भारतीय आहार पद्धतीमध्ये जेवण बनवीत असताना आपण बर्याच जिन्नसांचा वापर आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये करत असतो. आपली भारतीय आहार पद्धती अतिशय विशाल आणि समृद्ध आहे. आपल्याला हे माहीत आहे का की आपण आपल्या जेवणामध्ये वापरत असलेले बरेचसे पदार्थ हे जरा वेगळ्या पद्धतीने वापरले तर आपण त्यांचा उपयोग घरच्या घरीच शरीराच्या छोट्या मोठ्या तक्रारी बर्या करण्याकरीता करू शकतो.
चला तर मग किचन क्लिनीक ह्या आपल्या सदरा मार्फत आपल्या स्वयंपाकघराची एक नवीन ओळख करून घेऊया.
हे सर्वांचे आवडते व अत्यंत चविष्ट व पौष्टिक फळ आहे.ह्याच्या अनेक जाती उपलब्ध आहेत वेलची,हिरवी,सालदाटी,मांईडोळची,आंबटी इ.त्यातल्यात्या वेलची अर्थात ह्याला रसबाळी देखील म्हणतात उत्तम मानली जातात. गरीब,श्रीमंत,वृद्ध,लहान मुल असे सगळ्यांचेच पोषण करणारे हे फळ.ह्याचे पासून शिखरण,पाकातली केळी,गुळातला केळीचा हलवा,केरळ मध्ये तर केळी घालून केलेला बदामी हलवा देखील मिळतो,शेक,केळ्याचे पंचामृत असे अनेक प्रकार केले जातात व ते फार […]
कैरी पिकल्या त्यांचा आंबा झाला की त्याचे गुणधर्म पुर्ण बदलतात. आंबा हा चवीला गोड,थंड व वात व पित्त दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो. पिकलेल्या आंब्याचे औषधी उपयोग आता आपण पाहूया: १)रोज १ आंबा खाऊन त्यावर तासाभराने दुंध प्यायल्यास वजन वाढते व झोप ही चांगली लागते. २)आंब्याचा रस बाळंतीण बाईला नियमीत प्यायला दिल्यास तिचे […]
ह्याचा वृक्ष असतो ज्याची साल पांढरी धुसर असते.पाने बारीक व मेंदीच्या पानांसारखी असतात.फुले लहान व पांढरी असतात.फळाची साल कडक व रंग भुरकट पांढरा असतो.आतील गर पिवळा काळसर असतो व ह्यात भरपूर बिया असतात. ह्याचे कच्चे फळ उष्ण आंबट,तुरट व वातपित्तकर व कफनाशक असते. ह्याचे पिकलेले फळ गोड,आंबट,तुरट,थंड व त्रिदोष शामक असते. आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया: […]
डाळींबाच्या द्राक्ष्यांप्रमाणे लालचुटूक ओठ अशी उपमा सुंदर स्त्रीयांच्या ओठांना दिली जाते.खरोखरच हे डाळींबाचे दाणे जणू काही रूबीच्या रत्नाप्रमाणेच दिसतात.ह्या दाण्यांचा रस पिण्यासाठी वापरतात तसेच मुंबई दाबेली मध्ये चव यायला हे डाळींब दाणे घातले जातात. काही म्हणा पण हे डाळींब जसे सुरेख लागते तसेच ते खाल्ल्यावर शरीरात तरतरी येते.ह्या डाळींबाचे १०-१५ फुट उंच वृक्ष असतो जो मध्यम […]
द्राक्षांचा उपयोग आपण खाण्यासाठी तर करतोच.पण त्या पासून मनुका,बेदाणे,वाईन असे विविध प्रकार बनविले जातात.तसेच आपण औषध म्हणून घेत असलेले द्राक्षासव हे देखील बऱ्याच जणांच्या आवडीचे. हि द्राक्षे खायला खरोखरच सुरेख लागतात.त्यातल्यत्यात गोड असतील तर अगदी अमृततुल्यच म्हणाना. हिंदुस्थान भर हि द्राक्षे पिकवीली जातात ह्याच्या पांढरी,हिरवी आणी काळी असे तीन प्रकार असतात.द्राक्षांचा वेल असतो व तो लावल्यापासून […]
उन्हाळा आला रे आला कि थंडगार कलिंगड खाल्ल्यावर खरेच अगदी आल्हाददायक वाटते.उन्हाची झळ हि काहि काळा पुरती का होईना बरीच कमी होते. ह्याला उन्हाळ्यातील थंडाव्याची झुळूक म्हटल्यास वावगे ठरणार नाही,नाही का! मस्त चाट मसाला घालून,किंवा मिरपुड व मीठ घालून देखील ह्याच्या फोडी रूचकर लागतात बरं का.कधी कधी तळपत्या उन्हातून आल्यावर ह्याचा ग्लासभर लाल लाल रस पिणे […]
नागपूर ह्या फळा करीता जगभरात प्रसिध्द आहे.संत्री हे फळ आवडत नाही अशी व्यक्ती विरळच असेल.ह्याचा रस देखील आपण आवडीने पितो.तसेच केक,बिस्कीट,जाम,मध्ये देखील ह्याच्या रसाचा वापर करतात असे म्हणतात तरी कारण अाॅरेंज फ्लेवर हा भारी फेमस आहे बुवा. ह्याचे झाड हे लिंबाच्या झाडा समान असते.ह्याची फळेचवीलाआंबट,उष्ण,रूचीवर्धक,वातनाशक, व सारक म्हणजेच मोठ्या आतड्यातील मळ पुढे सरकवणारी असतात.तसेच हे फळ […]
आता आपण कंदमुळ हा वर्गपुर्ण करून आणखी एका महत्त्वाच्या गटाकडे वळूया तो म्हणजे आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट तो म्हणजे फळांचा.फळे हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट आहे.आपण सर्वच जण वेळ मिळेल तेव्हा फळांवर ताव मारत असतो.उस वक्त हम आव देखते हैं न ताव. हो खरेच फळे पौष्टिक,रूचकर असतात हे खरे तसेच त्यात अनेक जीवनसत्व व खनिज् देखील […]
होय आपल्या आयुर्वेदानुसार हिलाच बावची अथवा बाकूची असे म्हटले जाते.आपण औषधी प्रयोगा करिता ह्याच्या बियांचे चुर्ण किंवा तैल वापरतो.पण आहारात मात्र ह्याच्या शेंगांची भाजी वापरली जाते. अर्थात बोलीभाषेत हिलाच चिटकी देखील म्हणतात.आणि हिच एक अशी भाजी आहे जी कधीच चिरून केली जात नाही तर हिच्या शेंगा मोडून मग हिची भाजी करतात.कारण चिरताना जर ह्याच्या बिया कापल्या […]
दत्तगुरूंची हि आवडीची भाजी म्हणून हिचा उल्लेख गुरुचरित्रात देखील आढळते.तसेच गुरुचरित्र वाचनाचे उद्यापन करतात तेव्हा घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य केला जातो.अशी हि भाजी ब-याच जणांना आवडत असली तरी फारशी खाल्ली जात नाही त्यामुळे थोडी उपेक्षितच म्हणावी लागेल. हि भाजी फार चविष्ट लागते.तशी चवीला तुरट गोड व थंड असून हि शरीरात वात दोष वाढविते व कफ व पित्त […]