हैदराबाद बॉम्बस्फोटांत सांडलेले निरपराध्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. आक्रोश आणि किंकाळ्या अद्याप थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानी अतिरेक्यांनी श्रीनगरमधील ‘सीआरपीएफ’च्या कॅम्पवर १३/०३/२०१३ ला आत्मघाती हल्ला केला. ‘अतिथी देवो भव:’ ही भारताची संस्कृती आहे. मात्र, ती विश्वासघातकी अतिथीला लागू पडत नाही. भारताचा सतत द्वेष करणार्या, सतत भारताशी जमेल तेथे शत्रुत्व करणार्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र पायघड्या घालत हे सरकार जाणार, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. […]
बांगलादेश आणि भारत या देशांत अस्वस्थता कशी नांदेल हे पाहणे हे पाकिस्तानी नेतृत्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे बांगलादेशातील विद्यमान घडामोडींबाबत आपण अधिक सजग असणे गरजेचे आहे. गेले काही आठवडे त्या देशात साचलेल्या खदखदीचे रूपांतर धर्माध आणि निधर्मी शक्ती यांच्यातील संघर्षांत झाले असून या संघर्षांची झळ आपल्याला लागणार आहे. […]
मालदीव, श्रीलंकेतील अलीकडच्या घडामोडींच्या निमित्ताने शेजारी राष्ट्रांबाबतच्या भारताच्या अनाकलनीय धोरणाचा पुन्हा प्रत्यय आला. पाकिस्तान, चीनबरोबरची डोकेदुखी कायम असताना बांगला देश, नेपाळ आदी शेजार्यांशीदेखील आपण सुरळीत संबंध राखू शकत नाही याला कारणीभूत ठरतात आपली चुकीची गृहितके. फ्रान्सच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर फ्रान्स्वा ओलॉद यांनी युरोपबाहेरील पहिल्या परदेश दौर्यासाठी भारताची निवड करावी, यावरून भारताबरोबरच्या संबंधांना तो देश किती महत्त्व देत आहे, ते कळते. […]
मी माझ्या नातवाला घेऊन मित्र गणपत पवार याचेकडे गेलो होतो. त्याचा नातू माझ्या नातवाशी समवयाचा. दोघेही एकाच कक्षेत शिकणारे. आम्ही दोघे मोठ्या झोपाळ्यावर ….. […]
ब्रह्मपुत्रा नदीवर भारत-चीन सीमेजवळच ‘ग्रेट बेंड’ येथे चीनकडून बांधल्या जाणार्या मोठय़ा धरणाबाबत भारताने आक्षेप घेतले आहेत. फराक्का येथील बॅरेजवरून भारताकडे वळवल्या जाणार्या पाण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद सुरूच आहेत. भारताकडून जास्त प्रमाणात पाणी वळवले जात असल्याचा आरोप बांगलादेशकडून होत आहे. […]
पाकिस्तानच्या तालावर नाचणार्या हुर्रियत परिषदेच्या नेत्यांना अफजलच्या फाशीचे हत्यार, राज्यात पुन्हा असंतोषाचा वणवा पेटवायला उपयोगी पडेल, असे वाटते. अफजल काही राष्ट्रभक्त नव्हता. तो देशद्रोही होता. पाकिस्तानातल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य होता. संसदेवर हल्ला चढवून मोठ्या नेत्यांचे मुडदे पाडायचा कट त्याने रचलेला होता. पण हुर्रियतवाल्यांना मात्र तो नायक वाटत होता. […]
हैदराबादमध्ये आमदार असलेले अकबरूद्दीन ओवेसी यांनी आमदार असूनही आपण पाकिस्तानमध्ये असल्याप्रमाणेच
वक्तव्ये केली आहेत आणि त्यामुळे भारतातील लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीला धोका निर्माण होईल अशी वक्तव्ये हल्ली सर्रास केली जात आहेत. याला भाषण स्वातंत्र्य म्हणायचे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य? संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे, याचा अर्थ लोकशाही धोक्यात येईल, असे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे. […]
जीवनातील अंतिम परंतु महान सत्य म्हणजेच “मृत्यू”. जो ह्या विश्वात आला तो एक दिवस जाणारच ह्यात तिळमात्र शंका नाही. ज्ञान असो वा विज्ञान आजपर्यंत तरी कुणीही मृत्यूच्या सत्यतेविषयी आक्षेप घेतला नाही. […]
९४ वर्षे आयुष्य लाभलेली आत्याआजी नुकतीच वारली. चांगली प्रकृती, सुदृढ बांधा, अत्यंत कष्ट करणारी ती होती. ती उठते केंव्हा, झोपते केंव्हा, हे मला केव्हांच दिसले नव्हते. फक्त ती सतत कोणते ना कोणते घरकाम करण्यांत व्यस्त असायची. तीच्या कष्टामध्ये तीला व्यस्त राहण्याची कला साध्य झाली होती. […]
पाकिस्तानातून येणारे सशस्त्र दहशतवादी, बांगलादेशातून मोठय़ा प्रमाणावर होणारी घुसखोरी, नेपाळमधून होणारी ग्राहकोपयोगी वस्तू व बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी, म्यानमार-बांगलादेश, भूतानमधील तळांच्या माध्यमातून उल्फा व इतर दहशतवादी गटांनी भारतामध्ये सुरू ठेवलेल्या कारवाया यामध्ये २०१२ मध्ये मोठी वाढ झाली आहे. […]