिहिलेलं छापूनही यायचं. बोटांना जणू परीस चिकटला होता. उमटलेला,हाती घेतलेला प्रत्येक शब्द झळाळून जायचा. थोडंफार नांव झालं. शब्दांमुळे कधी व्यासपीठही मिळालं. किंचित आणि क्वचित कमाई झाली.खूप जीवाभावाचे मैत्र झाले-ही कमाई अधिक मोलाची ! […]