मेडिटेरेनियन आयलंड
संपूर्ण बेटाच्या चारही बाजूला उंचच उंच कड्याप्रमाणे सरळसोट कडा उभा होता. स्वच्छ आणि निळेशार पाणी त्या खडकावर आदळून फेसाळत होते. पांढऱ्या शुभ्र बुड बुड्यानी बेटाभोवती एक वलय निर्माण झाल्यासारखे दिसत होते. जहाज जसं जसं पुढे सरकत होते तस तसे बेटाचे सौंदर्य आणखीनच खुलत चालल्या सारखे दिसत होते. सगळे खलाशी आणि अधिकारी बाहेर येऊन निसर्गाचे अनोखे सौंदर्य न्याहाळत होते. कॅप्टन ने चीफ इंजिनियर ला विचारले, बडा साब आपण ह्या आयलंड ला एक फेरी मारू या का? वीस मिनिटे जातील थोडा स्पीड कमी करावा लागेल, पण तुम्ही हो म्हणत असाल तरच. लगेचच चीफ इंजिनियर ने स्पीड कमी करतोय म्हणून इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन करून सांगितले. […]