रेल्वे स्टेशनवर द्राक्ष पेट्यांची हमाली करण्याचे काम आता नियमित झाले होते वर्षातून साधारण ५ महिने हे काम असते , रात्रभर रेल्वे स्टेशन वर भटकणे , गाडीची वेळ आली की द्रक्ष्यांचा पेट्या पार्सल विभागातून काढून त्या पेट्या रेल्वे स्टेशन वर असलेल्या सामान वाहून नेण्याच्या चार चाकी लोखंडी गाड्यावर लादणे आणि मग गाडीचा पार्सल चा डबा ज्या ठिकाणी येतो तेथे त्या पेट्या नेऊन ठेवणे व गाडी आली की ५ मिनिटात धावपळ करून त्या पेट्या पार्सल च्या डब्यात चढवणे असे काम असे , […]
पहाटे पहाटे गांजाचे दम लावून आमची गँग सफाई मोहिमेवर निघाली काही जणांच्या हातात झाडू होते , तर काहींनी खराटे आणले होते मात्र दोन जणांनी काहीच आणले नव्हते त्यांना विचारले तर म्हणाले घरचे झाडू , खराटे सकाळी घरी लागतात म्हणून नाही आणले , मात्र हे दोघेही एकदम झकपक कपडे घालून आले होते त्यापैकी एकाने नवा ‘सफारी ‘ आकाशी रंगाचा तर दुसऱ्याने झब्बा आणि पायजामा घातला होता क्रीम कलरचा , मला त्यांचे ते कपडे पाहून जरा नवल वाटले हे असे कपडे घालून हे कसले झाडू मारणार ? […]
मी सहज मनाशी आतापर्यंत दारूत किती पैसे गेले असतील असं विचार केला तेव्हा ती रक्कम किमान २ लाख रुपये इतकी होत होती .. म्हणजे गेल्या १० वर्षात मी दोन लाख रुपयांची दारू प्यायलो होतो तर ..आणि तुलनेत या दहा वर्षात माझा कपड्यांवर ..स्वतच्या जेवणावर ..सिनेमा हॉटेलिंग वगैरे खर्च कमीच झाला होता .. […]
आमची गांजा ओढणारी टीम आता वाढत चालली होती , दारूचा पटकन तोंडाला वास येतो मात्र गांजाचे तसे होत नाही , फक्त पिताना गांजाच्या धुराचा वास दरवळतो आणि अनुभवी किवा जाणकार लोकांनाच गांजा , चरस वगैरे च्या धुराचा वास कळतो , एकदा गांजा ओढून झाला की तोंडाला दारू सारखा भपकारा येत नाही त्यामुळे आम्ही दारू चे सेवन क्वचित आणि गांजा मात्र नियमित ओढत असू , दारू चढल्यावर बहुतेक वेळा भांडणे , शिवीगाळ , फालतू बडबड असे प्रकार घडतात पण गांजा चे मात्र तसे नाही बहुधा गांजा ओढणारे शांत राहतात भांडणे वगैरे प्रकार त्यांना मानवत नाहीत . […]
सरांनी त्यांच्या हातातील पुस्तक सर्वाना दाखले त्यावर ‘ रोजचे प्रतिबिंब ‘ असे नाव होते .. मित्रानो हे अल्कोहोलीक्स अँनॉनिमस या संघटनेने प्रकाशित केलेले पुस्तक असून या पुस्तकातील सर्व विचार हे पूर्वी व्यसनी असलेल्या माणसांनी लिहिले आहेत ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस या संघटनेने सुधारणेसाठी ज्या बारा पायऱ्या किवा ज्या सूचना दिल्या आहेत ..त्यावर हे पुस्तक आधारित आहे..प्रत्येक महिन्यात एका पायरीवरचे विचार यात दिलेले आहेत […]
तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेण्यासाठी, कुणालाच कसलेही श्रम व मेहनत घ्यावी लागत नव्हती. ती गाय, जिच्यात तेहतीस कोटी देवांचे अस्तित्व असल्याची भावना, जणू दर्शन देण्यासाठीच येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाटेवर उभी होती. प्रत्येकजण दर्शन घेवून स्वतःचे समाधान आपल्याच कृतीत शोधात होता. […]
मला आतून पक्के माहित होते की अतृप्त आत्मे , शनी महाराज वगैरे मला त्रास देत नाहीयेत तर माझे विचार आणि वर्तन माझ्या अधःपतनास जवाबदार होते , मात्र हे मला उघडपणे मान्य करणे कठीण जात होते . माझा दिवसातील जास्तीत जास्त वेळ गांजा पिणे , वाचन आणि मित्रांबरोबर टिवल्याबावल्या करण्यात जात असे, त्याच काळात ‘ श्रीमद्भगवद्गीता ‘ जशी आहे तशी वाचनात आली , […]
जोतिषी एकदम गंभीर झाला होता आणि त्याने निष्कर्ष काढला की याने प्लांचेट करून बोलावलेले आत्मे योग्य ठिकाणी परत गेलेले नाहीत व ते सतत याच्या भोवती असतात , याला अवस्थ करतात , तसेच याच्या राशीत ‘ शनी ‘ आला आहे तेव्हा तो शनी याच्यावर काही ना काही गंडांतर आणत राहणार नेहमीच….. […]
भारत खाद्य तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे, तर मलेशिया भारतासाठी खाद्य तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. पण मलेशियाच्या पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारतावर टीका केली होती. प्रत्युत्तर म्हणून भारताने मलेशियाकडून आयात होणारं पाम तेल रोखलं होतं. आयात बंद केल्यामुळे मलेशियाच्या अर्थव्यवस्थेलाही हादरा बसला आहे. […]
सरांनी सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ मनात घोळवत मी सरांनी विचारलेल्या ‘ ‘ तुम्हाला समजलेला प्रार्थनेचा अर्थ ?’ या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..हात थोडे थरथरत होते तरीही नेटाने लिहीत गेलो .. या पूर्वी मी शाळेत आणि इतरही ठिकाणी वेगवेगळ्या प्रार्थना म्हंटल्या होत्या व त्या सगळ्यांन मध्ये देवाला काही ना काही मागितलेले असायचे व बहुधा धन .धान्य समृद्धी ..पुत्र ..सुख अश्या गोष्टी त्यात असत .या प्रार्थनेत मात्र देवाकडे फक्त सहनशक्ती ..धैर्य ..आणि समजूतदारपणा मागितला होता हे जरा विशेष होते […]