नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

आपल्या विचारांमधील अध्यात्माचा शोध !

आपल्यापेक्षा उच्च पातळीवर असलेल्या कशाहीबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा नैसर्गिकपणे आपण गृहीत धरलेले असते- ते काहीतरी गुह्य,गूढ असते आणि कदाचित अज्ञातात (आपल्या आकलनाच्या परिघापलीकडे) अस्तित्वात असू शकेल, जेथे आपले विचार पोहोचू शकत नाहीत. कदाचित म्हणूनच आपल्याला अध्यात्माचे आकर्षण वाटत असेल. […]

साध्या – सरळ – सोप्प्या जीवनाची क्लिष्ट किंमत !

परवा भुवनेश्वरला एका कंपनीत एक चित्तवेधक बोर्ड पाहिला – नैसर्गिक संसाधनांचा वापर करा, कारण ती मुबलक आणि बव्हंशी फुकट असतात. त्या बोर्डवर चित्र होते सूर्याचे आणि दोरीवर वाळत टाकलेल्या कपड्यांचे! मोठ्ठा संदेश. […]

जीवन “मॅरेथॉन”असते, “स्प्रिंट” नव्हे !

खऱ्या जगात हे “ सर्वोत्कृष्ट मेंढरू “ फार पुढे प्रगती करू शकत नाही, हे दुर्दैवी सत्य आहे. दहावी-बारावीच्या मेरीट लिस्टमध्ये आलेल्यांच्या भावी यशाचा (?) आलेख हा संशोधनाचा विशेष झालेला आहे. […]

रेल्वेचे गेज म्हणजे काय असते ? अशी किती गेज आहेत ?

दोन रुळांमधील सरळ रेषेतील (म्हणजे कमीत कमी) अंतराला गेज म्हणतात. जगात निरनिराळया रेल्वेत वेगवेगळी गेजेस वापरली गेली आहेत.त्याचे सर्वसाधारण वर्गीकरण चार विभागात होते. […]

पहाटेचे डोह !

हे डोह साधारण पहाटे तीन ते पाच भेटायला येतात- खोलवर, घनगंभीर, दिवसभराचे सारं काही आत पचवलेले! समुद्र अथांग, नदी खळखळ वाहती तर डोह एकाजागी स्थिरावलेले आणि स्तब्ध ! […]

“नितळ” – आयुष्याचा तळ ढवळून टाकणारा आरसा !

दोन तास दहा मिनिटे संगणकाच्या पडद्यापासून हलू न देणारा हा नितांतसुंदर चित्रपट बघून मी भारावलो. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी हा २००७ चा चित्रपट तू-नळीवर आला. ठळक कोडाचे अंश (डाग, पट्टे ) चेहेऱ्यावर बिनदिक्कत मिरवणारी आणि ते स्वीकारलेली डॉ देविका येते तिच्या रानडे नामक डॉ मित्राच्या घरी आणि तिला आपली “भावी” मानताना सगळ्यांची ओढाताण एवढा हा एक दिवसाचा चित्रपट (तरुण पिढी अपवाद, त्यांना तिच्या कोडासकट तिला स्वीकारायला काही अडचण नसते, आणि अर्थातच वृद्ध मंडळी, ज्यांच्या डोळ्यांमध्ये जगाचे असे अनेक अनुभव असतात)! […]

एका शिक्षणसंस्थेचा……

एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची बातमी दिसली आणि एक फोटोही. तसे हे महाविद्यालय जुने, अर्थात फार बिनीचेही नाही पण वाचनात मात्र आहे. वेगवेगळ्या स्वयंघोषित सर्वेक्षणांमध्ये (ज्याच्या कुबड्या उच्च शिक्षणक्षेत्रातील महाविद्यालयांना आजकाल अपरिहार्य झाल्या आहेत) ते अधून-मधून झळकत असते आणि त्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर अपूर्वाईने टाकल्या जातात. […]

भारतीय रेल्वेची स्वयंपूर्णतेकडे घोडदौड

स्वातंत्र्यपूर्व काळात रेल्वेयंत्रणा जवळजवळ संपूर्णपणे ब्रिटिशांकडून आयात होणाऱ्या गोष्टींवर अवलंबून होती. चित्तरंजन लोको वर्क्स हा कारखाना हे स्वातंत्र्यानंतरचं प्रगतीचं पहिलं पाऊल होतं. प्रथम धुराची इंजिनं बनवणाऱ्या या कारखान्यात आता वर्षाला १५० ते १७० इलेक्ट्रिक इंजिनं बनविली जातात. आता फक्त २५ टक्क्यांहून कमी सामग्री परदेशी बनावटीची वापरली जाते. डिझेल इंजिनं बनविण्याचा कारखाना वाराणसी येथे अमेरिकेच्या मदतीने सुरू […]

रेल्वे-कामगार संघटना आणि रेल्वेचे संप

रेल्वे-कामगार संघटना पहिल्या महायुद्धाच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे १९०० ते १९१४ पर्यंत अस्तित्वातच नव्हत्या. तत्पूर्वी, काही प्रांतांतील रेल्वे-कामगार व वरिष्ठ अधिकारी यांच्यात भांडणं, मारामाऱ्या होत. काहींचे तर मृत्यूही झाले होते, पण कामगारांचे हक्क मागणारी, त्यासाठी भांडणारी कोणतीही संघटना स्थापन झालेली नव्हती. त्या काळानुसार रेल्वे कामगारांचा पगार अतिशय कमी होता. संघर्ष होतच होता. त्यांतून मार्ग काढण्याकरता, कामगारांचं संघटित […]

हत्ती व सिंहाचा रेल्वेरुळांवरील वावर

भारताच्या अति-पूर्वेकडील प्रांतांत म्हणजे आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, या भागांत काही वर्षांपूर्वी रेलगाडीची धडक लागून ६५ हत्तींचा मृत्यू झालेला आहे. बरेचसे मृत्यू रात्रीच्या अंधारात घडलेले असून, बरेच वेळा इंजिनांचंही नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आय.आय.टी.च्या इंजिनीअर्सनी ‘अनमॅन्ड एरिअल व्हीइकल’ (यु.ए.व्ही.) चा वापर करून रात्रीच्या काळोखात हत्तींना (ते रेल्वेमार्गावर/पाशी आलेले असल्यास) शोधणारे संवेदक बसविले […]

1 2 3 4 5 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..