आपली अमेरिकेशी मैत्री कितीही घनिष्ठ झाली, तरी अलिप्त राष्ट्र चळवळीचे (नाम) महत्त्व त्यामुळे अजिबात कमी होणार नाही. कारण हीच चळवळ भारताला परराष्ट्र व संरक्षण धोरणात निर्णयस्वातंत्र्याची क्षमता प्राप्त करून देईल. जागतिक गट, निरपेक्ष आंदोलन ही संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेनंतरची सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
आसाम दंगल आणि त्यानंतर देशाच्या अनेक राज्यांतून ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांचा आपल्या गावांकडे निघालेला लोंढा याला जबाबदार असेलेल्या एसएमएस आणि एमएमएसचे मूळ पाकिस्तानमध्ये असल्याचे भारताचे आरोप २० औगस्टला पाकिस्तानने नाकारले आहेत.
आसामातील हिंसाचाराचे पडसाद देशाच्या अन्य भागांत उमटल्यानंतर, ईशान्य भारतीयांचे जिवाच्या भीतीने पलायन सुरू झाले. अशातच १९ ऑगस्टला बंगळुरूहून गुवाहाटी एक्स्प्रेसने आसामकडे निघालेल्या नऊ आसामी नागरिकांना, अज्ञात समाजकंटकांनी बेदम मारहाण करून लुटले आणि नंतर धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या मारहाणीत अन्य सात जण गंभीर जखमी झाले. या देशाला गृहमंत्री आहे, ही एक अफवाच ठरल्याने लोकांनी जीव वाचविण्यासाठी माघारी परतण्याची धावपळ सुरू केली होती. […]
आसाममध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात 31 जणांचा बळी गेला आहे. जातीय दंगलीचा वणवा 500 गावांत पसरला असून कोक्राझार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 23 जुलैपासून आसाममध्ये जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोक्राझार जिल्ह्याला या दंगलीचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोक्राझारमध्ये समाजकंटकांना पाहताक्षणी गोळया घालण्याचे आदेश तसेच अनिश्चितकालीन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. […]
लष्कर-सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांनी गेल्या वर्षभरात दहशतवाद्यांचा बंदोबस्त केल्यामुळे, काश्मीर खोर्यात शांतता आणि निर्भयतेचे वातावरण आहे. परिणामी यावर्षी भूलोकीचे हे नंदनवन परदेशी आणि देशातल्या पर्यटकांनी गजबजले आहे. राजधानी श्रीनगरमध्ये हजारो स्त्री-पुरुष पर्यटक रात्री उशिरापर्यंत शहरातून फेरफटका मारतात. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने राज्याच्या पर्यटन उद्योगालाही चांगले दिवस आले आहेत. हजारो काश्मिरी नागरिकांना रोजगारही मिळाला. […]
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेल्या म्यानमार भेटीला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले. पंचवीस वर्षांनंतर म्यानमारला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. आँग स्यान स्यू की यांच्या लोकशाही लढ्याची फलनिष्पत्ती होत असताना भारताने म्यानमारपुढे केलेला मैत्रीचा हात महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. महत्त्वपूर्ण करार करून मनमोहन सिंगांनी मुरब्बीपणा दाखविला आहे. […]
आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने वर्चस्ववादी भूमिका घेणा-या चीनचे व्यापारीही आता दादागिरी करू लागल्याचे दिसते. आपल्या वस्तू घेण्यास भाग पाडायचे आणि नंतर पैशाच्या वसुलीसाठी पठाणी मार्ग अवलंबायचा. शांघायजवळील यिवू शहरात एस. बालचंद्रन या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याचा झालेला छळ हा त्याच मानसिकतेचा परिपाक म्हटला पाहिजे. […]
सशस्त्र कट्टर जिहादींच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या घुसखोरीमुळे तसेच पश्तुनी भाषेत बोलणार्या कट्टर तालिबानी जिहादींकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मिरमध्ये घातपात घडवून आणण्याची शक्यता वाढली आहे. या दोन्ही कारणांमुळे भारतीय नियंत्रण रेषेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षादलांनी व १ पॅरा स्पेशल फोरर्सेस यांनी आक्रमक हालचाली करून घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. […]