यातना देणारास क्षमादान द्या आणि त्यास विसरुन जा. जीवन व्यवहारांत अनेकांशी संपर्क येत असतो. काहींचा सहवास सुखकर असतो तर कांहीमुळे यातना होतात. तो तुमच्या आवडी निवडीवर, स्वभावावर ठेच पोहोंचवतो. कित्तेकदा तुम्हाला अपमानीत झाल्याचा अनुभव येतो. तुमचा अहंकार डिवचला जातो. येथेच तुमच्या शांत स्वभावाची परिक्षा होत असते. मला माहीत आहे की आपण कोणी संत महात्मे वा साधूपुरुष […]
आपण वैशिष्ट्यपूर्ण आहात. तुलना करुन चिंता नका आपण आपल्या जीवनाची तुलना दुसऱ्य़ाबरोबर करुन चिंतीत होऊ नका. कारण, या विश्वांत आपण एक वैशिष्ट्यपूर्ण आहात. या जगात आपल्या सारखा अन्य कोणी नाही. दुर्दैवाने आपण स्वतःला ओळखत नसतो. जगाला मात्र समजण्याचा प्रयत्न करतो. सतत तुलनात्मक विचार चालले असतात. त्याचमुळे निराशेच्या वातावरणांत राहतो. इतरांच्या तुलनेमुळे स्वतःमधले वेगळेपण विसरतो. नुकतीच क्रिकेटची […]
एखादा पाच किलो वजन घेवून काही अंतर चालतो. त्याचे हात दुखू लागतात. त्याला दम लागतो. थकवा वाटू लागतो. कारण तो त्या त्या अवयवावर तान देत असतो.आणि ती अवयवे तसे दर्शवितात.मात्र मेंदूमध्ये प्रचंड वैचारीक क्षमता असते. त्यामुळे तुमच्या मेंदूला क्षिणता आली हे लगेच होत नसते. मात्र क्षिण झालेला मेंदू ( Fatigued Brain) त्याचे परिणाम इतरत्र पसरवून इतर […]
मानसिक तणाव- (क्रमशः पुढे २ वर चालू- – -) दैनंदिनीच्या जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते. तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी खूणा पडतात. मजूर वा शेतकरी कामे करत असताना, हातापायांच्या ठराविक भागी […]
प्रिय वाचक – – -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद. मानसिक तणाव –२ (हा लेख क्रमशः आहे ) माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते. अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही. शरिरातील सर्व अवयवांचा […]
प्रिय वाचक – – -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद. मानसिक तणाव -1 (हा लेख क्रमशः आहे ) माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते. अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही. शरिरातील सर्व अवयवांचा शोध […]
वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो. मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या […]
अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ? इत्यादी प्रश्नाना फारसे लक्ष दिले जात नाही. दैनिक भावना जागृत करणाऱ्या धार्मिकतेचे कवच धारण करणाऱ्या, ह्या साऱ्या […]
नुकतीच बातमी वाचण्यांत आली की बॉम्ब स्फोटामधील तीन आरोपीना न्यायालयाने मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली. एक विचार चक्र मनांत येऊन मी जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयांतील वाचनालयांत गेलो. एका थोर जागतीक मान्यवर लेखकांचे पुस्तक न्यायवैद्यक शास्त्र Medical Jurisprudence घेतले. ते बराच वेळपर्यंत वाचले. मृत्युचे प्रकार Mode of death व त्याचे शरीरावर होणारे परिणाम वाचले. त्यावरच्या टिपणी लिहून घेतल्या. अनेक […]
आजीने सांगीतलेली कथा आज मला अचानक माझ्या स्वतःच्या सत्तर वर्षे वयाच्या आजीची आठवण आली. अतिशय प्रेमळ व आम्हा नातवंडावर जीव लावणारी ती होती. माझ्या वयाच्या चौदा वर्षे पर्यंत मला तीचा सहवास लाभला. आजींच्या दोन गोष्टी मला फार आवडायच्या. एक चांगले चटकमटक खावयास नेहमी देणे. दुसरे रोज रात्री झोपण्यापूर्वी कथा सांगणे. रामायण, महाभारत यातील छोट्या छोट्या अनेक […]