दुःख वाटल्याने कमी होतं म्हणे ! हेही पटत नाही. माझ्याकडचं एक किलो दुःख चार जणात वाटल्याने ते प्रत्येकी २०० ग्रॅम ( मी धरून पाच ) होत नाही. माझ्यासाठी ते एक किलोच राहतं आणि प्रदीर्घ काळ टिकतं . नवं दुःख आलं म्हणजे जुनं विसरलो असं होत नाही. ते सतत असतच आणि एकाकी असताना नव्याने, पूर्ण शक्तीनिशी भिडतं. […]
नात्यांनी,जवळीकेने आजकाल चकीत व्हायला होतं – जी नाती कधी रुजतच नाहीत, ती जवळ आल्यावर धसकल्यासारखं होतं आणि दूर गेली की सुस्कारा सोडल्यासारखं हायसं वाटतं. […]
ख्रिस रॉक आणि विल स्मिथ यांच्यातील ऑस्कर सोहोळ्यातील “देवाण -घेवाण ” दिसलीच असेल दूरदर्शनच्या पडद्यावर ! रॉकने स्मिथच्या पत्नीबाबत खुलेआम एक शेरेवजा विधान केले. त्याबदल्यात व्यासपीठावर जाऊन स्मिथ ने त्याला थोबाडीत दिली. याही घटनेच्या तळाशी काहीतरी शिकवून जाणारा धडा आहे. वरवर न्यायाधीश बनून निकाल देण्याच्या आपल्या (भोचक, अनाहूत) सवयीच्या पलीकडे जाऊन आपली “समज” खोल करणारे काही हाती गवसतंय का हे पाहणे आपल्याला प्रगल्भ करत असते. […]
बोरीबंदर स्टेशन पाहताना लंडन शहरातील सेंट पॅनक्रॉस रेल्वेस्टेशन सारखा भास होतो. ही भव्य देखणी वास्तू बांधण्यास २.६ लाख पौंड खर्च आला होता, पैकी फ्रेडरिक यांनी आपली फी रुपयांत १८ लाख इतकी स्वीकारली होती. हे स्टेशन जागतिक वास्तुशिल्पांमधील एक जागतिक वारसा (World Heritage Structure) बनून राहिलं आहे. ३६५ दिवस, २४ तास अखंड कार्यरत असणारं हे रेल्वेस्टेशन आहे आणि म्हणून ‘वारसा यादी’त त्याचं महत्त्व […]
त्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात उगाचच हॉर्न वाजवत गाडी फिरवायला सुरुवात केली. संतपूर सरांना हे पटले नाही. त्यांनी गाडीजवळ जाऊन त्यांना ठाम शब्दात समज दिली की “हा महाविद्यालयाचा परिसर आहे आणि सध्या परीक्षा सुरु आहेत. तुम्ही आमच्या आवारात येऊन गोंधळ घालू नका”. […]
रेल्वेची भराभराट होत गेली, तसतशी रेल्वेमार्गावर स्टेशनच्या रूपात आलेली, पण एके काळची नगण्य असलेली अनेक खेडी उजेडात आली. खेड्यांची गावं झाली, गावांची शहरं, तर शहरांची महानगरं बनली. प्रत्येक स्टेशन हे त्या त्या प्रदेशाचं सांस्कृतिक केंद्र बनलं आणि ही स्टेशनं विविध व्यवसायांची केंद्रस्थानंही बनली. […]
१९७५ च्या मध्यावर मी भुसावळ सोडले पण तोपर्यंत गावातील तीन हिंदू -मुस्लिम दंगलींचा अनुभव गाठीला होता. पोलिसांचे वेढे,अस्ताव्यस्त जनजीवन, अंधारलेली अनाम भीती आणि वातावरण निवळायला लागलेला वेळ ! […]
आयुष्यात खूप बडबड केल्याची आणि शांत न राहिल्याची खंत आजकाल उसासून वाटते. आपण निःस्तब्ध झाल्यावरच आयुष्याच्या प्रवाहावर सूर्य आणि चंद्र स्वतःचे ठळक प्रतिबिंब मागे विसरून जात असतात. शब्द पोरके झाले की प्रतिमांचा आधार घ्यावा आणि प्रतिमांचे चेहेरे धूसर झाले की शांततेला शरण जावे. मामी शांत झाली म्हणजे यातनांना शरण गेली असा जसा अर्थ होतो, तसेच मला वाटते शांतता म्हणजे भोग नसतात. […]
विस्तार बघून आश्चर्य वाटेल असं जगातलं सर्वांत मोठं रेल्वेस्टेशन इटलीतल्या मिलान इथे आहे. १०३ एकरांच्या भल्याथोरल्या परिसरात ते पसरलेलं आहे; तर भारतातलं सर्वांत मोठ स्थानक कलकत्त्यात ८० एकर परिसरात हावडा रेल्वेस्टेशन’ नावानं बनलेलं आहे. इथे १६ ते १८ प्लॅटफॉर्म्स आहेत. या स्टेशनच्या बाहेर हातगाडी, घोडागाडी, बैलगाडी, ऑटो, टॅक्सी, लॉरी, बसेस आणि ट्राम्स इतकी विविध त-हेची वाहनं उभी असतात. स्टेशनबाहेरच्या जागेत वाहनांची इतकी विविधता एकाच ठिकाणी दृष्टीला पडणारं हे जगातलं एकमेव रेल्वेस्थानक आहे. […]
मार्च २३- माझे रायपूरला “मराठी भाषेचा नाटयप्रवास ” या विषयावर व्याख्यान झाले. संयोजक होते – महाराष्ट्र मंडळ ! १९३५ पासून कार्यरत असलेले आणि मराठी मातीपासून दूर रुजलेले हे बी आता फोफावले आहे. त्यांचे वर्षभर अनेकविध उपक्रम सुरु असतात. मी पूर्वी रायपूरला असताना त्यांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार होतो. आता तर renovation चे प्रचंड काम त्यांनी हाती घेतलेले आहे. […]