भारतीय आहार पद्धतीमध्ये जेवण बनवीत असताना आपण बर्याच जिन्नसांचा वापर आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये करत असतो. आपली भारतीय आहार पद्धती अतिशय विशाल आणि समृद्ध आहे. आपल्याला हे माहीत आहे का की आपण आपल्या जेवणामध्ये वापरत असलेले बरेचसे पदार्थ हे जरा वेगळ्या पद्धतीने वापरले तर आपण त्यांचा उपयोग घरच्या घरीच शरीराच्या छोट्या मोठ्या तक्रारी बर्या करण्याकरीता करू शकतो.
चला तर मग किचन क्लिनीक ह्या आपल्या सदरा मार्फत आपल्या स्वयंपाकघराची एक नवीन ओळख करून घेऊया.
पुदीन्याचा वापर आपण आपल्या स्वयंपाकामध्ये तसा सर्रास करत नसलो तरी देखील काही खास व्यंजनांमध्ये हा आपण हमखास वापरतो.हुॅं तोंडास पाणी सुटले ना ?समजले आम्हास आता ब-याच जणांना भैयाकडील पाणीपुरी,शेवपुरीची आठवण आली असणार.पुदिन्याची चटणी,वेगवेळी बिर्याणी,पुलाव,तसेच गोव्याचा खास पदार्थ चिकन अथवा फिश काफरियल (पापम् शांतम् ??श्रावण आलाय)ह्या सर्वांत ह्याचा हमखास वापर करतात. ह्याचे १-२ फुट उंचीचे सुंदर क्षुप […]
ह्याचे प्रसरणशील व बहुवर्षायू क्षुप असते.हे २-३ फुट लांब असते हिचे पांढरा व लाल असे दोन प्रकार असतात.त्यातील पांढरी पुनर्नवा हि प्रामुख्याने भाजी करीता वापरतात.हि भाजी पथ्यकर असली तरी देखील ब-याच प्रमाणात उपेक्षित आहे.म्हणुनच हिचा उपयोग व गुण जाणून घेणे गरजेचे आहे. हि भाजी पावसाळयात भरपूर वाढते.अाणी हिचे पुष्कळ औषधी उपयोग आहेत.पांढरी वसुची भाजी अथवा घेटुळी […]
ह्याचे २०-३० फुट उंचीचे भराभर वाढणारे झाड असते.ह्याला शरद ऋतुमध्ये फुले येतात म्हणून ह्याला अगस्त्य ऋषिंच्या नावाने अगस्त्य असे ही म्हणतात. हि भाजी चवीला कडवट असते व थंड असते त्यामुळे ती शरीरातील कफ व पित्त दोष कमी करते. हि भाजी जशी स्वयंपाकात वापरतात तसेच ह्याचा उपयोग आपण घरगुती उपचारांमध्ये देखील करू शकतो. १)जखमेवर हादग्याच्या पानांची चटणी […]
ह्याचे चारपाच हात उंच झाड असते व त्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात.हि भाजी चवीला आंबट असते काही लोक ह्याच्या झाडाच्या साली सुकवून त्याचा वापर आमसुलाचा पर्याय म्हणून करतात. हि भाजी शरीरातील वात दोष कमी करते व पित्त वाढविते. हिचा उपयोग जसा पालेभाजी म्हणून जेवणात केला जातो तसाच घरगुती उपचारांमध्ये देखील आपण हिला वापरू शकतो. चलातर मग […]
हे बहुवर्षायू क्षूप असते. हि भाजी चवीला गोड,तिखट,भूक वाढविणारी व उष्ण असते.हि भाजी शरिरातील वात व कफ दोष कमी करते व पित्त दोष वाढविते. हि भाजी जेवणात तर वापरतात तशीच ती घरगुती औषध उपचारात देखील वापरली जाते. आता हिचे औषधी उपयोग पाहूया. १)सर्दी झाल्यास करडईच्या कोवळ्या पाल्याची भाजी द्यावी. २)ह्या भाजीचा पोटीस सुजेवर बांधल्यास सुज व वेदना […]
ओवाच्या पानांची बेसनाचे पीठ लावून केलेला कुरकुरीत भजी चटकदार लागतात.तसा ह्याचा विशेष वापर पालेभाजी म्हणून जेवणात होत नाही.तरी देखील ह्याच्या विशिष्ट गंधामुळे व त्यात असणा-या औषधी तत्वांमुळे आजीबाईंच्या औषधी बटव्यात हिचे महत्त्वाचे स्थान आहे. ओव्यांची पाने खण्डाकार,मऊ,लवयुक्त व जाड असतात.जणू खरेखुरे वेलवेटचेच पान?.ह्याचे १-३ फूट उंचीचे क्षूप असते. चवीला तिखट,कडू व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील कफ व […]
हि वनस्पती प्रामुख्याने पावसाळयात उगवते.आमच्या गोव्यात देखील हि भाजी ह्या ऋतू मध्ये आवडीने अर्थात गोवेकरी घोस्ताने (कोकणी शब्द)खातात. हि भाजी शिजवल्यावर रूचीकर लागते मग तुम्ही तेलात परतून करा,मुग,चणा अथवा तूरडाळ घालून फक्त गुळ खोबरे घालून शिजवून करा किंवा मग त्यात फणसाच्या सुकवलेल्या आठळया घालून करा.अगदी लज्जतदार लागते हि भाजी.मला आता मी पाककृतीचेच सदर लिहित असल्या सारखे […]
शेवग्याच्या पाल्याची एक मजेशीर दंत कथा मला माझ्या सासुबाईंनी सांगितली आहे ती तुम्हाला आधी सांगते.एकदा शेवग्याची भाजी लग्न होऊन काही दिवस झाल्यावर माहेरी जायला निघाली,तिला तिच्या नव-साने त्याचदिवशी घरी परतयायला सांगितले होतेनाहीतर माहेरी येऊन तुझी हाडे मोडीन असे तो म्हणाला पण हि बिच्चारी त्या दिवशी माहेरी राहिली, रागाने तिचे यजमान तिच्या माहेरी गेले आणि बदडून बदडून […]
साधारणपणे पावसाळयात अगदी भरपूर उगवणारी हि पालेभाजी तशी सगळ्यांच्याच पुष्कळ आवडीची.अगदी खमंग चुरचुरीत अळुवड्या म्हणा,अळुचे फतफते म्हणा किंवा हरतालिकेला केली जाणारी ऋषिची भाजी ह्या सगळ्याच पदार्थांची चव अगदी लाजवाब लागते त्यामुळेच आपले सर्वांचेच विशेष प्रेम ह्या भाजीवर आहे(तसे काही महाभाग असतील ज्यांना हि भाजी आवडत हि नसेल पण ती संख्या तशी नगण्यच समझावी). अळुचे रोप हे […]
शेपूची भाजी हि ब-याच जणांना न आवडणारी अर्थात नावडती. तिला येणा-या विशिष्ट गंधामुळे ती ब-याच लोकांना आवडत नाही.(मला देखील आवडत नाही). हिच्या बियांना बाळंतशेपा असे म्हणतात ह्यांचा उपयोग लहान मुलांच्या बाळऔषधांत वापरतात. हिचे झाड तीन फूट उंचीचे असते.हि भाजी चवीला गोड व उष्ण असते हि शरीरातील कफ व वात दोष कमी करते.भाजी म्हणून जरी हि तेवढी […]