तसा मी मात्र शाकाहरी ह्या खाद्य सवयीला चिटकून राहण्याच्याच विचारधारणेत होतो. मी पहीले अंडे खाण्याचा प्रयत्न केला तो केवळ मित्र मारुती ह्याच्या आग्रहामुळे.. सुटीच्या दिवशी तो अभ्यासाला येत असे. त्याचा स्वतःचा खाण्याचा डबा घेऊन येई. बऱ्याच वेळा आम्ही जवळ बसुन जेवण घेत असू. […]
सकाळचा अभ्यास करुन आम्ही दोघे रोज धावण्यासाठी व व्यायामासाठी बाहेर पडत असू. साधारण दोन एक मैल आम्ही धावत व्यायाम करावयाचा. रस्त्याने वा शाळेच्या मैदानावर चकरा मारायचे. एक गोष्ट गमतीची घडत असे. अचानक आठवली. शाळेच्या शेजारील शेतामध्ये, प्रासंगीक छोटी छोटी पिके लावली जात होती. त्यांत भुईमुगाच्या शेंगा, चवळी, टहाळ ( हरबरा ), मका, असायचे. ही पिके येऊ […]
माझ घर म्हणजे एक प्रचंड विशाल बंगला होता. शासकीय कॉर्टर. वडील शासनाचे जिल्हाधीकारी अर्थात् Collector of District होते. एक मोठे सरकारी आधिकारी. नोकर चाकर, घरांत काम करणारे अनेकजण, सर्वांचा एक दबदबा दिसून येई. सर्व आधिकारी वर्ग व सामान्य नागरिकांची तेथे सतत जा ये चालू असे. आम्ही ब्राह्मण असलो तरी बडीलांचे शिक्षण व अधिकार यांचा त्यांच्या मनावर […]
हीच डॉ. मारुती शंकरराव अतकरे व डॉ. भगवान केशवराव नागापूरकर यांच्या मित्रत्व रोपणाची प्रथम पायरी. जी पुढे पुढे जात समांन्तर चालत गेली. आज वयाची पंचाहत्तरी पुर्ण करीत पुढे जात आहे. वयानी जरी शारिरीक दुर्बलता दाखवण्यास सुरवात केली असली, तरी आमची मने आजही टवटवीत आहेत. […]
आजकाल वयाच्या तीन वर्षापर्यंत लंगोटीचा काळ. अर्थात अधुनिक काळाप्रमाणे डायपर हा शब्द प्रचलीत झालेला. नंतर येतो चड्डी घालण्याचा काळ. त्याची जागा घेतो लेंगा. अर्थात पुढे पँट, इत्यादी हे सारे वर्णन केवळ गम्मत म्हणून. करण कपड्यावरुन वयाचा अंदाज हे कालबाह्य होत आहे. आतातर स्वातंत्र्य ह्या शब्दाची जशी व्याख्या बदलते, तशी ती सांगणारे बदलतात. सांगणारे स्वतःलाच महान समजतात. त्यामुळे व्यक्त होणारे विचार खरे समजावे लागतात. […]
मी बरीच वर्षे मनोरुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी म्हणून, मनोरुग्णाच्या सहवासांत घलविली आहेत. ‘ मनोरुग्ण ‘ हा सर्वसामान्यजनांना विनोदाचा विषय असतो. हे एक कटू सत्य आहे. मनोरुग्णाकडे बघण्याचा मनोरंजनात्मक दृष्टीकोण सर्वसामान्यामध्ये आढळून येतो. तुम्ही वेड्याच्या सहवासांत आहात, तुम्हाला कोणता त्रास होतो कां ? तुम्हाला त्याची भिती वाटते कां ? ते दगड मारतात कां ? गाणी म्हणतात कां ? […]
सकाळचा फेरफटका मारून घरी आलो. घरी येताच आठ महिन्याची नात मानसी रांगत रांगत माझ्याकडे आली आणि झेपावली. तिला मी लगेच उचलून घेतले. जवळ केले व तिचे पापे घेतले. किती आनंद आणि समाधान ती मला देत होती. नातवंड म्हणजे दुधावरची साय. ज्यांना त्यांचा सहवास लाभतो ते आजोबा आजी खरोखरच नशीबवान व भाग्यवान. आयुष्याची दोर पक्की करणे, आणि वाढविणे ह्या दोन्हीही गोष्टी निसर्ग त्यांच्या […]
” हे परमेश्वरा काय चालले आहे हे तुझ्या राज्यात ? ” बघ किती माणसे दगावलीत, त्या दुष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळे. ? काय बिचाऱ्यांचा दोष? तू तर ह्या जगाचा कर्ता करविता. ही तर क्षुलक बाब तुझ्यासाठी. कर ह्यावर काहीतरी उपाय. दे त्यांना आशिर्वाद.” […]
रोज सकाळी सूर्योदयाच्या समयी फेरफटका मारणे व नंतर घराजवळच्या बागेत जाऊन शांतपणे चिंतन करीत बसने, हे नित्याचेच व नियमित झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शरीर व मन ताजे तवाने ठेवण्यात खूप आनंद वाटत असे. बागेमध्ये विविध रंगांची अनेक फुलझाडे होती. प्रातःसमयी उमलणाऱ्या त्या फुलांचे सौंदर्य मनास मोहून टाकीत होते. एक दिवस माझे मित्र श्री एकनाथराव यांची भेट झाली. हातात पिशवी घेऊन ते हलके हलके फुले तोडून जमा करु लागले होते. माझे लक्ष जाताच मी त्यांच्याजवळ गेलो. ” काय पूजेसाठी फुले गोळा करीत आहात वाटते? परंतु ही फुले देवाला कशी चालतील? “ माझ्या विचत्र वाटणाऱ्या वाक्याने त्यांना एकदम आश्चर्य वाटले. काहींच उलगडा न झाल्यामुळे त्यांनी मला त्या वाक्याचा अर्थ विचारला. मी म्हणालो ” थोड्या वेळापूर्वी मी समोर बसून मानस […]
सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते. लहान मुलगी कुमारिका विवाहित स्त्री माता, ह्या सर्व भूमिका, तिने जगाच्या व्यासपिठावर […]