नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

राजकीय पक्ष आणि माध्यमांचा बेजबाबदारपणा

पोरबंदरच्या प्रकरणानंतर ज्याप्रकारचा मजकूर प्रसिद्ध केला जात आहे आणि वाहिन्यांवरून ज्याप्रकारे चर्चा केली जात आहे, विधाने केली जात आहेत, त्या वाचताना-पाहताना अनेक प्रश्न उपस्थित होतात प्रत्येक गोष्टी कायद्याच्या आधारे सिद्ध करण्यासाठी घाई कशाला हवी ? आपल्या सुरक्षा यंत्रणांवर आपण विश्वास ठेवणार आहोत की नाही? ? की आपला पाकिस्तानहून आलेल्या बातमीवर अधिक विश्वास आहे ? आणि जर तसा असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारे शत्रूराष्ट्राच्या बाजूने झुकणार्‍यावर आणि त्यांची भलामण करणार्‍यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटले दाखल करण्याची गरज आहे. […]

शांतता ( Silence )

शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. शांत असाल तरच आवाज ऐकू शकाल. ध्यान धारणा ह्या प्रक्रियेमध्ये शांततेला अनन्यसाधारण महत्व असते. शांतता म्हणजे केवळ वातावरणातील शांतता नव्हे. ती लागते मनाच्या स्थरावर देखील. शांतता म्हणजे केवळ आवाज नसणे, हे अभिप्रेत नाही. त्या वातावरणात देखील खऱ्या शांततेचा मागोवा घ्यावा लागतो. शोध घ्यावा लागतो. तीलाच खरी मनाची शांतता म्हणता येईल. […]

जन्म-मृत्युचे चक्र

खेळाच्या एका मैदानावर कोपऱ्यात बसलो होतो. समोर काहीं मुलांचे खेळ चालू होते. ते बघण्यात मी स्वतःची करमणूक करीत होतो. अचानक माझे लक्ष्य शेजारी गेले. बऱ्याच मुंग्यांची तेथे जा ये चालू होती. कदाचित् जवळपास कांहीतरी त्यांचे खाद्य पदार्थ पडलेले असतील. म्हणून ती मुंग्यांची वर्दळ असावी. माझ्या विचारांना एकदम खंड पडली, ती एका मुंगीने माझ्या हाताला कडकडून चावा […]

जीवन रंगभूमीवरील यशस्वी कलाकार

वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो. […]

सोशल मिडीयावरुन आयएसआयएसचा प्रसार

जगभरात सर्व स्तरांमध्ये ट्विटर हे लोकप्रिय माध्यम बनले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी, हॉलीवुड-बॉलीवुड कलावंत किंवा नरेंद्र मोदींपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेक नेते ट्विटरची मदत घेतात. दिवसा नोकरी रात्री आयएसआयएस’साठी काम इस्लामिक स्टेट इन इराक ऍण्ड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेचे ट्विटर अकाऊंट बंगळुरू येथून चालविणार्‍या मेहदी मसरूर बिस्वास या तरुणाच्या मुसक्या कर्नाटक पोलिसांनी आवळल्या. आपण […]

मला समजलेले कर्मफळ

प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या चक्रामध्ये सतत कोणते ना कोणते काम करावेच लागते. त्याची प्रत्येक हालचाल हे छोटेसे कर्म बनत जाते. प्रत्येक क्षण हा कर्माने बांधलेला असतो. कर्माववर सभोवताल, परिस्थिती आणि व्यक्तीच्या चेतना ह्याचा परिणाम होत असतो.  व्यक्तीचे अंतरंग व बाह्यांग प्रत्येक कर्माचे परिणाम ठरवतात. ते चांगले वा वाईट, सुख वा दुःख निर्माण करणारे ठरतात. व्यक्तीच्या आवडी निवडीवर ते […]

भारतीय ब्रॅंडस

ब्रॅंडसच्या या जमान्यात भारतातल्या कोणत्या ब्रॅंडला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळालं नसलं तरीही भारतीय ब्रॅंडस मजबूत मात्र आहेतच. परदेशी कंपन्यांच्या एवढे नसले तरीही काही भारतीय ब्रॅंडस अगदी घराघरात पोचलेले आहेत. […]

२६/११ ची ६ वर्षे : सागरी सुरक्षा सुधारणांचा वेग वाढवण्याची गरज

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नुकतीच सहा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नांचा फेरआढावा घेण्यात आला. मुंबईसारख्या शहरामध्ये घुसण्यात दहशतवाद्यांना यश आले तरीही त्यांच्याशी लढाई करण्यासाठी किंवा त्यांचा खात्मा करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डचे कमांडोज् कायमचे नियुक्त करण्यात आलेले आहेत. हे कमांडोज भारतीय सैन्याचे सर्वोत्कृष्ट कमांडो म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच मुंबईत जर भविष्यात काही दहशतवादी शिरले […]

ब्रॅंड-नामा

तुम्हाला कधी एखाद्या ब्रॅंडचा उगम कसा झाला असेल असा प्रश्न पडलाय का? सगळं काही ब्रॅंडेड वापरण्याच्या या दिवसात जागतिक कंपन्यांबरोबरच भारतातल्या कंपन्याच्या ब्रॅंडसविषयी जाणून घेतानाच आपण बघणार आहोत मराठी माणसाच्या काही कंपन्यांच्या ब्रॅंडसविषयीही… फक्त “ब्रॅंड-नामा” या नव्या कोर्‍या सदरामध्ये….
[…]

वर्तमान काळांत जगा

काळाला तीन भागांत विभागले जाते. भविष्य, भूत आणि वर्तमान काळ. भविष्य काळ अर्थात येणारा भावी काळ आणि भूत काळ गेलेला अर्थात मागचा काळ. दोन्ही काळाच्या मध्यभागी येणाऱ्या व जाणाऱ्या सिमा रेषेवर ज्याचे अस्तित्व मानले गेले तो वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानकाळाचे मोजमाप किती वेळेचा तो काळ ह्याचे परीमाण ठरवीणेकेवळ शक्य नाही. येणारा काळ जो ज्या क्षणाला जातो तेव्हांच […]

1 123 124 125 126 127 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..