चीनविरोधात १९६२च्या युद्धात मोठी हार पत्करावी लागल्यानंतर भारतीय सैन्याचे मनोधैर्य खचलेले होते. याच काळात १९६५च्या पहिल्याच महिन्यात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करून भारताविरोधात अघोषित युध्द पुकारले. जुनाट शस्त्रसाठा असलेल्या भारतीय सैन्याचा आपल्यापुढे निभाव लागणार नाही, असा विचार करून पाकिस्तानने अत्याधुनिक पॅटन’ रणगाडे आणि सेबर जेट विमान आणि आधुनिक हत्यारांसह भारतीय लष्करावर हल्ला केला. मात्र भारतीय […]
भारतीय सैन्यदलात महाराष्ट्राच्या सुपुत्रांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सैन्यदलातील सर्वोच्च अधिकारपदांवर मराठी अधिकाऱ्यांनी अतुलनीय कामगिरी करून योगदान दिले आहे. एअर मार्शल पी. एन. प्रधान यांच्या नव्या नेमणुकीमुळे महाराष्ट्राचे हे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एअर मार्शल प्रधान यांचे आजवरचे योगदान आणि नव्या अधिकारपदावरील त्यांच्यापुढची आव्हाने याविषयी.. एअर मार्शल पी. एन. प्रधान हे भारतीय हवाई दलाच्या विविध […]
वन रँक वन पेंशनकरिता सध्या माजी सैनिकांकडून देशभर आंदोलने सुरू आहेत. या प्रश्नावर सरकार तातडीने काही कारवाई करेल अशी सैनिकांची अपेक्षा आहे. भारतीय सैन्याकडे नेहमीच आदराने बघितले जाते, पण नागरी सेवेचे नेतृत्व (इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस) लष्कराला नेहमी दुजाभाव देत असते. नागरी सेवेचे लष्कराशी छुपे युद्ध सुरु असते असे नेहमी म्हटले जाते. वन रँक वन पेंशन याचा […]
भारत हा सुपरपॉवर असल्यासारखा वागत असून अण्वस्त्रधारी पाकिस्तानला स्वतःचे रक्षण कसे करायचे हे चांगले माहित आहे असे विधान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी आताच केले. पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांना भारतातील गुप्तचर यंत्रणा रॉचा पाठिंबा असल्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत.भारत – पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चा रद्द झाल्यानंतर हे विधान केले गेले. […]
आपल्याकडे ‘पेराल ते उगवते अशी एक म्हण आहे. ही म्हण तंतोतंत लागू पडणारे जगातील एक प्रमुख राष्ट्र म्हणजे पाकिस्तान. आजवर भारताविरुद्ध आणि जगाविरुद्धच्या दहशतवादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानची अवस्था आज दयनीय झाली आहे. तेथे अंतर्गत दहशतवादाने थैमान घातले असून पंजाब या पाकिस्तानचे हृदय समजल्या जाणार्या प्रांतात नुकत्याच झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये तेथील गृहमंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. वास्तविक, पेशावरमधील […]
मुरुड तालुक्यातील आठ जण संशयास्पदरीत्या फिरताना ०८ /०८ /२०१५ ला आढळून आले आहेत. हे सर्व जणवेळास्ते, वावडुंगी आणि सायगाव परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आले आहे. याबाबत जिल्ह्य़ात सर्वत्र नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्य़ातील समुद्र किनाऱ्यांवर गेल्या आठवडय़ापासून ज्वालाग्रही रसायनांनी भरलेली पिंपे वाहून […]
पाकिस्तानवरील विजयाचे स्मरण देणारा ‘कारगिल विजयदिन’ भारतात साजरा व्हावा आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुदासपूर जिल्ह्यात दीनानगर येथे दहशतवाद्यांनी १२ तास धुमाकूळ घालावा, हा नियोजित हल्ला आहे. गेले काही दिवस ‘बब्बर खालसा’ ही दहशतवादी संघटना हालचाली करीत होती. गुरुदासपूर हा डावीकडे पाकिस्तानची सीमा तर डोक्यावर काश्मीरची देशांतर्गत सीमा असा भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील जिल्हा आहे. सीमा ओलांडून काश्मीरमध्ये घुसणारे […]
बांग्लादेशमधून अफू, गांजा, चरसचीही तस्करी भारतात केली जाते. भारतातुन बांग्लादेशमधे गोवंशाची तस्करी भारतात केली जाते. तस्करी रोखण्यात यश आले तर, बांगलादेशी घुसखोरी पण कमी होइल. भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेले सीमा सुरक्षा दल आता भारतातून बांगलादेशात होणार्या गायींच्या चोरट्या निर्यातीविरोधात उभे ठाकले आहेत. बांबूची काठी, दोरखंड घेऊन बांगलादेशी बाजारात नेले जाणारे गोधन रोखण्याचे काम जवान करत आहेत. […]
अफगाणी तालिबानचे, अलकायद्याचे हजारो दहशतवादी जे सध्या अफगाणिस्तानच्या सैन्याविरुद्ध लढत आहेत, त्यांना काही काम उरणार नाही. अशा दहशतवाद्यांना पाकिस्तान भारताच्या काश्मिरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करेल. यामुळे तिथे दहशतवाद, येणार्या काळामध्ये वाढू शकतो. भारतानं अंतर्गत सुरक्षा यंत्रणा मजबूत करणं गरजेचं आहे. गुप्तहेर संघटनांनी सतर्क राहणे गरजेचं आहे. […]
जयपूर येथे ‘सीमा सुरक्षा’विषयक एका परिसंवादात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या भाषणातील एका विधानाला नकारात्मक रंग देऊन संरक्षण मंत्र्यांना अकारण वादात ओढण्याचा सुरू झालेला खटाटोप अनाकलनीय आणि अनाठायी आहे. […]