ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन
जकार्ता विमानतळावर फक्त एअर इंडियाच्या विमानासाठी भारतीय जमा होतं होते. भारतीय दूतावासातील कर्मचारी आपुलकीने सहकार्य आणि मार्गदर्शन करत होते. इंडियन नेव्हीचे एक कमांडर स्वतः अडचण असलेल्या प्रवाशाला शांतपणे ऐकून आणि समजून घेत होते तसेच त्याची समस्या दूर करत होते. भारतीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावर भारतात परतण्यासाठी आतुर असलेल्या तणाव ग्रस्त भारतीयांशी आपुलकीने आणि सहजतेने वागतानाचे भावनात्मक क्षण पाहून भारावल्यासारखे झाले होते. […]