माझे श्रद्धेवर जगणे ?
श्रद्धेचा जन्मच ज्ञानातून होतो. जस जसे ज्ञान प्राप्त होऊ लागते, समज येऊ लागते, जाणीव होऊ लागते, माणसाच्या विचारांना तशा “ विश्वासाच्या चौकटी ” निर्माण होऊ लागतात. चौकटीचे निर्माण केलेले अस्तित्व म्हणजेच श्रद्धा होय. […]
डॉ. भगवान नागापूरकरांचे जीवनातील विविध अनुभव सांगणारे हे सदर.
श्रद्धेचा जन्मच ज्ञानातून होतो. जस जसे ज्ञान प्राप्त होऊ लागते, समज येऊ लागते, जाणीव होऊ लागते, माणसाच्या विचारांना तशा “ विश्वासाच्या चौकटी ” निर्माण होऊ लागतात. चौकटीचे निर्माण केलेले अस्तित्व म्हणजेच श्रद्धा होय. […]
रस्त्याच्या वळणावर भाजी विक्रेत्याची गाडी बघीतली. बरीच गर्दी होती. एक वयस्कर ग्रहस्थ भाजी गिऱ्हाकाना देत होते. त्या ग्रहस्थाना बघताच आश्चर्याचा धक्का बसला. कल्पना करु शकत नव्हतो, विश्वास वाटेना. अतिशय परिचीत व्यक्ती होती. लगेच बाजूस झालो. त्या व्यक्तीला न्याहाळू लागलो. ते डॉ. विकास जोशी होते. २०-२२ वर्षापूर्वी निवृत्त झाले होते. शासकिय रुग्णालयाचे प्रमुख होते. कुशल सर्जन, व्यवस्थापक, […]
एके दिनीं मी निघून जाईन निरोप घेवून ह्या जगताचा प्रवास माझा अनंतात तो कसा असेल त्या वेळेचा आकाशाच्या छाये खालती विदेही स्थितींत फिरत राहीन ‘तू’ आणि ‘मी’ च्या विरहीत मी गत कर्माचे करिन मापन बाल्यातील चुका उमगल्या तरूणपणाच्या उंबरठ्यावरी सळसळणारे यौवन रक्त वृधावस्तेतील खंत ठरी पूनर्जन्म तो घेण्याकरितां गर्भाची मी निवड करीन गत जन्मींच्या चुका टाळूनी […]
ध्यान ? कुणाचे ? कुणाचेही नाही. कारण कुणीही आणि कुणालाही हे माहित नाही. काहीही न करणे यालाच ‘ध्यान’ म्हणतात. (objectless awareness) अर्थ फार सोपा व सुलभ वाटतो. परंतू काहीही न करण्याची अवस्था शरीरात निर्माण करणे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. देहाच्या हालचालीना पायबंद घालणे एखादेवेळी काही क्षणासाठी शक्य होईल. परंतु जो मेंदू, बुध्दी वा मन हे सतत […]
एकनाथराव यांची मला गम्मत वाटते. त्यांची विचारसरणी सतत काहीं तरी क्रियात्मक घटनामध्ये व्यस्त असते. अतिशय छोट्या गोष्टी. मात्र खोलांत शिरलो तर त्यातून एखादे महान तत्वज्ञान कळू लागते. हे किती क्षुल्लक, मला हे कां सुचले नाही. ह्याची खंत मनांत येते. […]
एकनाथरावांचे कार्य अत्यंत छोटे वाटत असले तरी प्रचंड असे वाटते. उत्पन्न झालेल्या भावनांना कांहीजण विचारांच्या चक्रांत स्वतःच्या मनाला वाटेल तसे करु इच्छीतात. […]
नुकताच पावसाळा सुरु झालेला होता. पावसाच्या सरी सारख्या अधून मधून पडत होत्या. सर्वत्र हिरवळ दिसू लागली होती. थोड्याच दिवसांनंतर त्या हिरवळीचे धागे, निसर्ग दाट व पक्के करणार. आणि एक अप्रतिम हिरवागार असा गाल्लीचा सर्व उघड्या रानोमाळ जागांमध्ये पसरुन टाकल्याचा आनंद निर्माण होणार. हा गाल्लीचा, त्या वर्षाऋतूच्या स्वागता साठीच असावा. अशा हलक्या फुलक्या अगमन प्रसंगीच्या नव पावसाळी […]
एक गमतीदार परंतु मनोरंजक संत कथा वाचण्यांत आली. जीवनाचे खुपसे तत्वज्ञान कळले. सारे चिंतनीय होते. एका गावांत एक थोर संत रहात होते. तत्वज्ञानी व अध्यात्मिक क्षेत्रांत नावाजलेले. दुरदृष्टी, सत्य संवाद, आणि भविष्याचा अचूक वेध ह्यामध्ये मान्यताप्राप्त. सभोवताली अनेक शिष्यगण सदैव असत. गुरुना ते देवाप्रमाणे समजत. एके दिवशी त्यानी सर्व शिष्याना एकत्र बोलावले. त्यानी एक विचीत्र परंतु […]
PhD. ही शैक्षणिक क्षेत्रातली सर्वोच्य पदवी. कोणत्यातरी विषयाचा अभ्यास, माहीती, संकलन करुन ते नाविन्य विद्यापिठापुढे सादर करुन मान्यता मिळवणे. व जगापुढे ठेवणे. कित्येक विषय नाविन्यपू्र्ण व चमत्कारी असतात. परंतु ज्ञानामध्ये हातभार लावणारे असतात. वैद्यकीय क्षेत्रातल्या तीन विद्यार्थ्यानी एक विषयाचा अभ्यास व Statistics गोळा केले होते. तो अहवाल वाचण्यांत आला. […]
एकनाथ माझा मित्र. त्याच्या घरी एकदा कोणत्या तरी पुजाविधीसाठी प्रसादाला गेलो होतो. घरातील देवघरात कोणत्यातरी महाराजाची मोठी तसवीर लावलेली होती. हार, फुले, उदबत्ती, निरंजनचा दिवा तेवत ठेवलेला होता. त्या महाराजाविषयी चौकशी करता ते शेजारच्याच गावचे एक ग्रहस्थ असल्याचे कळले. सामान्य जनाप्रमाणे त्यांचे व्यवहार चालू असतात. एका बँकेमध्ये नोकरी करुन उदार्निवाह चालवितात हे कळले. परंतु अध्यात्मिक प्रांतात, […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions