कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती, उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा प्रवास या सदरात आहे.. घरातले चांगले संस्कार, कुटुंबातील लोकांचे प्रेम, मैत्रिणीच्या आणाभाका, स्वत:चीच स्वप्ने, सारे सारे झुगारून वारंवार त्याच चुका करायला भाग पाडणारे ते व्यसनाचे वेडेपणाचे आकर्षण कसे स्वतःसोबतच कुटुंबातील लोकांचे नुकसान करते याचा प्रवास म्हणजे नशायात्रा.. मनोरुग्णालय, फूटपाथवर वास्तव्य, व शेवटी कारागृह अशा वळणांवरुन शेवटी थांबलेला दारूण व थरारक प्रवास म्हणजे नशायात्रा.
तुषार नातू यांच्या “नशायात्रा” या पुस्तकावर आधारित…
सकाळी ७.३० ला नाशिकरोड रेल्वे स्टेशन वरून ‘ पंचवटी ‘ एक्प्रेस मध्ये बसलो , माझा रेल्वे स्टेशन वर नेहमी वावर असल्याने सगळे फेरीवाले ओळखीचे होतेच माझ्या …बटाटावडा , चिवडा , द्राक्षे , कोल्ड्रिंक्स , खीरा काकडी असे पदार्थ रेल्वे डब्यात तसेच , स्टेशन वर विकणारे हे मित्र कलंदर असत त्यांच्या बरोबर राहून मी चालत्या गाडीत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाणे .. वेगात असणारी गाडी गाडीसोबत धावत जाऊन पकडणे ..सोडणे …असे प्रकार शिकलो होत . त्यांच्याशी गप्पा मारत बटाटेवडे वगैरे खात गाडीत छान टाईम पास केला , […]
तसे आमच्या घरी संगीताची आवड सुरवातीपासून आहे , माझे आजोबा सयाजीराव महाराजांच्याद दरबारी नोकरी करत असत , तसेच ते कीर्तनकारही होते , माझ्या वडिलांना देखील संगीताची आवड होती त्यांचे थोडेसे संगीत शिक्षण देखील झाले होते व राजकोटच्या रेडीओ केंद्रावर त्यांनी तरुणपणी गायन देखील केले होते , […]
आई भावाला रागवत होती ते पाहून मला बरे वाटत होते , मनातल्या मनात मी ‘ मला मर म्हणतोस काय ? बघ आता मजा ‘ असे म्हणत होतो . त्या काळी माझ्या उडाणटप्पू पणा करण्याच्या आणि बेताल वर्तनाच्या जो आड येईल तो मला माझा शत्रू वाटत असे आणि माझ्या शत्रूंमध्ये सर्वात पहिला नंबर मोठ्या भावाचा होता कारण तो नेहमी माझ्या भानगडी शोधून काढत असे आणि माझ्या स्वैर जगण्याच्या आड येत असे . […]
रागारागाने मी आतल्या खोलीत जाऊन दार आतून लावून घेतले , मोठ्या भावाने ,मला ‘ ती जिवंत राहून काही फायदा नाही , त्यापेक्षा मरत का नाहीस , गाडीखाली जाऊन जीव दे ‘ असे म्हंटल्या मुळे माझा अहंकार प्रचंड दुखावला गेला होता व आता मोठ्या भावाला काहीतरी धडा शिकवला पाहिजे असे मला वाटत होते . त्याने केलेल्या अपमानाचा बदला आपल्याला त्रास न होता कसा घेता येईल असा विचार मनात होता . […]
माझ्या लाडक्या जँकी कुत्र्याला देखील मी हळू हळू गांजा च्या धुराची सवय लावत होतो , अर्थात त्यामागे माझा फक्त कुतूहल हाच हेतू होता त्याला त्रास देणे हा हेतू कधीच नव्हता तरीही ते अतिशय निंद्य कृत्य होते हे मान्य करायला मला संकोच वाटत नाहीय एका नशेबाज व्यक्तीच्या डोक्यात काय येऊ शकेल हे सांगता येत नाही याचाच हा नमुना आहे . […]
मला लहानपणासून कुत्रा हा प्राणी फार आवडतो , रेल्वे क्वार्टर्स मध्ये रहात असताना शाळेतून येताना एखादे छान गोंडस कुत्र्याचे पिल्लू रस्त्यावर दिसले की लगेच ते घरी घेऊन येत असे आधी आई -वडिलांचा स्पष्ट नकार , मग माझा हट्ट , रडणे वगैरे सोपस्कार झाले की शेवटी नाईलाजाने ते कुत्रा घरात ठेऊन घेण्यास परवानगी देत . […]
मटक्याचा अड्डा जाळण्याची आमची मानसिक तयारी पूर्ण झालेली होती व आम्ही एकून १५ लिटर रॉकेल देखील आणून एका ठिकाणी लपवून ठेवले होते . या मिशन साठी आम्ही शनिवार ची रात्र निवडली होती . ठरल्याप्रमाणे एक जण तेथील परिसराची रेकी करून आला होता बाजूच्या झोपड्या आणि हा अड्डा यात जास्त अंतर नव्हते त्यामुळे कदाचित बाजूच्या झोपड्या पेट घेऊ शकतील हा धोका होता मग त्यावरून आमच्यात वाद झाले की आपण जसे त्या मटक्याच्या अद्द्यावरच्या माणसाला वाचवण्याचा विचार करतोय , तसेच बाजूच्या झोपड्यांच्या बाबतीत काही करता येईल का ? खूप चर्चा झाली […]
मी हळू हळू माझ्या मित्रांच्या नकळत ब्राऊन शुगर ओढू लागलो होतो , सगळे एकत्र असताना गांजा , चरस आणि मग सगळ्यांना शुभरात्री करून झाले की मी घरी येताना सोबत ब्राऊन शुगर ची ती छोटीशी लाल झाकणाची बाटली घरी आणून सिगरेट मध्ये गांजा भरून त्यात थोडीशी पावडर टाकून ओढत असे . मला आठवते एरवी आम्ही गांजा चिलीमितून ओढत असू व त्या वेळी अनेकदा मातीची चिलीम नीट सांभाळावी लागे नाहीतर फुटून जात असे म्हणून मी सायकलच्या पायडलला असलेल्या स्टीलच्या नळी ची एक कायम टिकेल अशी चिलीम बनवली होती .. […]
आझाद सेनेची पहिली मिशन कशी असली पाहिजे या वर आमच्या रोज चर्चा होत असत , शहरातील काही लबाड राजकारणी , दोन नंबरचे काम करणाऱ्या लोकांची यादी तयार करून त्यांना धमकीची पत्रे पाठवावीत असा एक मुद्दा समोर आला , म्हणजे अश्या लोकांना तुमचे सगळे धंदे आम्हाला माहित आहेत आणि आपण हे सगळे सोडून जर नीट वागले नाहीत तर होणारे परिणाम भोगायला तयार राहा असे पत्र या लोकांच्या पत्यावर पोस्ट करायचे . […]
एकीकडे आम्ही गांजा आणि चरस ओढत होतो तरी नेहमी नशा करताना आमच्या चर्चा मात्र देशहिताच्या व्हायच्या व भ्रष्टाचार , काळाबाजार , जातीयवाद असे विषय आमच्या चर्चेत असत . आमच्या या ‘ गंजडी ‘ समूहात सर्व जातीधर्माची मुले होती आणि आमचा वयाने मोठा असणारा मित्र विलास हा जेव्हा जेव्हा आम्हाला भेटत असे तेव्हा तो नेहमी आम्हाला चार चांगल्या गोष्टी सांगत असे […]