अखेर ९ सप्टेंबर १९४८ रोजी मंत्रिमंडळाने सैन्याच्या ऑपरेशन पोलोला परवानगी दिली. ज्यांनी निजामाचे अत्याचार पाहिले त्यांच्यासाठी ऑपरेशन पोलो म्हणजे स्वातंत्र्यसूर्यच होता.निजामाच्या कचाट्यातून हैदराबाद संस्थान मुक्त झाल्यानंतर संस्थानात काही वेळ लष्करी प्रशासन होते. […]
आर्म्ड फोर्सेस स्पेशल पावर्स ऍक्ट, १९५० (अफस्पा) अंतर्गत दहशतावादी किंवा त्यांच्याशी संबंधित समर्थकांविरुद्ध कारवाई केल्यास जबाबदार सेनाधिकारी आणि जवानांच्या मागे सीबीआय आणि राज्य पोलिसांचा एफआयआर आणि न्यायालयीन खटले यांचा ससेमिरा लागत आहे.सामान्य नागरिकांमधून दहशतवाद्यांना शोधून बाहेर काढणे अतिशय अवघड असते. केंद्र सरकारने ‘डिस्टर्ब्ड एरिया’ म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रात अफस्पा अंतर्गत कार्यरत असलेले सैनिक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्रस्त आहेत. […]
येत्या २०१८ – २०१९ मध्ये अनेक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय पोलिस दलाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे शक्य नाही. […]
12 ऑगस्ट रोजी लंडनमधील ट्रफाल्गर स्क्वेअर येथे खलिस्तानवाद्यांच्या एकत्र येण्याला भारताने कडाडून विरोध केला होता.भारताने हा प्रस्तावित मोर्चा होऊ नये अशी मागणीही इंग्लंडकडे केली होती. मात्र इंग्लडने तसे करण्यास नकार दिला. यावर भारताने प्रचंड नाराजी व्यक्त केली .हा मोर्चा म्हणजे भारताच्या प्रादेशिक एकात्मतेला धोका पोहोचेल, असे फुटिरतावाद्यांनी केलेले कृत्य आहे अशा शब्दंमध्ये भारताने म्हटले आहे. […]
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि एकूण देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. […]
सुरक्षेची आव्हाने वाढत आहेत ,परंतु १९९० पासून भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्याची संख्या सातत्याने घटत गेलेली आहे. पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी लढण्यासाठी 44 हवाई दलाच्या स्क्वाड्रनची गरज आहे. सध्या केवळ ३१ उपलब्ध आहेत. त्यातही ४० ते ६० वर्षे जुन्या विमानांचा भरणाच अधिक आहे. भारतीय हवाई दल जुन्या विमानांचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु हे काम २०२५ पर्यंतच पुर्ण होइल. […]
आसाममध्ये बेकायदा राहणारे नागरिक शोधण्यासाठी ‘एनआरसी’ हा उपक्रम राबविला गेला. त्यात आसाममधील ३.२९ कोटी लोकांपैकी ४० लाख लोक नागरिकत्वाचा योग्य पुरावा देऊ न शकल्याने अवैध ठरले आहेत. भ्रष्ट यंत्रणा आणि राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने अनेक राज्यांत असे नागरिक आहेत. घुसखोरी करून देशाच्या साधनसंपत्तीत वाटेकरी होणाऱ्या अशा नागरिकांवर कारवाई झालीच पाहिजे. आसामच्या एनआरसीपासून बाकीच्या राज्यांनी वेळीच धडा घ्यायला हवा. […]
भारताने संयुक्त राष्ट्रसंघात अंतरिक्षाला रणभूमी बनविता कामा नये, अशी भूमिका मांडली होती. परंतु आता अंतरिक्षातील धोक्यांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्याऐवजी आपापल्या देशांच्या सुरक्षिततेसाठी अंतरिक्षाचा वापर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. […]
भारत सरकारच्या अॅक्ट इस्ट म्हणजे पुर्वेकडील देशांशी संबंध वाढवण्यासाठी या भागात प्रचंड प्रमाणामध्ये रस्ते, रेल्वेमार्ग, विमानतळ तयार होत आहे. ईशान्य भारतातून जाणारे रस्ते हे म्यानमार, थायलंड आणि इतर साऊथ ईस्ट एशियाच्या देशांमध्ये पोहोचणार आहेत. ज्यामुळे या भागात पर्यटन वाढेल आणि आर्थिक प्रगतीचा वेग वाढण्याची शक्यता आहे. […]
२६ जुलै २०१८ला कारगिल युद्धाला १९ वर्षे पूर्ण झाली. या युद्धानंतर सरकारने कारगिल रिव्ह्यू कमिटी स्थापन केली होती, या कमिटीला या युद्धाआधी झालेल्या चुका आणि त्यानंतर काय तयारी करायला पाहिजे याचे अवलोकन करण्याचे काम दिले होते. १९ वर्षानंतर या कमिटीने दिलेल्या मुद्द्यावर अंमलबजावणी झाली आहे की नाही हे बघणे जरुरी आहे. […]