..अजून तुला स्वताची इच्छा सोडून देता येत नाहीय म्हणून वारंवार यावे लागतेय ..या पुढे पिण्याच्या पहिले ‘ मी आज दारू पिवू का ?’ अशी आई वडिलांची ..पत्नीची परवानगी घे ..ते हो म्हणाले तरच दारू पी ..हे जेव्हा तू शिकशील तेव्हाच व्यसनमुक्त राहशील …! […]
आता परिस्थिती गंभीर झालेली होती मग आमच्या लक्षात आले की आम्ही धिंगाणा करणारे सुमारे ३० मुले होतो तर होस्टेल मध्ये राहणारी मुले जास्त होती संख्येने .. हळू हळू वरच्या होस्टेल मधली मुले खाली येऊन चारही बाजूने आम्हाला घेरत होती एव्हाना ही बातमी आमचे व्यवस्थापक फडके सर् यांच्या पर्यंत पोचली होती ते धावत येऊन आम्हाला समजावू लागले […]
…. उत्तर लिहून डायरी माॅनीटर कडे द्यायला गेलो ..डायरी घेत मला म्हणाला ..विजयभाऊ आज उद्या तुमची झाडू ड्युटी लागली आहे ..तुम्हाला आता येथे एक आठवडा उलटून गेलाय ..तुमची तब्येतही चांगली आहे ..तेव्हा उद्या सर्व हॉल मध्ये ..सकाळी चहानंतर ..दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर झाडू मारण्याचे काम तुम्हाला करायचे आहे […]
कोणत्याही प्रकारचे लोन देताना ज्या विविध गोष्टी बँका तपासतात त्यामध्ये प्रामुख्याने सिबिल स्कोर हा महत्वपूर्ण भूमिका निभावतो. हे सिबिल स्कोअर चेक करणारे अनेक वेबसाइट आहेत. परंतु या बेबसाईटवर दिलेल्या आपल्या माहितीचा गैरवापर केला जावू शकतो. त्याकरिता सिबिल स्कोर चेक करण्यासाठी www.cibil.com या सरकारी वेबसाईटचा वापर करणे योग्य ठरते. […]
१२ वी ला असताना पंचवटी कॉलेज मध्ये स्नेहसंमेलनाच्या वेळी आपण एखादी एकांकिका बसवावी असे आमच्या मनात आले अर्थात या पूर्वी अभिनयाचा काही अनुभव नव्हता परंतु आमच्या पेक्षा वयाने मोठे असेलेल जे आमचे विलास पाटील , रतन पगारे , यशवंत .. वगैरे मित्र होते ( अर्थात हे मित्र आमच्या सारखे व्यसनी नव्हते ) त्यांनी आम्हाला या प्रकरणी मदत करायचे ठरवले , […]
मिस्टर इंडिया मधील अनिल कपूर सारखे अदृश्य होणारे ब्रेसलेट प्राप्त झाले तर काय काय कराल हा सरांचा प्रश्न सूचक होता ..सगळ्यांनी त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवल्या ..सर्वाची उत्तरे ऐकून सर म्हणाले ..आता जी उत्तरे दिलीत तुम्ही त्यात एकानेही देशसेवा करण्याबद्दल ..गरीब…दिन दुबळे यांचे जीवन सुखी करण्याबद्दल ..किवा सर्व विश्वाचा काही फायदा करून देण्याबद्दल विचार मांडला नाही . […]
काही जण तर या ‘ ब्लँकआउटच्या ‘ अवस्थेत एका गावातून रेल्वेत बसून दुसर्या गावी जातात ..तेथे दारू उतरली की भानावर येतात ..त्यांना आपण या गावी का आणि कसे आलो हे देखील आठवत नाही ..याच अवस्थेत काही जणांच्या हातून रागाच्या भरात खून ..एखाद्याला जबरी मारहाण असे गुन्हे घडू शकतात..वस्तूंची तोडफोड फेकाफेक ..काहीजण खिश्यातील सगळे पैसे उडवतात.. […]
मी काय बघितले, काय ऐकले, ह्यापेक्षा मला काय मीळाले, हेच महत्वाचे! हाच तो अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण… परमपूज बाबासाहेबांचा…. युग पुरुषाचा क्षणिक सहवास. जीवनामधील सोनेरी क्षण […]
आज मानसोपचार तज्ञांच्या भेटीचा वार होता ..या आठवड्यात नवीन दाखल झालेल्या सर्वांना माँनीटरने …सकाळी प्रार्थनेच्या वेळी त्यांना आज मानसोपचार तज्ञांना भेटायचे आहे हे सांगितले होते ..त्यावर एकदोन जणांनी सरळ सरळ नकार दिला होता ..त्यांना माँनिटरने वारंवार दारू अन्य मादक पदार्थांच्या सेवनाने मेंदूवर कसे दुष्परिणाम होऊन ..मानवी विचार ..भावना ..वर्तन यात कसा नकारात्मक बदल होतो हे समजून सांगितल्यावर ते तयार झाले […]
पाकिस्तानात 8 हजार लोकांना संसर्गित करणाऱ्या प्राणघातक चिनी करोना मृतांचा आकडा 159 पर्यंत गेला आहे. अनेक ठिकाणी हा संसर्ग ‘स्टेज तीन’ला म्हणजे सामाजिक प्रसारापर्यंत गेला आहे. […]