नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

गरज आहे का याचा प्रथम विचार करा

आयुष्यात ज्या ज्या गोष्टी कराव्यात असे तीव्रतेने वाटते, त्या करताना कसलाही संकोच बाळगू नका.. सिगारेट ओढावीशी वाटली, ओढा.. दारू प्यावीशी वाटते, जरूर प्या.. प्रेमात पडावंस वाटतं, तसा प्रयत्न करा.. इतकंच कशाला, एखाद ‘प्रकरण’ करावंस वाटलं तर तेही करा.. पण…, हे सर्व करताना ‘याची खरोखरच काही गरज आहे का’ याचा प्रथम विचार करा..!! — गणेश साळुंखे

डार्विनचा सिद्धांत माझ्या नजरेतून

डार्विनचा सिद्धांत सांगतो की माकडापासून माणूस उत्क्रांत झाला.. मला वाटते हा सिद्धांत मनुष्याच्या शरीरापुरताच खरा असावा..! कारण, एकूणच मनुष्याचे आचरट वर्तन पाहाता तो मानसीक पातळीवर अद्याप आपल्या पुर्वजांच्याच पातळीवर असावा अशी शंका घेण्यास भरपूर जागा आहे..!! (आपले राजकीय नेते, अध्यात्मीक ‘बाबा’, मेणबत्ती संप्रदाय आणि दुटप्पी ‘आम आदमी’ म्हणजे आपण सर्व यांच्यामूळे मी प्रसवलेला ‘सिद्धांत’) — गणेश […]

किचन क्लिनीक – काकडी

हि प्रत्येकाची आवडती.हिला बोली भाषेत तवसे देखील म्हणतात.हिची कोशिंबीर,रायते अगदी लाजवाब लागते.गरमी मध्ये शरीर व मन थंड करणारी हि काकडी सगळ्यांचीच लाडकी. हिचा उपयोग स्वयंपाका मध्ये जसा होतो तसाच हिचा वापर आपण घरगुती औषध उपचारात देखील करू शकतो. हिचा वर्षायू रोमश वेल असतो.आणि ह्याच वेलीला हि रसरशीत फिक्कट हिरव्या रंगांची फळे लागतात जे चवीला गोड व […]

किचन क्लिनीक – तोंडली

हि भाजी तशी आपल्या सर्वांच्या परिचयाची व ब-याच लोकांना आवडणारी.तोंडलीची चटणी,भाजी,उसळ,लोणचे असे अनेक प्रकार करून हिचा आस्वाद आपण सगळेजण घेत असतो.दिसायला छोटी असली तरी हि भयंकर रुचकर भाजी आहे. हि तोंडली वेलीला लागते.अर्थात हे त्या वेलींचे फळ होय.हि कडू व गोड अशा दोन प्रकारामध्ये उपलब्ध असते त्यातील कडू हि औषधात वापरतात तर गोड तोंडली स्वयंपाकामध्ये वापरतात. […]

किचन क्लिनीक – दोडके

किस बाई किस दोडका किस हे फुगडी गीत मंगळा गौरीमध्ये लय फेमस हाय बुवा.तर आज आपण नव्याने ओळख करून घेऊयात ह्या दोडक्याची.अहो काही नाही हे दोडके आकांराने दिसते अगदी घोसाळ्याच सारखे फक्त ह्याला धारदार शिरा असतात बरं का.चला आपण ह्याला घोसाळ्याचा सावत्र भाऊच म्हणूयात ना.मग आता दोडके व घोसाळे ह्यात गफलत होणार नाही ना. हिचा देखील […]

आमचे भाईकाका !

महाराष्ट्राने ज्या लाडक्या व्यक्तिमत्वावर जीव ओवाळून टाकला त्या पु.ल. उर्फ भाईंचा जन्मदिवस येताच मी आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागलो. माझं वय होतं अकरा वर्षे. इयत्ता सहावी. एक दिवस आईने माझ्या हातात एक चिटोरा दिला व मला म्हणाली जोग काकांकडे जा आणि त्यांच्याकडे उतरलेल्या पाव्हण्यांची सही घेऊन ये. सही कशाला म्हणतात, ती कशासाठी घ्यायची असते हे न कळण्याच्या […]

नेपाळी मित्राचा सहवास

त्याची मातृभाषा नेपाळी. तो नेपाळहून महाराष्ट्रात येतो. आई देवाघरी गेलेली. वडील गुरखा म्हणून रात्रभर जागत. गावात पहारा देत. लोकांना जागवत. एक भाऊ पाठीशी. तो जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षण घेतो. गावातील व्यापारी , शिक्षक त्यांना मदत करतात. माणुसकी जपतात. मराठी भाषा उत्तम बोलतो. पुढे तो इंजिनीयर होतो. पुण्यामध्ये स्वत:चे वर्कशॉप चालवतो. जगण्यासाठी धडपड करतो. आता ते दोघेही […]

किचन क्लिनीक – दुधीभोपळा

ह्यालाच पांढरा दुधी असे देखील म्हणतात.ह्याचे किती प्रकारची व्यंजने बनत असतील हे सांगणे जरा कठिणच आहे,पण सगळ्यांचा आवडता दुधी हलवा म्हणा,खीर म्हणा,चटणी म्हणा,भाजी म्हणा,सुप इ पदार्थ करतात हे मला माहिती आहे. जसा ह्याचा उपयोग भाजीमध्ये होतो तसाच ह्याचा औषधी उपयोग देखील आहेत बरं का! ह्याचे वेल असते जे दुरवर पसरते ह्या वेलीला हि फिकट हिरव्या रंगांचा […]

किचन क्लिनीक – फळभाज्या

आपण किचन क्लिनीक मध्ये आता पर्यंत मसाले वर्ग व पालेभाज्यांचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहिले आहेत.आता वेळ आली आहे आणखी एका नवीन गटाची ओळख करून घेण्याची,मग मला वाटले तो गट हा भाज्यांच्या भाऊबंदकितला का नसावा अर्थात तो आहे फळभाज्यांचा. आपण प्रत्येक जण ह्या फळ भाज्यांचा उपयोग आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये निरनिराळे पक्वान्न करायला करत असतो.पण ह्याच फळभाज्यांचा उपयोग […]

1 102 103 104 105 106 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..