नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

आजी ग आजी!

सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते. […]

संगीत, अभिनय, काव्य व इतर अवांतर ! (नशायात्रा – भाग २४)

तसे आमच्या घरी संगीताची आवड सुरवातीपासून आहे , माझे आजोबा सयाजीराव महाराजांच्याद दरबारी नोकरी करत असत , तसेच ते कीर्तनकारही होते , माझ्या वडिलांना देखील संगीताची आवड होती त्यांचे थोडेसे संगीत शिक्षण देखील झाले होते व राजकोटच्या रेडीओ केंद्रावर त्यांनी तरुणपणी गायन देखील केले होते , […]

मदत मागणे.. मदत घेणे ! (बेवड्याची डायरी – भाग १९)

आजच्या समूह उपचारा मध्ये सरांनी ..मदत घेणे ..मदत मागणे या विषयावर चर्चा केली …प्रत्येक व्यसनी व्यक्तीला आपण कोणाचीही मदत न घेता व्यसन सोडू शकतो असा खोटा आत्मविश्वास असतो ..एकतर मुळातच आपण व्यसनी आहोत हे त्याला मनापासून मान्य नसते ..त्यात कोणाची मदत घेणे म्हणजे त्याला खूप कमीपणा वाटतो ..खरे तर मदत घेण्यात कोणताही कमीपणा नसतो ..उलट व्यसनाच्या आकर्षणाशी लढण्यासाठी स्वतची शक्ती वाढवणे असते मदत घेणे म्हणजे .. […]

देशाची होमलँड सिक्युरिटी मजबुत करण्याकरता अमेरिकेच्या अनुभवाचा वापर

भारतिय गृहमंत्रालय सीमा व्यवस्थापन खाते, सीमा व्यवस्थापनासंबंधातील मुद्दे हाताळत असते, पण त्यांचा आवाका प्रभावी व्यवस्थापनाचे दृष्टीने खूपच मर्यादित आणि अपुरा आहे.डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (अंतर्गत सुरक्षा मंत्रालय)सारखे एक सर्व समावेशक मंत्रालय सुरु करुन देश सुरक्षित करावा लागेल. भारत सरकारला अमेरिकन कार्यपद्धतींचा आणि अनुभवांचा अभ्यास करून, तसेच त्यावरून सुयोग्य धडे घेऊन,अमेरिकन अनुभव भारताच्या परिस्थितीस अनुकूलित करून वापरला पाहिजे. […]

हॉस्पिटल मधून पलायन (नशायात्रा – भाग २३)

आई भावाला रागवत होती ते पाहून मला बरे वाटत होते , मनातल्या मनात मी ‘ मला मर म्हणतोस काय ? बघ आता मजा ‘ असे म्हणत होतो . त्या काळी माझ्या उडाणटप्पू पणा करण्याच्या आणि बेताल वर्तनाच्या जो आड येईल तो मला माझा शत्रू वाटत असे आणि माझ्या शत्रूंमध्ये सर्वात पहिला नंबर मोठ्या भावाचा होता कारण तो नेहमी माझ्या भानगडी शोधून काढत असे आणि माझ्या स्वैर जगण्याच्या आड येत असे . […]

कृतज्ञता.. परस्परावलंबन (बेवड्याची डायरी – भाग १८)

प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या न कोणत्या कारणासाठी इतरांवर अबलंबून असते काही वेळा मानसिक दृष्ट्या तर काही इतर कारणांनी.. परस्परावलंबनाची ही जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे ..कृतज्ञता यालाच म्हणतात …ही कृतज्ञता ज्यांना समजते ती माणसे कधीच कोणाचा तिरस्कार करत नाहीत ..कधीच व्यसने करत नाहीत ..किवा समाजविघातक कृत्ये करत नाहीत ..उलट अशी माणसे सर्वांच्या विकासासाठी आपली आपला पैसा ..श्रम आणि बुद्धी यांचा वापर करून स्वतचे आणि इतरांचेही जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्नशील राहतात .. सोप्या भाषेत कृतज्ञता म्हणजे काय हे समजावून सांगितले… […]

व्हीआयपी सुरक्षा आणि सामान्य नागरिकांची सुरक्षा

सुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.राजकीय नेते आणि त्यांचे दौरे यांत पोलीस बळाचा बराच वापर होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेकडे पोलिसांचे अनेकदा दुर्लक्ष होते.त्यामुळे व्हीआयपी सुरक्षेचे महत्व कमी करुन जास्त पोलिस दल सामान्य जनतेच्या सुरक्षेकरता तैनात केले जावे. केंद्र सरकारने व्हीआयपी सुरक्षेमधून एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड) कवच […]

डोनाल्ड ट्रम्प भेटीमुळे भारत अमेरिका संबंध मजबुत होण्यास मदत

अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्यासाठी ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विमानतळ ते स्टेडियम या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या हजारो लोकांनी तसेच मोटेरा स्टेडियमच्या आत असलेल्या लाखांवर लोकांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. या भेटीमुळे ट्रम्प हे दुसर्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर भारताला त्याचा खूप फायदा मिळू शकतो. अमेरिकेत थोडेथोडके नाही तर 40 लाख भारतीय आहेत. या अनिवासी भारतीयांच्या मदतीने भारताचे हितसंबंध ट्रम्प यांच्या कार्यकाळात जपले जाऊ शकतात. […]

मुका झाल्याचे सोंग (नशायात्रा – भाग २२)

रागारागाने मी आतल्या खोलीत जाऊन दार आतून लावून घेतले , मोठ्या भावाने ,मला ‘ ती जिवंत राहून काही फायदा नाही , त्यापेक्षा मरत का नाहीस , गाडीखाली जाऊन जीव दे ‘ असे म्हंटल्या मुळे माझा अहंकार प्रचंड दुखावला गेला होता व आता मोठ्या भावाला काहीतरी धडा शिकवला पाहिजे असे मला वाटत होते . त्याने केलेल्या अपमानाचा बदला आपल्याला त्रास न होता कसा घेता येईल असा विचार मनात होता . […]

सोनेरी तसवीर !

त्रेसष्ठ सालची गोष्ट आठवली. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका कॉन्फरन्स साठी गेलो होतो. त्यावेळी विद्यालयाच्या       ग्रंथभांडारात जाण्याचा योग आला होता. अतिशय भव्य आणि प्रचंड असेते ग्रंथालय होते.  भरपूर वैद्यकीय आणि संलग्न विषयांची पुस्तके  मासिके कपाटामध्ये अतिशय व्यवस्थित ठेवलेली होती. ग्रंथालयात शिरताच भिंतीवर एक भव्य काचेची फ्रेम केलेली तसवीर दिसली. फ्रेमची चौकट सोनेरी असून, अतिशय आकर्षक होती.  मध्यभागी एका वहीचा वेडावाकडा फाडलेला कागद  चिकटवलेला  होता. त्यावर चार रेघोट्या आखून कसलासा आलेख काढलेला होता. अतिशय उत्कृष्ट सजविलेल्या […]

1 32 33 34 35 36 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..