मोदी सरकारने परराष्ट्र धोरणावर भर देऊन जागतिक संबंध सलोख्याचे व्हावेत, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मोदींच्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्यामुळे जे वातावरण बांगलादेशमध्ये पाहावयास मिळाले, ते दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत करणारेच आहे. जमीन हस्तांतरण करार ४१ वर्षांपासून प्रलंबित बांगलादेश आणि भारताच्या मध्ये ब्रम्हापुत्रा नदी आणि तीची इतर पात्रे आल्यामुळे अनेक ठिकाणी बांगलादेशची काही लोकसंख्येची भारतीय खेडी/वस्त्या […]
१७ मे २०१५ला समुद्रात नौदलाच्या बोटीवरून खोल समुद्रामध्ये मच्छिमारांच्या बोटीवरील गोळीबारात सुशांत लुजी (२४) हा खलाशी जखमी झाला .त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘खरिस्ताएल’ या बोटीवरील मच्छिमार बेकायदेशिररित्या समुद्रात टाकलेली जाळी ओढण्याचे काम करीत होते.ओएनजीसी ओइल प्लॅट फॉर्म जवळ रात्रीच्या वेळेस प्रखर लाइट असल्यामुळे जास्त मासे मिळतात.सुरक्षा रक्षकांनी मच्छिमारांना हटकले. नंतर हवेत गोळीबार करण्यात […]
नेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी झाली आहे. सुमारे १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, हजारो इमारती, रस्ते, पूल, वीजपुरवठा, पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या सार्वजिक सुविधा भूकंपामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत. यामुळे नुकसानीचा आकडा येणार्या काळामध्ये वाढणार आहे. या भूकंपानंतर नेपाळमध्ये सर्वात पहिली मदत (नेपाळ सरकार तयार […]
पाकिस्तान झिंदाबाद, पाकचा ध्वज फडकावणे, खोर्यातील नित्याचेच गैरप्रकार पाकिस्तानात आमचं नेहमी खुल्या दिलानं स्वागत केलं जातं. पण भारतात पाकिस्तानी कलाकारांना नेहमीच विरोध केला जातो. कारण, इथं पाकिस्तान हा आपला शत्रूच आहे हे लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं,’ असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे. नसीर यांच्या या वक्तव्याला पाकिस्तानी मीडियात सध्या […]
५६०० हुन जास्त नागरिकांना युध्दभुमी येमेन मधुन सुरक्षित बाहेर काढल्यानंतर “ऑपरेशन राहत” अत्यंत यशस्वीरित्या ०९ एप्रिलला समाप्त झाले. शेवट्याच्या खेपेमधल्या भारतीय नर्सेस बरोबर विदेश राज्यमंत्री जनरल वी के सिंह देशात परत आले. या बरोबर विदेशी देशात चालवलेले सर्वात मोठे ऑपरेशन सफल झाले. जनरल वी के सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली यामधे भारतीय नौसेना, वायुसेना, एयर इंडिया बरोबर भारतीय रेल्वेने […]
सीमा प्रदेशात दळणवळण, सैन्याची तयारी आणि क्षमता वाढवण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ मार्चला सिंगापूर दौऱ्यात या देशातील वरिष्ठ नेत्यांशी परस्पर मैत्री संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. सिंगापूरचे संस्थापक व पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी येथे दाखल झालेल्या मोदींनी इस्रायल, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांच्या नेत्यांचीही भेट घेऊन परस्पर सहकार्याबाबत […]
सत्तेवर आलेले जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजप यांचे आघाडी सरकार स्थिर होण्याच्या आत दहशतवादी रंग दाखवू लागले आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ‘शांततेत मतदान पार पडू दिल्याबद्दल’ मुफ्ती महंमद सैद यांनी मानलेले आभार ‘लष्करे तोयबा’ चे बोलविते धनी विसरले असावे. नाही तर लागोपाठ दोन दिवस भीषण हल्ले करून दहशतवाद्यांनी जम्मूत रक्ताचे सडे घातले नसते. आधी दहशतवाद्यांनी कथुआ जिल्ह्यातील पोलिस ठाण्यावर […]
सेशेल्स, मॉरिशस, श्रीलंका, मालदीव लहान देश भारताकरता महत्त्वपूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११-१४ मार्चचा सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंकेचा दौरा, प्रदीर्घ काळापासून उपेक्षित हिंदी महासागरातील देशांशी संबंध वाढविण्याचे पाऊल आहे. सेशेल्सची एकूण लोकसंख्या ८७ हजार आहे.११५ लहान-लहान बेटांनी बनलेल्या सेशेल्सचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४५५ वर्ग किलोमीटर आहे. सेशेल्स हिंद महासागरातील एक लहानसे मात्र सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे द्विप […]
मुख्यमंत्री सईदवर लगाम घाला नाही तर सरकार बरखास्त करा पीडीपीचे सरकार आल्यापासून फुटीरतावाद्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. कारण, देशाच्या विरोधात युद्ध पुकारणारा फुटीरतावादी मसरत आलम याच्या सुटकेनंतर आता मुख्यमंत्री सईद यांनी आशिक हुसेन फक्तू या फुटीर नेत्याला सोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री सईद यांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच जी भीषण वक्तव्ये केली आहेत ती […]
दहशतवादाचे स्वरुप अतिवेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाचा आधार घेत दहशतवादाचे जाळे फ़ार वेगाने विस्तारत आहे. तसेच एकट्याने दहशतवादी कृत्ये करण्याचा नवा प्रकार उदयास येत आहे. या प्रकारच्या दहशतवादाचा सामना करणे कठीण असते. त्यामुळे अशा दहशतवाद्यांच्या कारवायांचा पूर्ववेध घेणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची आणि प्रगत गुप्तचर माहितीची मोठी मदत होऊ शकते. इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन ते […]