नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

उद्घोषक (अनाउन्सर)

प्रत्येक यंत्रणेत अनेक पातळ्यांवरचं व्यवस्थापन सांभाळणं हा मोठा कौशल्याचा आणि तंत्रशुद्धतेचा भाग असतो आणि रेल्वेबाबत तर, देशभर ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या मार्गांवर रेल्वे धावती असणं आणि कोणती गाडी कोणत्या स्टेशनामध्ये किती वाजता येते आहे, जाते आहे हे प्रवाशांना माहीत असणं, असा प्रवाशांप्रतीच्या व्यवस्थापनाचा दुहेरी भाग ठरतो. आज प्रवाशांपर्यंत गाडीची माहिती पोहोचवण्याचं काम उद्घोषक करतात, पण रेल्वेच्या सुरुवातीच्या […]

रेल्वेयार्ड व तेथील कर्मचारी

लांब पल्ल्याची गाडी अखेरच्या स्टेशनात म्हणजे मुख्य स्टेशनात आल्यानंतर तपासणीसाठी व इतर छोट्या-मोठ्या दुरुस्तीसाठी ज्या ठिकाणी नेतात ते ठिकाण म्हणजे ‘यार्ड’. यार्डात प्रत्येक डब्याची कसोशीनं तपासणी होते, स्वच्छता होते व ती गाडी परत परतीच्या प्रवासासाठी सज्ज होते. या सर्व कामासाठी अनेक कर्मचारी फार कठीण परिस्थितीत यार्डात काम करीत असतात. उदाहरणार्थ, मुंबईतील माझगाव रेल्वेयार्डाच्या प्रसिद्ध झालेल्या समस्यांकडे […]

रेल्वेचा गार्ड

रेल्वेव्यवस्थापनात ‘स्टेशनमास्तर’ हे पद जसं महत्त्वाचं असतं, तसंच तांत्रिकदृष्ट्या ‘गार्ड’ हा संपूर्ण गाडीचा प्रमुख असतो. स्टेशनमास्तर गार्डला गाडी स्टेशनवरून सोडण्याची विनंती करतो, गार्ड-इंजिन ड्रायव्हरला आज्ञा देतो आणि मगच गाडी स्टेशनाबाहेर पडते. गार्डला गरज वाटल्यास, काही अपरिहार्य कारणासाठी तो इंजिनड्रायव्हरला गाडी थांबविण्यास भाग पडू शकतो. तत्काळ ब्रेक लावण्याचा अधिकार गार्डकडे. दिलेला आहे, म्हणूनच तत्काळ ब्रेकव्हॅनचा डबा हा […]

२६/११- आमची “मिती “

या तारखेची ताजी भळाळती खूण आत्ता दुपारी नेटफ्लिक्स वर पाहिली – ” मेजर ” ! हा चित्रपट दोन दमात बघून संपवला. एका बैठकीत असले इंटेन्स पिक्चर्स आजकाल सहन होत नाही. मेजर उन्नीकृष्णन यांचे २६/११ चे बलिदान आणि पूर्णतया NSG अँगलने केलेला हा चित्रपट! […]

रेल्वे स्टेशनमास्तर

रेल्वे व्यवस्थापनात स्टेशनमास्तर हे एक महत्त्वाचं आणि जबाबदार पद असतं. मुख्य स्टेशनावरून प्रवासीगाड्या सुटतात किंवा तिथे थांबून पुढील प्रवासाला निघतात; या संपूर्ण काळात स्टेशनवर जे काही घडतं त्या सर्व घटनाक्रमांची संपूर्ण जबाबदारी तेथील सर्वेसर्वा-अधिकारपदावर असलेल्या स्टेशनमास्तरची असते. […]

जुनागढचा लघुचित्रकार

नसीर नेहेमीच शब्दांच्या पलीकडे असतो. “फिराक”, ” द वेन्सडे “, ” चायना गेट” आणि अगदी अलीकडचा – अवेळी पावसासारख्या मागील वर्षी निघून गेलेल्या “फिर जिंदगी” वाल्या सुमित्रा भावेंच्या लघुपटात! […]

1 – रेल्वेची ‘मंडळी’ आणि विविध व्यवस्था – परिचय

रेल्वेचा इतिहास, रेल्वेचा प्रवास, या प्रवासात भेटलेली वेगवेगळी स्टेशन्स, या गोष्टी रेल्वेप्रेमींच्या आयुष्यातली जागा ‘सुंदर आठवणी’ म्हणून आपसुक व्यापून राहतात. या प्रवासादरम्यान, देशभर, अगदी कानाकोपऱ्यांत पसरलेल्या, रेल्वेच्या महाकाय जाळ्यामागच्या व्यवस्थेविषयीचं कुतूहलही मनात नकळत जागं होतं. […]

मिस तनकपुर हाजीर हो !

म्हशीचं नांव “तनकपुर ” आणि तेही “मिस ” म्हटल्यावर अपेक्षेप्रमाणे चित्रपट निघाला- यंत्रणांवर कोरडे मारणारा ! फार पूर्वी “जाने भी दो यारो ” नामक ब्लॅक कॉमेडी कॅटॅगिरीतील चित्रपट निघाला होता – त्यांतील लक्षणीय “भक्ती ” आता लोपलीय. मात्र ” मिस तनकपुर ” एक पाऊल पुढे टाकत आपल्या पोलीस आणि न्याय यंत्रणेवर कोरडे ओढतो. तसं तर अलीकडे “गंगाजल “मध्येही पोखरलेल्या कायदा -सुव्यवस्थेच्या “खांबांवर” बोट ठेवलं होतं. इथेही सगळे कोळून प्यायलेले यच्चयावत महाभाग भेटतात. […]

म्युझियम्स आणि फिरती रेल – प्रदर्शने

१९८० साली जगातील उत्कृष्ट रेल युरेल (युरोप रेल्वे) ने प्रवास करीत असताना उत्तम रेल्वे काय असू शकते याचा ‘याची देही याची डोळां’ अनुभव आला. जर्मनीतील म्युनिक येथील जगप्रसिद्ध म्युझियममधील रेल्वेदालन ही त्याचीच छोटी प्रतिकृती आहे. […]

असेन मी, नसेन मी !

आज एके ठिकाणी भूपेंद्र आणि सुवर्णा माटेगांवकरांचे गीत दिसले म्हणून ऐकले- ” बिती ना बिताई रैना “. गुलज़ार /पंचम जोडी, जया /संजीव दुसरी जोडी आणि लता/भूपेंद्र ही तिसरी जोडी. यांपैकी नक्की कोणत्या जोडीने हे गीत अजरामर केलंय, मला १९७० पासून आजतागायत ठरविता आलं नाहीए. यापैकी एक जोडी पडद्यावर दिसली, एक कागदावर आणि वाद्यांमध्ये भेटली तथा तिसरी सरळ आतमध्ये घुसली. […]

1 8 9 10 11 12 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..