कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती, उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा प्रवास या सदरात आहे.. घरातले चांगले संस्कार, कुटुंबातील लोकांचे प्रेम, मैत्रिणीच्या आणाभाका, स्वत:चीच स्वप्ने, सारे सारे झुगारून वारंवार त्याच चुका करायला भाग पाडणारे ते व्यसनाचे वेडेपणाचे आकर्षण कसे स्वतःसोबतच कुटुंबातील लोकांचे नुकसान करते याचा प्रवास म्हणजे नशायात्रा.. मनोरुग्णालय, फूटपाथवर वास्तव्य, व शेवटी कारागृह अशा वळणांवरुन शेवटी थांबलेला दारूण व थरारक प्रवास म्हणजे नशायात्रा.
तुषार नातू यांच्या “नशायात्रा” या पुस्तकावर आधारित…
एका मोठ्या पातेल्यात आम्ही बनवलेली थंडाई ठेवली होती , मग कोणीतरी सांगितले त्यात जर तांब्याचे नाणे टाकले तर अधिक जास्त नशा येते , लगेच तांब्याचे नाणे कुठे मिळेल याचा शोध सुरु झाला , एकाने त्याच्या आजीच्या जवळ असे तांब्याचे नाणे ठेवले होते ते आणले ( मला वाटते या नाण्यालाच खडकू असे म्हणतात ) एकदाची थंडाई तयार झाली आणि मग एकमेकाला आग्रह करून प्यायला लावणे पण सुरु झाले . […]
रेल्वे स्टेशनवर द्राक्ष पेट्यांची हमाली करण्याचे काम आता नियमित झाले होते वर्षातून साधारण ५ महिने हे काम असते , रात्रभर रेल्वे स्टेशन वर भटकणे , गाडीची वेळ आली की द्रक्ष्यांचा पेट्या पार्सल विभागातून काढून त्या पेट्या रेल्वे स्टेशन वर असलेल्या सामान वाहून नेण्याच्या चार चाकी लोखंडी गाड्यावर लादणे आणि मग गाडीचा पार्सल चा डबा ज्या ठिकाणी येतो तेथे त्या पेट्या नेऊन ठेवणे व गाडी आली की ५ मिनिटात धावपळ करून त्या पेट्या पार्सल च्या डब्यात चढवणे असे काम असे , […]
पहाटे पहाटे गांजाचे दम लावून आमची गँग सफाई मोहिमेवर निघाली काही जणांच्या हातात झाडू होते , तर काहींनी खराटे आणले होते मात्र दोन जणांनी काहीच आणले नव्हते त्यांना विचारले तर म्हणाले घरचे झाडू , खराटे सकाळी घरी लागतात म्हणून नाही आणले , मात्र हे दोघेही एकदम झकपक कपडे घालून आले होते त्यापैकी एकाने नवा ‘सफारी ‘ आकाशी रंगाचा तर दुसऱ्याने झब्बा आणि पायजामा घातला होता क्रीम कलरचा , मला त्यांचे ते कपडे पाहून जरा नवल वाटले हे असे कपडे घालून हे कसले झाडू मारणार ? […]
आमची गांजा ओढणारी टीम आता वाढत चालली होती , दारूचा पटकन तोंडाला वास येतो मात्र गांजाचे तसे होत नाही , फक्त पिताना गांजाच्या धुराचा वास दरवळतो आणि अनुभवी किवा जाणकार लोकांनाच गांजा , चरस वगैरे च्या धुराचा वास कळतो , एकदा गांजा ओढून झाला की तोंडाला दारू सारखा भपकारा येत नाही त्यामुळे आम्ही दारू चे सेवन क्वचित आणि गांजा मात्र नियमित ओढत असू , दारू चढल्यावर बहुतेक वेळा भांडणे , शिवीगाळ , फालतू बडबड असे प्रकार घडतात पण गांजा चे मात्र तसे नाही बहुधा गांजा ओढणारे शांत राहतात भांडणे वगैरे प्रकार त्यांना मानवत नाहीत . […]
मला आतून पक्के माहित होते की अतृप्त आत्मे , शनी महाराज वगैरे मला त्रास देत नाहीयेत तर माझे विचार आणि वर्तन माझ्या अधःपतनास जवाबदार होते , मात्र हे मला उघडपणे मान्य करणे कठीण जात होते . माझा दिवसातील जास्तीत जास्त वेळ गांजा पिणे , वाचन आणि मित्रांबरोबर टिवल्याबावल्या करण्यात जात असे, त्याच काळात ‘ श्रीमद्भगवद्गीता ‘ जशी आहे तशी वाचनात आली , […]
जोतिषी एकदम गंभीर झाला होता आणि त्याने निष्कर्ष काढला की याने प्लांचेट करून बोलावलेले आत्मे योग्य ठिकाणी परत गेलेले नाहीत व ते सतत याच्या भोवती असतात , याला अवस्थ करतात , तसेच याच्या राशीत ‘ शनी ‘ आला आहे तेव्हा तो शनी याच्यावर काही ना काही गंडांतर आणत राहणार नेहमीच….. […]
कोणाचा आत्मा बोलवायचा हा प्रश्न बाकी होता सर्वानी एकदम इतिहासातल्या आपापल्या आवडीच्या थोर व्यक्तींची नावे सुचवली ,पण इतक्या थोर व्यक्ती जास्त बिझी असणार तर येणार नाहीत म्हणून मग किरकोळ , सर्वसामान्य व्यक्तीचा आत्मा बोलवावा म्हणजे लवकर येईल व शक्यतो नात्यातील असेल तर लवकर येईल या कल्पनेने माझ्या आजोबांचा आत्मा बोलावण्याचे ठरले ते नैसर्गिकरित्या मरण पावले होते . […]
एका पुस्तकात ‘प्लँचेट’ म्हणजे मृत आत्म्याला बोलावण्याचा विधी सांगितला होता व त्या आत्म्याला जर आपण प्रश्न विचारले तर तो त्याची उत्तरे देतो असे लिहिले होते… हे करणे मात्र मला शक्य होते साधने देखील फारशी लागणार नव्हती, म्हणजे फक्त एक गुळगुळीत पाट, स्टीलचे पाणी पिण्याचे फुलपात्र, खडू, उदबत्ती आणि तीन जण . […]
प्लान ठरला आणि आम्ही सर्व आसपास लपलो फक्त होळी जळत होती आणि होळीजवळ तो प्राण ची नक्कल करणारा उताणा अंगावर कांबळे घेऊन पडला होता सुधाकर येण्याची चाहूल लागली तसे शिटी वाजवून इशारा दिला आणि तो मुलगा हळूच उठून उभा राहिला इकडे सुधाकरची बोबडी वळलेली , भ ..भू .भूत असे म्हणत तो पळत सुटला… […]
माझे वडील रेल्वेत नोकरीस होते व आम्ही सुमारे २० वर्षे नाशिकरोड येथे रेल्वे क्वार्टर मध्ये राहत होतो . तेथे फक्त एकदोन कुटुंबे ब्राह्मणांची होती इयत्ता पहिली पासून मला आसपास खेळण्यासाठी सर्वच जातीधर्मातील मित्र मिळाले, समाजात खोल वर पसरलेला जातीभेद मी तेव्हापासून अनुभवतो आहे तेथे एखाद्या मुलाचा त्याच्या माघारी त्याचा उल्लेख तो गवळ्याचा , तो न्हाव्याचा , धनगराचा , बामनाचा , वाण्याचा असाच होत असे अर्थात प्रत्यक्ष त्या व्यक्तीसमोर असा उल्लेख क्वचितच होई … […]