लष्कर म्हणेल तो पंतप्रधान होतो, अशी स्थिती असताना, सध्या तिथे लष्करप्रमुखाचे पद वादाच्या भोवर्यात सापडणे, ही अभूतपूर्व घटना आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा २९ नोव्हेंबरला निवृत्त होणार होते. त्यांना इम्रान खान सरकारने १९ ऑगस्ट रोजी एकदम तीन वर्षांची मुदतवाढ देऊन टाकली. […]
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील तरतुदीनुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मीयांना भारतात १२ ऐवजी ६ वर्षे वास्तव्य केल्यानंतर भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. ‘या देशातील अल्पसंख्यकांना जाण्यासाठी भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही म्हणुन हे जरुरी होते. […]
26 नोव्हेंबर 2019 ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेचे अवलोकन केले पाहिजे. गेल्या पाच वर्षात सागरी सुरक्षेमध्ये काय सुधारणा झाल्या, सध्याची परिस्थिती कशी आहे आणि येणाऱ्या काळात अजून काय जास्त सुधारणा करणे गरजेचे आहे या सगळ्या विषयावर चर्चा होणे जरुरी आहे. […]
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदुंवर अत्याचार केले जात आहेत. इम्रान खान यांच्या पक्षातील एक माजी आमदार बलदेव कुमार यांनी भारतात आश्रय मागितला आहे. भारताने बलुचिस्तान, सिंध, पश्तून आणि आझाद काश्मीर प्रांतातिल मानवधिकाराचा मुद्दा सातत्याने आंतरराष्ट्रिय स्तरावर उठवत राहावा.त्यांना नैतिक/मानसिक समर्थन देत राहावे. आता पाकव्याप्त काश्मीरवरूनही भारताला आक्रमक धोरण अवलंबावे लागेल. पाकिस्तान दहशतवादाला कशा रितीने पोसतो, हे सगळ्यांना कळले पाहिजे. माहिती युध्दाचा वापर करुन हा चेहरा जगासमोर येणे काळाची गरज आहे. […]
जेव्हा राष्ट्राध्यक्षांसारखी महत्त्वाची व्यक्ती काही बोलते तेव्हा त्यात गोपनियता पाळण्याची नितांत आवश्यकता असल्याची जाण चीन प्रशासनाला आहे. त्यामुळेच भारताने देऊ केलेली गाडी वापरण्यास नकार दर्शवत चीन च्या राष्ट्राध्यक्षांसाठी थेट चीनमधूनच गाडी मागवण्यात आली होती. म्हणजे राष्ट्रपतींकडे असलेली माहिती इतरांपासून लपवण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू होते. […]
जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था दोन प्रमुख गोष्टींवर अवलंबून आहे. एक आहे पर्यटन आणि दुसरी आहे सफरचंद आणि इतर सुकामेवा. दहशतवाद्यांनी गेले काही दिवस सातत्याने सफरचंद उद्योगाला लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांचे सध्या लक्ष्य आहे तो काश्मीरचा सफरचंद उद्योग हे स्पष्ट आहे. […]
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद ४-७ ओक्टोबर भारत दौर्यावर होत्या. आपल्या संसदीय निवडणुकीनंतर त्यांची ही पहिलीच भारतभेट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने आपण सुवर्णअध्याय लिहू या, असे मोदी यांनी हसिना यांना बंगाली भाषेत सांगितले. […]
जम्मू-काश्मीरला फिरायला जाणाऱ्या राज्यातील पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्र सरकार आता जम्मू-काश्मीरमध्ये दोन रिसॉर्ट बांधणार आहे हे ३ सप्टेंबरला जाहिर करण्यात आले. विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असणार आहे.पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालय कश्मीर खोऱ्यामध्ये नवीन युनिव्हर्सिटी प्रस्थापित करण्याचा विचार करत आहे यामुळे शिक्षणाचा दर्जा नक्कीच वाढेल. […]
बांगलादेशी घुसखोरांनी पश्चिम बंगाल, आसामसह महाराष्ट्र-मुंबई, ठाण्यातही बस्तान बसवल्याचे अनेकदा उघड झाले आहे.केंद्र सरकारने जास्त घुसखोरी झालेल्या राज्यांत ‘एनआरसी’ची प्रक्रिया राबवावी, बांगलादेशी घुसखोरांना हुडकून काढावे आणि त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करावी. […]
अफ़गाणिस्तानात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यात अमेरिका भारत, पाकिस्तान, इराण आणि चीन हे प्रमुख देश आहेत. भारताने अफ़गाणिस्तानमध्ये आजवर केलेली गुंतवणूक काही अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. तिथली संसद ,हेरात प्रांतात उभारलेलं ‘सलमा’ धरण भारत-अफ़गाणिस्तान मैत्रीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. […]