मेरू आणि टॅब कॅबला मराठी समजत नाही..मराठीचा निवडणूकीय पुळका येणारे राजकीय पक्ष काय करतायत? मी आता काही वेळापूर्वी ‘मेरू’ आणि ‘टॅब कॅब’ या टॅक्सीं कंपन्यांना अंधेरीवरून दहीसर येथे जाण्यासाठी टॅक्सी हवी म्हणून फोन केला..दोन्ही कंपन्यांनी आम्हाला मराठी समजत नाही आणि म्हणून तुम्ही हिन्दी किंवा इंग्रजीत बोला असा विनंतीवजा आदेश दिला..भयंकर अपमानीत वाटलं मला..मी अशा मुजोर टॅक्सीन् […]
सर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द. अगदी ठार अडाण्यालाही या शब्दाचा अर्थ पटकन समजतो. महिन्याचे १ ते १० असे दहा दिवस पगाराचे असतात. मी जी माहिती आपल्याला देणार आहे ती आपल्यास नसल्याने आपले काहीच बिघडणार नाही मात्र माहित असल्याने ‘पगार’ घेताना (पगार नाही) मजा मात्र दुप्पट वाढेल..! मित्रांनो हा कोणत्याही भाषिकाला अगदी आपला वाटणारा शब्द मुळात ‘पोर्तुगीज़’ आहे हे […]
आम्ही लहानपणी ‘शाळे’त जायचो तर आताची मुलं ‘स्कुल’मधे जातात. ‘स्कुल’ शब्द जरी इंग्रजी वाटत असला तरी त्याची जन्मदात्री ‘संस्कृत’ भाषा आहे असं मला ठामपणे वाटतं. तसं इंग्रजी शब्दांच्या व्युत्पत्तीच्या शब्दकोषात इंग्रजी स्कुल शब्दाच्या लॅटीन schola, ग्रीक skhole, फ्रेन्च escole अशा अनेक व्युत्पत्ती स्पष्ट केलेल्या असल्या तरी मला जास्त पटलेली व्युत्पत्ती संस्कृतमधील आहे. ( मी ‘अ’संस्कृत असल्याने […]
वाजले किती हा निदान आपल्या मुंबईकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न. शहरी आयुष्यच घड्याळाच्या काट्याला बांधले गेल्याने हा प्रश्न आपण स्वतःला किंवा दुसऱ्याला विचारणे अत्यंत स्वाभाविक आहे. पण वेळ वाजताना कधी ऐकलीय का? मग वेळेला ‘वाजले’ हा शब्द का वापरला जातो? तर मित्रानो या ‘वाजले’चे मूळ आपल्या प्राचीन संस्कृतीत आहे. घड्याळांचा शोध लागण्यापूर्वी गावात किंवा नगरात लोकांना वेळेची […]
गेल्या १५ दिवसात भारत चीन संबंधांवर परिणाम करणार्या अनेक घटना घडल्या. त्याचे विश्लेशण करुन पाउले उचलणे महत्वाचे आहे. या घट्ना होत्या, दक्षिण चीन समुद्राचा मालकी हक्क मिळवण्यासाठी चीनने मागितली भारताची मदत, पाकला चीनने दिलेल्या अणुभट्ट्या,उत्तराखंडमधील चीनी घुसखोरी,प्रचंड यांच्या रूपाने भारताला नेपाळत मिळालेली संधी .आपले राष्ट्रिय हित जपण्यासाठी आपण योग्य उपाय योजना करायला पाहिजे. वेगवेगळी नावं धारण करून देशातील संवेदनशील […]
मुलगा. वंशाचा दिवा, कुलदिपक, संपत्तीचा वारस..काय काय नांवाने याला पुकारलं जात. भारतात कुठेही गेलात तरी ‘मुलगा’ हा शब्द अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला आपल्याला आढळेल ( केरळ व महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हे सन्माननीय अपवाद! इथे मुलग्यांची क्रेझ नाही) महाराष्ट्रापुरते बोलायचं झालं तर ‘मुलगा’ हा शब्द अगदी अस्सल मराठी मातीतला वाटतो. पण मित्रांनो, अस्सल मराठमोळा वाटणारा हा शब्द मुळचा […]
‘मारवाडी’ या शब्दाचं ‘चिकूशी’ घनिष्ट मेतकूट असल्याचं आपण लहानपणापासून ऐकत आलोय. प्रत्यक्षात आपला संबंध घोलवडच्या खाण्याच्या चिकूशीच जास्तं येत असल्याने, राजस्थानातील मारवाड्याशी त्याचा काय संबंध, असा प्रश्न कधीना-कधी आपल्याला पडतोच. ‘मारवाड्या’चा अविभाज्य भाग असलेल्या ‘चिकू’चा आपण समजतो तसा खाण्याच्या चिकू नामक फळाशी काहीही संबंध नाही हे थोऽऽडा विचार केला तर लक्षात येतं. मारवाड्याचा संबंध कंजूसपणाशी येतो […]
उत्तर भारत आणि जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी लष्कर मोठय़ा प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यामध्ये दरवर्षी किमान ७००-८०० जवान आणि २५ ते ३० अधिकारी शहीद होतात. १९८८ पासून असलेली ही परिस्थिती कायम आहे. ही घुसखोरी थांबवताना सुमारे तीन हजार जवान दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर जखमीही होतात. अनेक जवान आपले हात-पाय, डोळे गमावून बसतात. असं अपंगावस्थेत जिणं किती […]
अपत्याचं नांव ठेवण्याचा विधी. अपत्य जन्मानंतर जनरली १२ व्या दिवशी हा विधी पार पाडला जातो. आपल्यापैकी बर्याच जणांना हा विधी ‘बाराव्या’ दिवशी करतात म्हणून त्याला ‘बारसं’ म्हणतात असे वाटते. मलाही असच वाटायचं पण नंतर शब्दांचा अभ्यास करताना अनेक गोष्टी कळत गेल्या त्यापैकी एक ‘बारसं’ हा शब्द आहे. ‘जे जे आपणांसी ठावे, ते ते जनांसी सांगावे..’ या […]
२६ जुलै रोजी कारगिल युद्धाला १७ वर्षे पूर्ण झाली. अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या युद्धावर अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ […]