नवीन लेखन...

सेफ्टी मीटिंग

रात्री उशिरा पर्यंत ड्युटी केली असल्याने दुपारी एक नंतर पुन्हा ड्युटीवर जायचे होते. जहाज अमेरिकेच्या फिलाडेल्फियाच्या दिशेने फुल्ल स्पीड मध्ये पाणी कापत चालले होतं. समुद्र शांत होता प्रवाहाच्या दिशेने जात असल्याने जहाजाला चांगलाच वेग मिळाला होता. सकाळी नाश्ता केल्यावर मोकळी हवा खाण्यासाठी ब्रिज डेकवर उभा राहून संथ पाण्यामध्ये जहाजाच्या मागे प्रोपेलरमुळे निळं पाणी घुसळून निघाल्यावर तयार […]

ब्लॅक मॅजिक ऑनबोर्ड

डोळ्यातून रक्त येतेय की काय असे चीफ ऑफिसरचे लालबुंद डोळे पाहून सगळ्यांना वाटत होते. पण तो कोणाकडेही रागाने किंवा विक्षिप्त नजरेने बघत नव्हता. त्याला स्वतःलाच खूप त्रास होत होता तो दुसऱ्यांना काय त्रास देणार. अंगाला दरदरून घाम फुटला होता. मागील चार दिवसांपासून तो कॅप्टनला येऊन घरी घडणारे प्रकार सांगत होता. पहिल्या दिवशी त्याच्या बायकोला घराच्या गेट […]

माझी ‘दर्या’ दिली : फ्लोटिंग ड्राय डॉक व्हाया ‘व्हिएन्ना’

मुंबईहून दुबई आणि दुबईहून ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना साठी फ्लाईट पकडली होती. युरोप मध्ये उन्हाळा सुरु होता तरीपण व्हिएन्नाला लँडिंग करताना विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर जिकडे तिकडे हिरवंगार आणि लुसलुशीत गवत दिसत होतं. बाहेरचं तापमान १२ डिग्री असल्याची माहिती पायलट ने टॅक्सी वे वर असताना दिली. व्हिएन्ना विमानतळावरून तासाभराच्या आतच इटलीतील कटानिया या शहरासाठी दुसरं विमान पकडायचे […]

शिप अरेस्ट

लिंबे नावाच्या कॅमेरून मधील पोर्ट मध्ये जहाजाच्या मेन इंजिनचा टर्बो चार्जर रिपेअर होता होता बावीस दिवस गेले. टर्बो चार्जर ज्या कंपनीने बनवला होता त्या कंपनीचा टेक्निशियन जहाजावर लिंबे पोर्ट मध्ये जहाज पोहचताच आला, त्याने एक पार्ट खोलून नेला, त्या पार्ट चे बदल्यात दुसरा नवीन पार्ट युरोप मधून येता येता वीस दिवस गेले. […]

अबनडेंड शिप

फ्रांसच्या किनाऱ्यावर एक मोठं तेलवाहु जहाज बरोबर मधून दुभंगल होतं. लाखो टन क्रूड ऑइल समुद्रावर तरंगत होत. इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं जहाज बुडाले होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात समुद्रात ऑइल पोलुशन झाले होते. जहाज बुडल्यामुळे पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. जहाजावरील एक चीफ इंजिनीयर सोडून इतर सगळे खलाशी आणि अधिकारी जहाज बुडूनसुद्धा वाचले होते. […]

ब्लॅक सी

भूमध्य समुद्रातून इस्तंबूल ओलांडल्यावर काळ्या समुद्राला सुरवात होते. काळ्या समुद्रात भरती ओहोटी हा प्रकार नाही हे समजल्यावर नवल वाटलं. मग पावसाचं पाणी कुठे जात असेल हा प्रश्न पडला पण इस्तंबूल वरून जाता येताना नेहमी पाणी काळ्या समुद्रातून भूमध्य समुद्राकडे वेगाने वाहताना दिसायचे. थोडक्यात काळा समुद्र हा एका प्रचंड मोठ्या तालावसारखा आहे ज्यामध्ये पावसाचं पाणी आलं की […]

जहाजावर न दिसलेली भूतं

एक पेशंट हॉस्पिटलमधून बरा होऊन घरी चालला होता. डीसचार्ज झाल्यानंतर त्याच्या डिलक्स रूमची सफाई करायला आलेला वॉर्डबॉय त्या पेशंट ला म्हणाला साहेब बर झालय तुम्ही जिवंतपणी बाहेर जाताय या रूम मधून, नाहीतर या रूम मध्ये ऍडमिट असणारे बरचसे पेशंट या रुममध्येच जीव सोडतात. डिलक्स रूम मध्ये मागील 8 दिवस घालवलेल्या त्या पेशंटला हे ऐकून धक्का बसला […]

सिंगापूर

सिंगापूर एअरलाईन्स च्या विमानाने सिंगापूरला उतरलो. विमानतळावरून मला आणि चीफ इंजिनीयर दोघांनाही सरळ जहाजावर सोडण्यात येणार होत. विमानतळावर घ्यायला आलेल्या एजंट ने माहिती दिली की जहाज सिंगापूर अँकरवर आज येऊ शकणार नाही. सिंगापूर जवळच्या एका बंदरात कार्गो डीसचार्जिंगला उशीर होतोय त्यामुळे आज हॉटेल मध्ये थांबावे लागेल. एजेंट ने त्याच्या गाडीतून आम्हाला हॉटेल मध्ये ड्रॉप करून रूम […]

पायरेट्स ऑफ सोमालिया….

अँटवर्पला डीसचार्जिंग करून आम्ही रोटरडॅमला निघालो होतो. रोटरडॅम मध्ये युरोपियन स्टॅंडर्ड मुळे म्हणा कि तिथलं वातावरण आणि नैसर्गिक परिस्थिती यांच्यामुळे म्हणा, तिथल्या लहान मोठ्या स्थानिक बोटी आणि इंधन पुरवठा करणाऱ्या बार्जेस ह्या खूप स्वच्छ, देखण्या आणि सुबक असतात. त्यांच्यावर धूळ किंवा तेलाचे डाग उडालेला रंग यापैकी कसलाही लवलेश नसतो. त्यांच्यावरील सर्व ऑटोमॅटिक सिस्टिम ह्या कॉम्पुटर कंट्रोल्ड […]

मिलफोर्ड हेवेन

भूमध्य समुद्रात असंख्य लहान मोठी बेटे दिसत होती. अत्यंत आकर्षक दिसणारी बेटे मागे टाकून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनिजवळ पोचलो होतो. उत्तर अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने जोडले आहे. रॉक ऑफ जिब्राल्टर म्हणजे एक खडक नसून महाकाय डोंगरच आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच समजले. जिब्राल्टर ला लागून उत्तरेला स्पेन आणि दक्षिणेला समुद्रधुनीच्या दुसऱ्या किनाऱ्याला सुद्धा स्पेनचाच काहीसा […]

1 8 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..