रेल्वेमुळे कमी खर्चात, बऱ्याच मोठ्या प्रमाणात अतिशय जलदपणे मालवाहतूक करता येते. पेट्रोल, डिझेलची बचत होते आणि हवेचं प्रदूषण टाळलं जातं. कोकण रेल्वेची ‘रो रो वाहतूक सर्व्हिस’ हे यामधले पुढचं पाऊल आहे. ही ६० ते ७० डब्यांची मालगाडी आहे. या मालगाडीत मालाने भरलेले ट्रक (ड्रायव्हर आणि क्लिनरसह) चढविले जातात. मुंबईजवळ कोलाड येथे या मालगाडीत ट्रक चढविले जातात […]
अवघ्या कोकणवासीयांचं स्वप्न असलेला ‘कोकण रेल्वे’ हा स्वतंत्र भारतातला ‘भारतीय रेल्वे’चा सर्वांत लांब, बांधण्यास महाकठीण असलेला प्रकल्प होता. या बांधणीचं दिव्य स्वप्न ३० ते ३५ वर्ष कागदावरच धूळ खात पडलं होतं. १९९० च्या सुमाराला भारतीय रेल्वेच्या आधिपत्याखाली ‘कोकण रेल्वे बोर्ड’ ही एक स्वायत्त कंपनी स्थापन झाली. कोकण रेल्वे हा भारतानं संपूर्णपणे स्वत:चं तंत्रज्ञान वापरून बांधलेला सर्वांत मोठा प्रकल्प आहे. […]
या अदृश्य असाव्यात आणि आपल्याला काय चालेल आणि काय नाही याची लख्ख जाणीव त्यांनी इतरांना करून द्यावी. शेवटी सीमाभिंती स्वसंरक्षणासाठी असतात. कोठपर्यंत आतवर प्रवेश आहे आणि कोणत्या पावलापाशी तुमच्या अवकाशातील तटबंदी रोखेल याची दिसेल न दिसेल अशी पाटी प्रत्येकाच्या सीमाभिंतीवर लावलेली असावी. जी व्यक्ती विनापरवानगी त्या अवकाशावर अतिक्रमण करेल तिला बिनदिक्कत बाहेरचा रस्ता दाखविता आला पाहिजे. […]
भारतीय रेल्वेवरील जीवनवाहिनी एक्सप्रेस म्हणजेच रुळांवर चालणारं एक फिरतं रुग्णालय. अशी गाडी सुरू करण्याचा पहिला मान भारताकडे आहे. १९९१ सालात खलारी या बिहारमधील गावापासून ही सेवा सुरू झाली व गेली २४ वर्षे तिच्या मार्गावरील, भारताच्या कानाकोपऱ्यांतील छोट्या गावांपर्यंत ही गाडी जात असते. […]
१८५३ साली मुंबईत सुरू झालेल्या भारतातल्या पहिल्या रेल्वेने १६ एप्रिल २००३ रोजी दिडशेव्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्त रेल्वे मंत्रालयाने मुंबईत एक महत्त्वाचा सोहळा आयोजित केला होता. रेल्वेला तिच्या गुणदोषांसह स्वीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवलेल्या मुंबईकरांनी त्या दिवशी मध्य रेल्वेची ठाण्यापर्यंतची सगळी स्टेशन्स व्यापून टाकली आणि रेल्वेवरील आपलं निस्सिम प्रेम व्यक्त केलं होतं. १६ एप्रिल १८५३ […]
भारताची महाराजा एक्सप्रेस ही ८४ प्रवाशांना घेऊन जाणारी आलिशान गाडी जशी जगप्रसिद्ध आहे, तशाच त-हेच्या जगातील काही गाड्यादेखील रेल्वेप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहेत. ह्या प्रसिद्ध गाड्या अशा आहेत: रोव्हास रेल (दक्षिण आफ्रिका): उत्तम सजावटीची जगातील क्रमांक १ ची गाडी […]
सोलापुरात असताना आधी “रजनीगंधा ” आणि नंतर ” छोटी सी बात ” पाहिला. मध्यम वर्गीय प्रमुख पात्रे – विद्या आणि अमोल ! बसने प्रवास वगैरे करणारे, कपडेलत्तेही आपल्यासारखे . धर्मेंद्र आणि हेमाच्या सिनेमाला (आपल्यासारख्या आवडीने) जाणारे आणि त्यांच्या जागी स्वतःला कल्पणारे. […]
भारतीय रेल्वेमधील स्वप्ननगरीचं सुख अनुभवावयाचं असेल, तर ‘पॅलेस ऑन व्हील्स’ या एकमेव अतिश्रीमंत गाडीचं नाव समोर येतं. देशाचा अभिमान, असलेली ही राजेशाही गाडी नवी दिल्लीहून निघून पुढे जैसलमेर, जयपूर, जोधपूर, रणथंबोर (व्याघ्र प्रकल्प), आग्रा असा आठ दिवसांचा आरामदायी व आनंददायी प्रवास घडविते. या गाडीचा प्रत्येक डबा म्हणजे पारंपरिक भारतीय पद्धतीनं सजविलेला महालच आहे. […]
प्रत्येक प्रवासीगाडीला नाव असतं. नाव नसेल, तर ती गाडी जिथून निघते त्या सुरुवातीच्या स्टेशनच्या किंवा जेथे ती अखेरीस थांबते, त्या शेवटच्या स्टेशनच्या नावानं ओळखली जाते; परंतु रेल्वे स्टेशनं, तिकीट कंट्रोल रूम येथे मात्र त्या गाड्या क्रमांकानुसार ओळखल्या जातात. १०० वर्षांपूर्वी गाडीला साधा एक अंकी किंवा दोन अंकी क्रमांक असे. मुंबईहून निघणाऱ्या गाड्यांना ‘डाऊन’ गाडी व मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना ‘अप’ असं संबोधले जाई. त्याप्रमाणे डाऊन गाडीला जो क्रमांक दिला असेल, त्याच्या पुढचा क्रमांक अप गाडीसाठी दिला जाई. […]
बऱ्याच गाड्यांना अतिशय आकर्षक नावं दिली जातात. यासाठी जनतेकडून अपेक्षित नावं मागवली जातात. जनतेकडून नावं आल्यावर त्यावर रेल्वे बोर्ड विचार करतं आणि त्यानंतर गाडीचं नाव पक्कं केलं जातं. गाडी स्टेशनवरून निघताना व स्टेशनात शिरताना त्या नावाची घोषणा झाली, की गाडी सर्वांचे लक्ष वेधून घेते. एखाद्या प्रदेशातील ते प्रचलित वैशिष्ट्यपूर्ण नावही असू शकते. […]