गेल्या आठवड्यात मालदीवने मालेच्या “इब्राहिम नसीर आंतरराष्ट्रीय विमानतळा’च्या विकासाचे “जीएमआर’ या भारतीय कंपनीचे कंत्राट रद्द केले. “जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लि.’ कंपनीबरोबर झालेल्या ५१ कोटी १० लाख डॉलरच्या कंत्राटाचे भविष्य मात्र टांगणीला लागले आहे. […]
नुकताच दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाचं वरदान लाभलेली भूमी असे वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली, क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपांनी स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना दिसत होती. सार बघतांना ह्रदय भरुन येत होतं. […]
सर्वच अडचणी व प्रश्न एका दमांत सोडविण्याचा प्रयत्न करु नका. एका वेळी एकच प्रश्न वा अडचणीचे समाधान करा. असे म्हणतात की मानवी जीवन व त्याची दैनंदिनी ही एखाद्या तंबूप्रमाणे (Like a Tent ) असते. मध्यभागी एक उभा खांब आणि सर्व डोलारा निरनिराळ्या दोर्यांनी बांधलेला. दोर्यांची ढील वा आवळले जाणे सतत चालते. […]
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद अमीर अजमल कसाब याला आज फासावर लटकण्यात आले. पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात सकाळी ठीक ७.३० वाजता क्रूरकर्मा कसाबचा “हिशेब” करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांनी कसाबला मृत घोषीत केले. […]
२४-३०/११/२०१२ पासुन माओवाद्यांच्या “पिपल लिबरेशन गोरिला आर्मिचा रेझिंग सप्ताह” सुरु झाला आहे. त्या निमित्ताने केंद्रीय गृहखात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे. स्वामी अग्निवेश यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माओवाद्यांशी वाटाघाटी करायला तयार आहे […]
आपला शेजारी आपला पहिला शत्रू असतो हे चाणक्याचे म्हणणे होते. आपल्याला अश्या अनेक अगणिक कर्तबगार महात्म्यांचा वारसा लाभूनही आपण त्याच चुका करतो. सगळे माहित असूनही आपण बोलतो काय लोकांना सांगतो काय आणि वागतो काय या कडे लक्ष दिले पाहिजे. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून आपला बराच मोठा भूप्रदेश गिळंकृत केला. त्यातून आपण काही धडा शिकलो का? २०/१०/ २०१२ पासून चीन-भारत युद्धाला ५० वे वर्ष झाले. […]
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रेडी येथील श्री गणेश अखंड पाषणात घडवलेली ५-६ फुट उंचीची मुर्ती आणी तिला शोभेल अशाच आकाराचा ऊंदीर. मंदिराचे बांधकाम अलिकडच्या काळातले आहे. […]
सुवर्णमंदिरात लपलेल्या खालिस्तानवादी दहशतवाद्यांविरोधातील “ऑपरेशन ब्ल्यू स्टार” चे नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल के . एस . ब्रार यांच्यावर रविवारी रात्री लंडनमध्ये चार अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला . हल्ल्यात जखमी झालेल्या ७८ वर्षीय ब्रार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व ऑपरेशननंतर घरी सोडण्यात आले. […]