भारतीय आहार पद्धतीमध्ये जेवण बनवीत असताना आपण बर्याच जिन्नसांचा वापर आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये करत असतो. आपली भारतीय आहार पद्धती अतिशय विशाल आणि समृद्ध आहे. आपल्याला हे माहीत आहे का की आपण आपल्या जेवणामध्ये वापरत असलेले बरेचसे पदार्थ हे जरा वेगळ्या पद्धतीने वापरले तर आपण त्यांचा उपयोग घरच्या घरीच शरीराच्या छोट्या मोठ्या तक्रारी बर्या करण्याकरीता करू शकतो.
चला तर मग किचन क्लिनीक ह्या आपल्या सदरा मार्फत आपल्या स्वयंपाकघराची एक नवीन ओळख करून घेऊया.
सदा सर्वकाळ मिळणारी हि भाजी दोन प्रकारात मिळते लाल व पांढरा माठ (पांढरा म्हणजे हिरवा बरंका नाहीतर तुम्ही पांढ-या पानांची भाजी समजाल ?).हि भाजी तशी लई फेमस कारण हि सगळीकडेच मिळते. ह्या भाजीबद्दल देखील लोंकात मिश्र भावना आढळते काहीजणांची आवडती तर काही जणांची नावडती.लालरंगामुळे मुलांना आवडते पण काही वेगळी कल्पक बुद्धीवापरून काही चटपटीत,सुंदर आणि पौष्टिक असे […]
तांदुळजा (चवळीचा पाला) हि भाजी बारा महिने उगवते. हिची लहान रोपं असतात व पाने बारीक असतात. हि भाजी चवीला गोड व शीतल गुणाची असल्याने शरीरातील वात व पित्तदोष कमी करते. हिचे बरेच औषधी उपयोग आहेत ते आपण पाहूयात: १)भाजलेल्या जखमेवर तांदुळजाच्या भाजीचा रस लावावा. २)डोळे,हातपाय,व लघ्वीची आग होणे ह्यात तांदुळजाच्या भाजीचा १/४ कप रस+ साखर हे मिश्रण उपाशी पोटी […]
आपल्या सर्वांच्या परिचयाची आणि ब-याचं मंडळीच्या आवडीची हि हिरवीगार भाजी.ताजी टवटवीत असताना दिसते देखील सुरेख नाही का? आपण ह्याचे बरेच पदार्थ खाण्या करीता बनवतो.पालक पनीर तर ब-याच जणांच्या आवडीचे,आलूपालक,पालकाची भजी,पालकाचे सूप,पालकाची शेव इ. पण हाच पालक काही आजारांमध्ये आपण घरचा वैद्य म्हणून देखील वापरू शकतो बरे का! पालकाचे लहान हातभर उंचीचे क्षुप असते.आणी ह्याची पाने भाजीसाठी […]
हि भाजी सर्व महाराष्ट्रभर आवडीने खातात व हि भाजी पथ्याची म्हणून देखील प्रसिद्ध आहे.ह्याचे रोप हातभर उंच असते. हि चवीला गोड खारट व थंड असते.त्यामुळे ही शरीरातील वात व पित्त कमी करते. आता आपण ह्याचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहूयात. १)ताप उतरल्यावर ह्या भाजीचे सूप त्या व्यक्तीला दिल्यास त्याची भूक वाढते. २)मुळव्याध असणार्या व्यक्तिंने हि भाजी गव्हाचे […]
ह्या भाजी बाबतीत आपल्याला मिश्र प्रतिक्रिया एकायला व अनुभवायला मिळतात.काहीजणांची अत्यंत आवडती तर काही जणांची अगदीच नावडती अशी हि भाजी(माझी सर्वांत आवडती आहे बुवा). आपण ह्याचे विविध प्रकार बनवून हिला खात असतो जसे मेथीचे पराठे,मेथी मलाई मटर,मेथीचे थेपले,मेथी आलू इ.पण प्रत्येक स्वरूपात हिच्यापासून बनविलेल्या व्यंजनांची लज्जतच काही निराळी आहे. अशा ह्या मेथींच्या भाजीचे लहान क्षूप असते.तसेच […]
आपण मसालेवर्गाची संपूर्ण माहीती पाहिली आता आपण वळूयात ब-याच मंडळींना न आवडणारा खाद्य गट म्हणजेच पालेभाज्या. हा विषय घेणार हे एकूनच ब-याच मंडळींनी नाकं मुरडली असणार ह्यात शंकाच नाही. लहान मुलांना देखील फारशी न आवडणारी आणी आयुर्वेद देखील सांगतो ८ दिवसातून फक्त एक ते दोन वेळेसच हि खावी. ह्या पालेभाज्या देखील औषधी गुणधर्मयुक्त असतात बरेका त्यामुळे […]
केशर म्हटले की पुर्वीच्या काळातील राजा रजवाडे ह्यांची आठवण आल्या शिवाय रहात नाही.किंबहूना हे नाव ऐकल्यावर मला तरी त्यांची आठवण होते.असा हा राजेशाही आश्रय लाभलेला पदार्थ आता जरी सर्व सामान्यांच्या अवाक्यातला झाला असला तरी त्याच्या भोवताली असणारे ते वलय काही कमी झाले नाहीये बुवा. सांगण्याचा हेतू हा की केशर हा तसा जपून वापरण्याचा पदार्थ आहे कारण […]
मिरची हि आपल्या स्वयंपाकामधील एक अविभाज्य घटक होय.आपल्या तिखट चवीने भल्या भल्यांची वाट लावू शकणारी हि मिरची हा मसाल्यामधील एक प्रमुख पदार्थ आहे.तिखटाच्या कोणत्याही पदार्थाला हिच्या उपस्थिती शिवाय लज्जत येतच नाहीतर.फोडणी,चटणी,आमटी,लोणचे,पापड, गरम मसाला इ अनेक पदार्थांमध्ये हिचा वापर करावाच लागतो. लाल असो वा हिरवी हिच्या विशिष्ट झणझणीत चवी मुळे हिची जागा दुसरे कोणतेच पदार्थ घेऊ शकत […]
ओवा आपण सर्वच जणांच्या परिचयाचा.तसेच भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात ह्याला एक वेगळे आणी महत्त्वाचे स्थान आहे.ओव्याचा वापर हा जेवणामध्ये फोडणीला,भजी बनवताना,ओव्याची कढी,अशा माफक पदार्थांमध्ये हा वापरला जातो.पण खरोखरच ओव्यामुळे त्या पदार्थांना एक वेगळी छान चव त्या पदार्थाला येते.तसेच ब-याच मंडळींना ह्याचे घरगुती औषधी प्रयोग माहीत देखील असणार. ओव्याचे लहान क्षूप असते आणी त्याला लागलेली ही बारीक फळे […]
साधारण पणे वाटाण्याच्या आकाराची हि फळे असतात आणि त्या फळांच्या आत काळी चमकदार बी असते.ह्याचे काटेरी झाड असते. ह्यांना एक विशिष्ट असा उग्र वास येतो.ब-याच जणांना कदाचित हे फळ माहित नसेल तसा ह्याचा आपल्या स्वयंपाकामध्ये फार वापर होतो असे देखील नाही पण गोवा कोकण प्रांतामधील लोक ह्याचा थोडाफार वापर आपल्या काही विशिष्ट खास व्यंजनांमध्ये आवर्जुन करतात. […]