व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यावर पहिले पंधरा दिवस काही विशेष कारण असल्याशिवाय नातलग तुम्हाला संपर्क करू शकत नाहीत ..कारण व्यसन बंद केल्यानंतरच्या सुरवातीच्या काळात ..व्यसनी व्यक्तीला अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास होऊ शकतात ..अशा वेळी घरी जाण्याची ओढ असते मनात ..जर संपर्क झाला तर बहुतेक जण ..मला इथे खूप त्रास आहे ..इथली व्यवस्था मला आवडली नाही ..आता मी घरी येतो ..या पुढे मी अजिबात व्यसन करणार नाही ..वगैरे प्रकारचे बोलून कुटुंबियांना घरी नेण्यास आग्रह करतात .. […]
सहा वर्षानंतर मुलीच्या फोटोचा अल्बम बघण्यात आला. दत्तक मातापित्यासह तिचे अमेरिकेतील प्रशस्त बंगल्यातील फोटो, एक अलिशान मोठ्या गाडीत स्कूलयुनिफार्म मधले फोटो, जगप्रसिद्ध नायगारा धबधबा बघातानाचे फोटो, जगातले सातवे आश्चर्य Grand Canyon च्या विशाल सुळ्याकडे मान उंचावून बघतानाचे फोटो, Washington येथील President’s White House बघातानाचे फोटो, अनेक अनेक छबीमध्ये तिचा भाग्य आलेख फुलविणारे प्रसंग बघण्यात आले. जे तिच्या झोळीत निसर्गाने ओंतले ते कल्पनातीत होते […]
मी हळू हळू माझ्या मित्रांच्या नकळत ब्राऊन शुगर ओढू लागलो होतो , सगळे एकत्र असताना गांजा , चरस आणि मग सगळ्यांना शुभरात्री करून झाले की मी घरी येताना सोबत ब्राऊन शुगर ची ती छोटीशी लाल झाकणाची बाटली घरी आणून सिगरेट मध्ये गांजा भरून त्यात थोडीशी पावडर टाकून ओढत असे . मला आठवते एरवी आम्ही गांजा चिलीमितून ओढत असू व त्या वेळी अनेकदा मातीची चिलीम नीट सांभाळावी लागे नाहीतर फुटून जात असे म्हणून मी सायकलच्या पायडलला असलेल्या स्टीलच्या नळी ची एक कायम टिकेल अशी चिलीम बनवली होती .. […]
प्राणायाम करण्यापूर्वी शरीर एकदा ताजेतवाने करून घेण्यासाठी चाललेले शरीर संचालन करताना … शरीराचे सर्व अवयव सांध्यातून हलवताना ..माझ्या सांध्यामध्ये थोड्या वेदना होत असल्याचे जाणवले ..तसेच सर्व स्नायू आखडून गेल्याने त्यांची हालचाल करताना त्यावर ताण येत होता .. […]
आझाद सेनेची पहिली मिशन कशी असली पाहिजे या वर आमच्या रोज चर्चा होत असत , शहरातील काही लबाड राजकारणी , दोन नंबरचे काम करणाऱ्या लोकांची यादी तयार करून त्यांना धमकीची पत्रे पाठवावीत असा एक मुद्दा समोर आला , म्हणजे अश्या लोकांना तुमचे सगळे धंदे आम्हाला माहित आहेत आणि आपण हे सगळे सोडून जर नीट वागले नाहीत तर होणारे परिणाम भोगायला तयार राहा असे पत्र या लोकांच्या पत्यावर पोस्ट करायचे . […]
आता आपण शरीर मनाला विश्रांती देणारे शवासन करत आहोत..पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्व शरीर शिथिल करणार आहोत..आपल्या शरीरातील सर्व पेशी..स्नायू ..हळू हळू सावकाश ..शिथिल होत जाणार आहेत..काही क्षणांच्या याविश्रांती नंतर पुन्हा सारे शरीर ताजेतवाने ..उत्साही ..होणार आहे.. […]
एकीकडे आम्ही गांजा आणि चरस ओढत होतो तरी नेहमी नशा करताना आमच्या चर्चा मात्र देशहिताच्या व्हायच्या व भ्रष्टाचार , काळाबाजार , जातीयवाद असे विषय आमच्या चर्चेत असत . आमच्या या ‘ गंजडी ‘ समूहात सर्व जातीधर्माची मुले होती आणि आमचा वयाने मोठा असणारा मित्र विलास हा जेव्हा जेव्हा आम्हाला भेटत असे तेव्हा तो नेहमी आम्हाला चार चांगल्या गोष्टी सांगत असे […]
माझा व योगाभ्यास यांचा छत्तीसचा आकडा होता पूर्वीपासून .. लहानपणी मी व्यायाम वगैरे खूप केलाय ..जोर ..बैठका .. अशा गोष्टी मी केल्या होत्या ..पुढे सगळे सुटले .. भलतेच सुरु झाले होते .. योग्याभ्यास म्हणजे ऋषीमुनींनी करायची गोष्ट असे माझे ठाम मत होते ..सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातील या गोष्टी असल्या तरी ..आपल्याला काही मोठे योगी बनायचे नाही ..या विचाराने मी योगाभ्यासापासून चार हात दूरच राहिलो होतो .. […]
एका मोठ्या पातेल्यात आम्ही बनवलेली थंडाई ठेवली होती , मग कोणीतरी सांगितले त्यात जर तांब्याचे नाणे टाकले तर अधिक जास्त नशा येते , लगेच तांब्याचे नाणे कुठे मिळेल याचा शोध सुरु झाला , एकाने त्याच्या आजीच्या जवळ असे तांब्याचे नाणे ठेवले होते ते आणले ( मला वाटते या नाण्यालाच खडकू असे म्हणतात ) एकदाची थंडाई तयार झाली आणि मग एकमेकाला आग्रह करून प्यायला लावणे पण सुरु झाले . […]
मॉनीटर मला भ्रम ..किवा भास होण्याबद्दल सविस्तर माहिती देत असतानाच तेथे शेरकर काका आले .. ही ऐक वल्ली होती ..प्रत्येक गोष्टीत काहीतरी मस्करी करणे ..हा शेरकर काकांच्या डाव्या हाताचा मळ होता..वयाच्या ६५ व्या वर्षी ..माणूस इतका कसा कार्यक्षम आणि गमत्या असू शकतो याचे मला नवल वाटे […]