कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती, उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा प्रवास या सदरात आहे.. घरातले चांगले संस्कार, कुटुंबातील लोकांचे प्रेम, मैत्रिणीच्या आणाभाका, स्वत:चीच स्वप्ने, सारे सारे झुगारून वारंवार त्याच चुका करायला भाग पाडणारे ते व्यसनाचे वेडेपणाचे आकर्षण कसे स्वतःसोबतच कुटुंबातील लोकांचे नुकसान करते याचा प्रवास म्हणजे नशायात्रा.. मनोरुग्णालय, फूटपाथवर वास्तव्य, व शेवटी कारागृह अशा वळणांवरुन शेवटी थांबलेला दारूण व थरारक प्रवास म्हणजे नशायात्रा.
तुषार नातू यांच्या “नशायात्रा” या पुस्तकावर आधारित…
अगदी सुइसाइड नोट वगैरे लिहून मी आत्महत्येचा ड्रामा सुरु केला . ब्लेडने हाताची शीर कापून घेतो म्हणून उजव्या हाताच्या मनगटावर ब्लेड ने हळूच कापण्यास सुरवात केली , आता आईचा धीर सुटला व ती रडू लागली , ते पाहून , बहिण आणि तिची मुले देखील घाबरून रडू लागली तेव्हा भावाने त्यांना सांगितले ‘ तुम्ही सरळ शेजारी निघून जा मी पाहतो काय होईल ते […]
गर्द आणि इतर व्यसनांच्या मी पूर्ण आहारी गेलो होतो व आता माझी घरातील पैश्यांची मागणी वाढली होती , ती प्रत्येक वेळी पूर्ण होणे शक्यच नव्हते तेव्हा मग घरात छोट्या मोठ्या चोऱ्या सुरु झाल्या वडील पक्षाघातातून बरे होऊन आले होते आणि पुन्हा त्यांनी कामावर जाणे सुरु केले होते मात्र ते जरा विसरभोळे झाले होते त्याचा फायदा घेऊन मी त्यांच्या पाकिटातून पैसे गुपचूप काढत असे , […]
सोडावॉटर च्या बाटल्यांचा वर्षाव झाल्यावर जमावाची जी पळापळ झाली ती गमतीशीर होती , वाट फुटेल तसे सगळे सैरावैरा पळत होते , तितक्यात समोरून पोलिसांचे गाडी आली तसे अजूनच गोंधळ झाला , आम्ही देखील पळत दुर्गा गार्डन गाठले , व तेथे अंधारात लपून बसलो , आम्हाला स्वतचेच खूप हसू देखील येत होते , इतक्या तावातावाने निघालेला जमाव केवळ १५ ते २० सोडावॉटरच्या बाटल्यांनी पांगवला होता . […]
सायंकाळी आम्ही दुर्गा गार्डन मध्ये नशा करत बसलो असताना बाहेर च्या रस्त्यावर जरा गोंधळ वाटला अनेक तरुण घोळक्याने रस्त्यावर जमले होते , आमच्या लक्षात आले की दुपारीच त्यावेळच्या विद्यमान पंतप्रधान ‘ इंदिरा गांधी ‘ यांच्यावर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच गोळ्या घातल्याची बातमी रेडिओवर प्रसारित झाली होती , […]
जवळची ब्राऊन शुगर संपल्यावर माझी चीडचीड वाढली होती , मला ब्राऊन शुगर न मिळाल्याने त्रास होतोय हे मित्रांना सांगणे देखील लज्जास्पद वाटत होते , कारण मग त्यांना समजले असते मी ब्राऊन शुगरच्या आहारी गेलोय ते ( एखाद्या व्यसनीला आपण व्यसनी झालोय हे इतरांजवळ कबुल करायला खूप त्रास होतो , त्याचा अहंकार त्याला हे करू देत नाही ) त्यांनी माझ्याशी खोटे बोल्रून माझ्याजवळचा साठा संपवला होता या बद्दल त्यांचा खूप रागही आला होता . […]
तर आम्ही एकूण चार पाच जणांनी पहाटे बसने जाण्याऐवजी आदल्या दिवशी रात्रीच सटाण्याला जायचे ठरवले होते व त्यानुसार आम्ही तयारी करून गांजा , ब्राऊन शुगर असा पैसे असतील तेव्हढा साठा सोबत घेऊन नाशिक ला सी .बी .एस च्या स्थानकावर जमलो होतो.. […]
बिटको कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे कॉलेजच्या समूहगीताचा समूह प्रमुख पदवीधर होऊन नाशिक शहरात एन.बी .टी लॉ कॉलेजला पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला आणि मग अनुभवी म्हणून आपोआप समूह प्रमुखाचे पद माझ्याकडे आले . मी अतिआत्मविश्वासाच्या जोरावर यावेळी स्वतच गाणे लिहायचे, त्याला चाल देखील स्वतःच लावायची असे ठरवले होते , […]
सायंकाळी हे नक्की झाले की पकडली गेलेली मुले आज काही सुटणार नाहीत .बक्षीस समारंभ ६ वा सुरु झाला , मी एकांतात जाऊन सिगरेट मध्ये गांजा भरून दम मारून मग अगदी शेवटी बसलो होतो , एकेका स्पर्धचे नाव सांगून सुवर्ण , रौप्य , आणि कास्य पदकाची बक्षीसे जाहीर केली जात होती आणि त्या वेळचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू श्री . राम ताकवले यांचे हस्ते पदके प्रदान केली जात होती . […]
आता परिस्थिती गंभीर झालेली होती मग आमच्या लक्षात आले की आम्ही धिंगाणा करणारे सुमारे ३० मुले होतो तर होस्टेल मध्ये राहणारी मुले जास्त होती संख्येने .. हळू हळू वरच्या होस्टेल मधली मुले खाली येऊन चारही बाजूने आम्हाला घेरत होती एव्हाना ही बातमी आमचे व्यवस्थापक फडके सर् यांच्या पर्यंत पोचली होती ते धावत येऊन आम्हाला समजावू लागले […]
१२ वी ला असताना पंचवटी कॉलेज मध्ये स्नेहसंमेलनाच्या वेळी आपण एखादी एकांकिका बसवावी असे आमच्या मनात आले अर्थात या पूर्वी अभिनयाचा काही अनुभव नव्हता परंतु आमच्या पेक्षा वयाने मोठे असेलेल जे आमचे विलास पाटील , रतन पगारे , यशवंत .. वगैरे मित्र होते ( अर्थात हे मित्र आमच्या सारखे व्यसनी नव्हते ) त्यांनी आम्हाला या प्रकरणी मदत करायचे ठरवले , […]