नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

किचन क्लिनीक – पालेभाज्या – पुदीना

पुदीन्याचा वापर आपण आपल्या स्वयंपाकामध्ये तसा सर्रास करत नसलो तरी देखील काही खास व्यंजनांमध्ये हा आपण हमखास वापरतो.हुॅं तोंडास पाणी सुटले ना ?समजले आम्हास आता ब-याच जणांना भैयाकडील पाणीपुरी,शेवपुरीची आठवण आली असणार.पुदिन्याची चटणी,वेगवेळी बिर्याणी,पुलाव,तसेच गोव्याचा खास पदार्थ चिकन अथवा फिश काफरियल (पापम् शांतम् ??श्रावण आलाय)ह्या सर्वांत ह्याचा हमखास वापर करतात. ह्याचे १-२ फुट उंचीचे सुंदर क्षुप […]

अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ बसलो असता

अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ बसलो असता त्याने काही दिले नाही दिले , तरी आपल्याला फुकटचा वास घेता येतो वा मिळतो. चांगल्या लोकांचा सहवास त्या अत्तराच्या व्यापाऱ्यासारखा आहे. त्यानं काही दिलं नाही, बोलला नाही, उपदेश दिला नाही, चमत्कार केला नाही, तरी त्याच्या देहातून-मनातून ज्या पवित्र लहरी वा स्पंदनं बाहेर पडतात त्यांनी आसपासचं वातावरण पवित्र झालेलं असतं. अशा वातावरणात राहिल्यानं […]

किचन क्लिनीक – पालेभाज्या – पुनर्नवा – (वसुची भाजी /घेटुळी)

ह्याचे प्रसरणशील व बहुवर्षायू क्षुप असते.हे २-३ फुट लांब असते हिचे पांढरा व लाल असे दोन प्रकार असतात.त्यातील पांढरी पुनर्नवा हि प्रामुख्याने भाजी करीता वापरतात.हि भाजी पथ्यकर असली तरी देखील ब-याच प्रमाणात उपेक्षित आहे.म्हणुनच हिचा उपयोग व गुण जाणून घेणे गरजेचे आहे. हि भाजी पावसाळयात भरपूर वाढते.अाणी हिचे पुष्कळ औषधी उपयोग आहेत.पांढरी वसुची भाजी अथवा घेटुळी […]

सळसळता पदन्यास कायमचा थबकला !

२३ तारखेला सासवडजवळील एका गावात माझ्या कार्यक्रमासाठी पुण्यातून बाहेर पडताना टिळक स्मारक मंदिराकडे बघायचं नाही असं अगदी निक्षून मनाला बजावलं होतं. पण स्वारगेटच्या दिशेने जाताना टिळक स्मारकच्या प्रवेशद्वारासमोर ड्रायव्हरला एक क्षण गाडी थांबवायला सांगितलेच. अवघ्या काही तासांपूर्वीचा भरत नाट्य मंदिरातील सळसळता पदन्यास नाट्य परिषदेच्या कार्यालयासमोर निपचित पडलेला बघणं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडली गोष्ट होती. दुरूनच तिला हात […]

किचन क्लिनीक – पालेभाज्या – हादगा (अगस्त्य)

ह्याचे २०-३० फुट उंचीचे भराभर वाढणारे झाड असते.ह्याला शरद ऋतुमध्ये फुले येतात म्हणून ह्याला अगस्त्य ऋषिंच्या नावाने अगस्त्य असे ही म्हणतात. हि भाजी चवीला कडवट असते व थंड असते त्यामुळे ती शरीरातील कफ व पित्त दोष कमी करते. हि भाजी जशी स्वयंपाकात वापरतात तसेच ह्याचा उपयोग आपण घरगुती उपचारांमध्ये देखील करू शकतो. १)जखमेवर हादग्याच्या पानांची चटणी […]

किचन क्लिनीक – पालेभाज्या – अंबाडी

ह्याचे चारपाच हात उंच झाड असते व त्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात.हि भाजी चवीला आंबट असते काही लोक ह्याच्या झाडाच्या साली सुकवून त्याचा वापर आमसुलाचा पर्याय म्हणून करतात. हि भाजी शरीरातील वात दोष कमी करते व पित्त वाढविते. हिचा उपयोग जसा पालेभाजी म्हणून जेवणात केला जातो तसाच घरगुती उपचारांमध्ये देखील आपण हिला वापरू शकतो. चलातर मग […]

किचन क्लिनीक – पालेभाज्या – करडई

हे बहुवर्षायू क्षूप असते. हि भाजी चवीला गोड,तिखट,भूक वाढविणारी व उष्ण असते.हि भाजी शरिरातील वात व कफ दोष कमी करते व पित्त दोष वाढविते. हि भाजी जेवणात तर वापरतात तशीच ती घरगुती औषध उपचारात देखील वापरली जाते. आता हिचे औषधी उपयोग पाहूया. १)सर्दी झाल्यास करडईच्या कोवळ्या पाल्याची भाजी द्यावी. २)ह्या भाजीचा पोटीस सुजेवर बांधल्यास सुज व वेदना […]

किचन क्लिनीक – पालेभाज्या – ओव्याची पाने

ओवाच्या पानांची बेसनाचे पीठ लावून केलेला कुरकुरीत भजी चटकदार लागतात.तसा ह्याचा विशेष वापर पालेभाजी म्हणून जेवणात होत नाही.तरी देखील ह्याच्या विशिष्ट गंधामुळे व त्यात असणा-या औषधी तत्वांमुळे आजीबाईंच्या औषधी बटव्यात हिचे महत्त्वाचे स्थान आहे. ओव्यांची पाने खण्डाकार,मऊ,लवयुक्त व जाड असतात.जणू खरेखुरे वेलवेटचेच पान?.ह्याचे १-३ फूट उंचीचे क्षूप असते. चवीला तिखट,कडू व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील कफ व […]

जीव ( प्राण-आत्मा )

वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत झाली ती […]

किचन क्लिनीक – पालेभाज्या – टाकळा

हि वनस्पती प्रामुख्याने पावसाळयात उगवते.आमच्या गोव्यात देखील हि भाजी ह्या ऋतू मध्ये आवडीने अर्थात गोवेकरी घोस्ताने (कोकणी शब्द)खातात. हि भाजी शिजवल्यावर रूचीकर लागते मग तुम्ही तेलात परतून करा,मुग,चणा अथवा तूरडाळ घालून फक्त गुळ खोबरे घालून शिजवून करा किंवा मग त्यात फणसाच्या सुकवलेल्या आठळया घालून करा.अगदी लज्जतदार लागते हि भाजी.मला आता मी पाककृतीचेच सदर लिहित असल्या सारखे […]

1 104 105 106 107 108 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..