भारतीय आहार पद्धतीमध्ये जेवण बनवीत असताना आपण बर्याच जिन्नसांचा वापर आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये करत असतो. आपली भारतीय आहार पद्धती अतिशय विशाल आणि समृद्ध आहे. आपल्याला हे माहीत आहे का की आपण आपल्या जेवणामध्ये वापरत असलेले बरेचसे पदार्थ हे जरा वेगळ्या पद्धतीने वापरले तर आपण त्यांचा उपयोग घरच्या घरीच शरीराच्या छोट्या मोठ्या तक्रारी बर्या करण्याकरीता करू शकतो.
चला तर मग किचन क्लिनीक ह्या आपल्या सदरा मार्फत आपल्या स्वयंपाकघराची एक नवीन ओळख करून घेऊया.
सर्वांच्याच आवडीची हि भाजी सुकीभाजी म्हणूनका,भरली भेंडी म्हणा,आमटी,तळलेले भेंडी,भरली भेंडी,आपण गोव्यात करतो ते भेंडीचे खतखते हे सर्वच प्रकार अगदी रूचकर लागतात ह्या भाजीचे. जसा हिचा उपयोग आपण स्वयंपाकात करतो तसाच उपयोग घरगुती उपचारात देखील करू शकतो. ह्या भेंडीचे तीन हात उंच झाड असते व त्याला हि फळे लागतात. भेंडी चवीला तुरट,आंबट,गोड अशा मिश्र चवीची असतात व […]
हे चवीला कडू असले तरी आहे मात्र फारच पौष्टिक बरे का.ह्याच्या कडू चवीमुळे ब-याचं मंडळींना हे आवडत नाही.पण ह्यात असणा-या औषधी गुणांमुळे प्रत्येकाने ही भाजी खायलाच हवी. ज्यांना हि भाजी आवडते ते ह्याची तळलेली कापं,भजी,चटणी,भाजी असे विविध प्रकार करून खातात. कारल्याचा वर्षायू वेल असतो.व आपण खातो ते कारले म्हणजे ह्या वेलीला लागणारे फळ होय.कारले हे चवीला […]
हि प्रत्येकाची आवडती.हिला बोली भाषेत तवसे देखील म्हणतात.हिची कोशिंबीर,रायते अगदी लाजवाब लागते.गरमी मध्ये शरीर व मन थंड करणारी हि काकडी सगळ्यांचीच लाडकी. हिचा उपयोग स्वयंपाका मध्ये जसा होतो तसाच हिचा वापर आपण घरगुती औषध उपचारात देखील करू शकतो. हिचा वर्षायू रोमश वेल असतो.आणि ह्याच वेलीला हि रसरशीत फिक्कट हिरव्या रंगांची फळे लागतात जे चवीला गोड व […]
हि भाजी तशी आपल्या सर्वांच्या परिचयाची व ब-याच लोकांना आवडणारी.तोंडलीची चटणी,भाजी,उसळ,लोणचे असे अनेक प्रकार करून हिचा आस्वाद आपण सगळेजण घेत असतो.दिसायला छोटी असली तरी हि भयंकर रुचकर भाजी आहे. हि तोंडली वेलीला लागते.अर्थात हे त्या वेलींचे फळ होय.हि कडू व गोड अशा दोन प्रकारामध्ये उपलब्ध असते त्यातील कडू हि औषधात वापरतात तर गोड तोंडली स्वयंपाकामध्ये वापरतात. […]
किस बाई किस दोडका किस हे फुगडी गीत मंगळा गौरीमध्ये लय फेमस हाय बुवा.तर आज आपण नव्याने ओळख करून घेऊयात ह्या दोडक्याची.अहो काही नाही हे दोडके आकांराने दिसते अगदी घोसाळ्याच सारखे फक्त ह्याला धारदार शिरा असतात बरं का.चला आपण ह्याला घोसाळ्याचा सावत्र भाऊच म्हणूयात ना.मग आता दोडके व घोसाळे ह्यात गफलत होणार नाही ना. हिचा देखील […]
ह्यालाच पांढरा दुधी असे देखील म्हणतात.ह्याचे किती प्रकारची व्यंजने बनत असतील हे सांगणे जरा कठिणच आहे,पण सगळ्यांचा आवडता दुधी हलवा म्हणा,खीर म्हणा,चटणी म्हणा,भाजी म्हणा,सुप इ पदार्थ करतात हे मला माहिती आहे. जसा ह्याचा उपयोग भाजीमध्ये होतो तसाच ह्याचा औषधी उपयोग देखील आहेत बरं का! ह्याचे वेल असते जे दुरवर पसरते ह्या वेलीला हि फिकट हिरव्या रंगांचा […]
आपण किचन क्लिनीक मध्ये आता पर्यंत मसाले वर्ग व पालेभाज्यांचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहिले आहेत.आता वेळ आली आहे आणखी एका नवीन गटाची ओळख करून घेण्याची,मग मला वाटले तो गट हा भाज्यांच्या भाऊबंदकितला का नसावा अर्थात तो आहे फळभाज्यांचा. आपण प्रत्येक जण ह्या फळ भाज्यांचा उपयोग आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये निरनिराळे पक्वान्न करायला करत असतो.पण ह्याच फळभाज्यांचा उपयोग […]
मुळ्याची भाजी आवडीने खाणारे लोक तसे कमीच आढळतात.आपण भाजी करताना पाल्यासोबत मुळा देखील वापरतो.पंजबी डिश मुलीके पर्राठे जाम फेमस आहे बुवा पण मला अजुनही तो खायचा योग आला नाही,मुळ्याच्या कोवळ्या पाल्याची लिंबू पिळून केलेली कोशिंबीर देखील सुरेख लागते बरं का. तर असा हा मुळ्याचा पाला आपण भाजी करायला तर वापरतोच पण ह्याचे बरेच औषधी उपयोग देखील […]
ह्याचे बहुवर्षायू २-८ फुट उंचीचे क्षुप असते.ह्याची पाने दंतुर कडा असलेली असतात.ह्याचे मुळ औषधी मध्ये वापरतात तर ह्याच्या पानांची भाजी करतात.हि भाजी अत्यंत पथ्यकर व रुचकर लागते. हि पाने सुध्दा औषधी गुणांची असल्याने घरगुती उपचारात वापरतात.हि चवीला कडू तिखट असते व थंड गुणाची असल्याने शरीरातील तिन्ही दोष कमी करते. हि भाजी शक्यतो कोवळी असतानाच करावी जुन […]
आपल्या स्वयंपाकघरात अत्यंत मानाचे स्थान प्राप्त अशी हि वनस्पती.तशी सगळ्याचीच लाडकी.कारण कोणताही शाकाहारी अथवा मांसहारी पदार्थ असो जसे वरण,डाळ,पोहे,उपिट,भाज्या,माशांची आमटी,चिकन,मटण ह्यावर सजावटी करीता हिची पेरणी करतात.तसेचकाथिंबीर चटणी,कोथिंबीर वड्या ह्या सगळ्यांच्याच आवडीच्या.ब-याचं व्यंजनांमध्ये हिचा वापर त्या पदार्थांची चव वाढविणा करिता केला जातो.कारण हिच्या मंद सुगंधाने व हिरव्यागार रंगाने पदार्थ दिसायला तर संदर दिसतोच पण त्याची लज्जत हि […]