मागच्या वर्षी अलिप्ततावादी देशांची परिषद व्हेनझुएलानं पुढं ढकलली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी. ते त्यावेळी ताजिकिस्तान, कझाकिस्तान आदी देशांच्या दौऱ्यावर जाणार होते. आता यंदाही या परिषदेला पंतप्रधान जाणार नाहीत. यातून संदेश स्पष्ट आहे. आता अलिप्ततावादाचं नेतृत्व करण्यापेक्षा अमेरिकेशी सामरिक व्यवहारवाद अधिक मोलाचा वाटतो. अमेरिका आणि भारताच्या शिष्टमंडळामध्ये एकाच वेळी दिल्ली आणि वॉशिंग्टनमध्ये दोन वेगवेगळ्या विषयांवर वाटाघाटी होऊन […]
लक्ष्य फाउंडेशन’तर्फे अनुराधा प्रभुदेसाई यांचा वीर जवान आणि सामान्य नागरिक यांच्यात एक मैत्रीचा पूल बांधण्याचे काम तेथे कर माझे जुळती… १९९९ मध्ये भारताला पाकिस्तान या शेजारी राष्ट्राबरोबर युद्धाला सामोरे जावे लागले. हिमालयाच्या १८००० फूट उंचीच्या शिखरावर- भारत- पाक सीमेवर- कारगिल येथे, हाडं गोठविणार्या थंडीत आमच्या जवानांनी शर्थीने युद्ध केले आणि भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपले प्राण […]
आपल्या स्वयंपाकामध्ये जिच्या उपस्थिती शिवाय फोडणी हि संकल्पना पुर्णत्वाला येऊच शकणार नाही अशी ही फोडणीवर स्वत:ची मोहर टाकणारी मोहरी उर्फ राई. इंग्रजीत हिला Brassica तसेच Mustard असेही म्हणतात. अमुक व्यक्तीने एखाद्या गोष्टीच्या बाबतींत राईचा पर्वत केला हि म्हण आपल्या सर्वांच्या अगदी तोंडावर असते नाही का, तशीच आहे ही राई. मोहरीचे लहान क्षूप असते आणि आपण वापरतो ती मोहरी ही त्याच्या बिया होय. […]
मसाल्यातला एक खमंग आणि झणझणीत प्रकार. हा हमखास सर्वांच्या जेवणात झणझणीत तडका देण्याकरीता वापरला जातो .हा कंद देखील जमीनीखालीच उगवतो. आयुर्वेदानुसार लसुण ही शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते. ह्यात आंबट सोडुन बाकीचे पाच ही रस अर्थात चवी असतात. आश्चर्य वाटले का? तर स्पष्टीकरण हाजिर हैं! लसणाच्या वरच्या शेंडा तुरट चवीचा असतो, शेंडयाचे टोक खारट असते, […]
आपल्या दररोजच्या जेवणात महत्त्वाचे स्थान असणारा हा मसाले वर्गामधला घटक.खरोखरच कापत असताना जरी सर्वांना रडवत असला तरी देखील आपल्या विशिष्ट चवीने रोजच्या जेवणाला एक वेगळीच चव आणतो.हा सुद्धा जमिनी खालीच उगवणारा कंद आहे.ह्याचे दोन प्रकार आहेत पांढरा आणि लाल.पांढरा कांदा चवीला गोड असतो तर लाल कांदा चवीला तिखट असतो. कांद्याची चव तिखट गोड असते आणि हा […]
किचन क्लिनिक ह्या आपल्या सदरा मार्फत आपल्या स्वयंपाकघराची एक नवीन ओळख करून घेत आहोत. मग सुरूवात झणझणीत मसाल्यांपासून करायची का? आज आपण आले आणि सुंठीची वैद्य ही नवी ओळख पाहूया तर ! आपण सर्वच जण सुंठीचा वापर चहात आणि आल्याचा वापर चहा,चटण्या आणी आपल्या गोव्यात माशांचे सुके बनवण्यासाठी केला जातो. हा कंद जमीनी खाली उत्पन्न होतो, ओला असताना […]
‘फिरंगी’ हा शब्द आपण परदेशी लोकाकरता, विशेषत: इंग्रजांकरीता वापरतो. ‘फिरंग’ हा ‘फ्रेन्ड’ या शब्दाचा त्याकळच्या देशी जनतेने केलेला अपभ्रंश आहे. इंग्रजी अंमलाच्या काळात रात्रीच्या वेळेस लोक तसंच काही काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नसतं..रात्रभर पोलिस पेट्रोलिंग सुरू असायचं..आतासारखे स्ट्रीटलाईट तेंव्हा सर्रास नव्हते, किंबहूना नव्हतेच. रात्रीच्या समयास येताजाता कोणा व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या की पोलिस,”हू कम्स देअर?” […]
बांधणी प्रक्रियेत पाणबुडय़ांमध्ये बदल करणे जरुरी भारतीय नौदलाची सामरिक क्षमता वाढवणा-या अत्याधुनिक स्कॉर्पिन पाणबुडीच्या क्षमतेचा गोपनीय माहितीचा २२ हजार पानांचा दस्तऐवज फुटल्याने देश हादरून गेला आहे.फ्रेंच कंपनी डीसीएनएसच्या सहाय्याने मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये या पाणुबडय़ांची उभारणी सुरू असून त्याचा तपशील ‘द ऑस्ट्रेलियन’ या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी याची गंभीर दखल घेत भारतीय नौदलाला या […]
राज्यसभेत काश्मीरमधील चर्चेला उत्तर देताना, त्यानंतर लगेच स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचीस्थान, गिलगिट आणि बाल्टिस्तान या प्रांतांमध्ये पाकिस्तानने करत असलेल्या अत्याचाराविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर ज्यामध्ये गिलगिट आणि बाल्टिस्तान सामील आहे, हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही तो नक्कीच यापुढे मिळवणारच. याशिवाय त्यांनी बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या स्वातंत्र्य लढ्याचाही उल्लेख […]
अमेरिकेतील मिनियापोलीस शहर. अतिशय सुंदर, विस्तीर्ण आणि अद्यावत अशी बांधणी. नवीन पद्धतीने आखीव असे वसलेले शहर. मोठाले प्रशस्त रस्ते, अनेक सुंदर व आकर्षक बागा, शहराच्या मुख्य भागांत उंच उंच इमारती, स्वच्छपाण्याचा भरपूर साठा असलेले तलाव, शाळा, कॉलेजेस. व्यापारी संकुले, इत्यादी. शहराचा फेरफटका मारताना मनास खुप आनंद होतो. माझा एक मुलगा, कांही वर्षापासून एका कंपनीत तेथे कामाला […]