नवीन लेखन...

ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचे हे सदर अत्यंत लोकप्रिय आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष ओलांदे यांची भारतभेट

मालदीव, श्रीलंकेतील अलीकडच्या घडामोडींच्या निमित्ताने शेजारी राष्ट्रांबाबतच्या भारताच्या अनाकलनीय धोरणाचा पुन्हा प्रत्यय आला. पाकिस्तान, चीनबरोबरची डोकेदुखी कायम असताना बांगला देश, नेपाळ आदी शेजार्‍यांशीदेखील आपण सुरळीत संबंध राखू शकत नाही याला कारणीभूत ठरतात आपली चुकीची गृहितके. फ्रान्सच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर फ्रान्स्वा ओलॉद यांनी युरोपबाहेरील पहिल्या परदेश दौर्‍यासाठी भारताची निवड करावी, यावरून भारताबरोबरच्या संबंधांना तो देश किती महत्त्व देत आहे, ते कळते.
[…]

ब्रह्मपुत्रा नदीवर चीनकडून बांधली जाणारी धरणे

ब्रह्मपुत्रा नदीवर  भारत-चीन सीमेजवळच ‘ग्रेट बेंड’ येथे चीनकडून बांधल्या जाणार्‍या मोठय़ा धरणाबाबत भारताने आक्षेप घेतले आहेत. फराक्का येथील बॅरेजवरून भारताकडे वळवल्या जाणार्‍या पाण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद सुरूच आहेत. भारताकडून जास्त प्रमाणात पाणी वळवले जात असल्याचा आरोप बांगलादेशकडून होत आहे.
[…]

शहिद अफझल गुरूचे मित्र आणि राष्ट्रीय सुरक्षा

पाकिस्तानच्या तालावर नाचणार्‍या हुर्रियत परिषदेच्या नेत्यांना अफजलच्या फाशीचे हत्यार, राज्यात पुन्हा असंतोषाचा वणवा पेटवायला उपयोगी पडेल, असे वाटते. अफजल काही राष्ट्रभक्त नव्हता. तो देशद्रोही होता. पाकिस्तानातल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य होता. संसदेवर हल्ला चढवून मोठ्या नेत्यांचे मुडदे पाडायचा कट त्याने रचलेला होता. पण हुर्रियतवाल्यांना मात्र तो नायक वाटत होता.
[…]

अकबरुद्दीन ओवेसी की बॅरिस्टर जीनाचा पुनर्जन्म ?

हैदराबादमध्ये आमदार असलेले अकबरूद्दीन ओवेसी यांनी आमदार असूनही आपण पाकिस्तानमध्ये असल्याप्रमाणेच

वक्तव्ये केली आहेत आणि त्यामुळे भारतातील लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीला धोका निर्माण होईल अशी वक्तव्ये हल्ली सर्रास केली जात आहेत. याला भाषण स्वातंत्र्य म्हणायचे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य? संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे, याचा अर्थ लोकशाही धोक्यात येईल, असे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे.
[…]

२०१३ मध्ये शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध टिकवणे महत्वाचे

पाकिस्तानातून येणारे सशस्त्र दहशतवादी, बांगलादेशातून मोठय़ा प्रमाणावर होणारी घुसखोरी, नेपाळमधून होणारी ग्राहकोपयोगी वस्तू व बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी, म्यानमार-बांगलादेश, भूतानमधील तळांच्या माध्यमातून उल्फा व इतर दहशतवादी गटांनी भारतामध्ये सुरू ठेवलेल्या कारवाया यामध्ये २०१२ मध्ये मोठी वाढ
झाली आहे.

[…]

भोवतालच्या देशांमध्ये चीनची आगेकूच थोपविणे महत्वाचे

गेल्या आठवड्यात मालदीवने मालेच्या “इब्राहिम नसीर आंतरराष्ट्रीय विमानतळा’च्या विकासाचे “जीएमआर’ या भारतीय कंपनीचे कंत्राट रद्द केले.  “जीएमआर इन्फ्रास्ट्रक्‍चर लि.’ कंपनीबरोबर झालेल्या ५१ कोटी १० लाख डॉलरच्या कंत्राटाचे भविष्य मात्र टांगणीला लागले आहे.
[…]

ऑपरेशन एक्स आणि अजमल कसाबला फ़ाशी

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद अमीर अजमल कसाब याला आज फासावर लटकण्यात आले. पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात सकाळी ठीक ७.३० वाजता क्रूरकर्मा कसाबचा “हिशेब” करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांनी कसाबला मृत घोषीत केले.
[…]

नक्षलवादाचे आव्हान: चीनचे भारताशी छुपे युध्द

२४-३०/११/२०१२
पासुन माओवाद्यांच्या “पिपल लिबरेशन गोरिला आर्मिचा रेझिंग सप्ताह” सुरु
झाला आहे. त्या निमित्ताने केंद्रीय गृहखात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे.
स्वामी अग्निवेश यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माओवाद्यांशी वाटाघाटी
करायला तयार आहे

[…]

चिनी आक्रमणाचे अपयश नेत्यांचे? १९६२ चे चीनचे आक्रमण – भाग १

आपला शेजारी आपला पहिला शत्रू असतो हे चाणक्याचे म्हणणे होते. आपल्याला अश्या अनेक अगणिक कर्तबगार महात्म्यांचा वारसा लाभूनही आपण त्याच चुका करतो. सगळे माहित असूनही आपण बोलतो काय लोकांना सांगतो काय आणि वागतो काय या कडे लक्ष दिले पाहिजे. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून आपला बराच मोठा
भूप्रदेश गिळंकृत केला. त्यातून आपण काही धडा शिकलो का? २०/१०/ २०१२ पासून चीन-भारत युद्धाला ५० वे वर्ष झाले.

[…]

लेफ्टनंट जनरल ब्रार यांच्यावर हल्ला

सुवर्णमंदिरात लपलेल्या खालिस्तानवादी दहशतवाद्यांविरोधातील “ऑपरेशन ब्ल्यू स्टार” चे नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल के . एस . ब्रार यांच्यावर रविवारी रात्री लंडनमध्ये चार अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला . हल्ल्यात जखमी झालेल्या ७८ वर्षीय ब्रार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व ऑपरेशननंतर घरी सोडण्यात आले.
[…]

1 25 26 27 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..