बागेतल्या कुंड्यात झाडे लावावी, नको असलेली काट छाट करावी दोन झाडांचे एकत्र रोपण करावे, हे सारे जितके सहज व शक्य झालेले आहे तसेच मानवी देहावर देखील सर्व प्रक्रिया शक्य होत आहेत. तो काळ आता नजीक येऊ लागला आहे जेव्ह्ना प्रयोग शाळेत जिवंत देहाची निर्मिती सहजतेने होईल. ह्यात शंका नसावी. […]
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बहुतांश व्यक्तींना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी अर्थप्राप्तीच्या पर्यायी मार्गाचाही शोध घेतला जात आहे. जिओमुळे स्वस्त झालेल्या इंटरनेटचा वापर मनोरंजनाबरोबरच माहिती,ऑनलाईन उत्पन्न मिळविण्यासाठी म्हणजेच online earningकरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातोय.त्यासंबंधीचे आकर्षक थंबनेल असलेले युट्यूब व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात गैरसमज व अवास्तव अपेक्षा देखील निर्माण झाल्या आहेत.अशावेळी ऑनलाईन उत्पन्नाचे मार्ग, पद्धती योग्यरीत्या समजून न घेता त्या गोष्टी करावयास गेल्याने निराशाच पदरी पडते. अशावेळी तुम्ही ऑनलाईन उत्पन्नाचे पर्याय शोधत असाल तर काही बाबी लक्षात ठेवणे तुमच्या गरजेचे असेल. […]
एक दिवशी एका अनामिक व्यक्तीला मी बागेत बघितले. एका बाकावर डोळे मिटून चिंतन करीत, शांत बसलेले होते. मी अतिशय अचंबित झालो. तीच आकृती तीच चेहऱ्याची ठेवण, तशीच शांत मुद्रा, तशीच बसण्याची पद्धत. अगदी तसेच जसे माझे वडील होते. […]
डॉक्टर आर. डी. लेले हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चीकीत्सक Physician म्हणून प्रसिद्ध. ते भारताच्या राष्ट्रपतीचे विशेष आरोग्य सल्लागार म्हणूनही नांव लौकिकाला आलेले. त्यांच्या सुरवातीच्या सेवेच्या काळांत ते औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक होते. ते अतिशय उत्तम शिक्षक होते. […]
हा एक सत्य घटनेवर आधारित प्रसंग गोविंदमामा हे खऱ्या अर्थाने गांवमामा झालेले होते. शिकलेले आणि तडफदार व्यक्तिमत्व. अतिशय प्रेमळ स्वभाव आणि त्यागवृत्ती. कुणीही समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव, मदत करण्याची आंतरिक इच्छा आणि सदैव हासत आनंदी स्वभाव. सर्वच सदगुणांचे मिश्रण क्वचितच एका व्यक्तीच्या अंगी सापडणे सहसा कठीण. म्हणूनच त्यांना आपल्या वागनुकीने सर्व समाज अर्थात ते रहात असलेले खेडेगांव गोविंदमामा ह्या टोपण नावानी संबोधित असे. स्वतःचे घर व कांही एकर जमीन होती. मुलगा व पत्नी जानकीबाई एवढाच […]
लहान मुलांचे बोल ऐकून त्यांच्यातील वैचारिक समज ही अनेक वेळा चकित करून टाकते. केंव्हा केंव्हा त्यांत विनोद ही निर्माण होतात. दूरदर्शन आणि त्यावरील जाहिराती मुलांना मुखोतगत होऊ लागल्या आहेत. त्या सुरांत म्हणताना एक आनंद लुटीत असल्याचे अनेकदा दिसते. […]
एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक […]
मला त्या क्षणी विचित्र वाटणाऱ्या त्याचा शब्दाचा बोध झाला नाही. मी चक्राऊन गेलो. त्यांनी इतका धिंगाणा घातला, लुटालूट केली तरी त्याबद्दल सहानुभूती? त्याने कांहीच उत्तर दिले नाही. फक्त जवळच्या टोपलीकडे बोट दाखवू लागला. माझी दृष्टी तिकडे वळली. त्यात शंभर रुपयांच्या नोटांची गड्डी पडली होती. ” हे सहा हजार रुपये आहेत साहेब. ही गड्डी माझ्या हाती देत ते वेगाने निघून गेले. […]
प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असतेच. नेत्रहीन असला, द्रीष्टीहीन असला तरी मनाने केव्हांच जगण्याच्या प्रक्रीयेमध्ये बेफिकीर नसतो. आपण डोळस असूनही आपल्या विचारीनी अंध असतो. ही जाणीव झाली. मी चटकन शंभर रुपयाची एक नोट त्याचा हाती ठेवली. […]
एक दैवी संघर्ष – निसर्ग तिच्या मात्रत्वाची भावना तेवत ठेऊन, त्या मुलाला जगवण्यास उद्दुक्त करीत होता. तर जगरहाटी अर्थात व्यवहार त्या मुलाला कुपोषित ठेवण्यातच आपली यशस्वीता मानत होता. […]